भोसरीमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा जल्लोत्सव साजरा
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी मधील आदर्श शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिका प्रियांका बारसे व सुषमा कुंभार, वंदना लढे, चित्रा औटी यांनी मुलांचे औक्षण करून स्वागत केले . विद्यार्थी पालक शिक्षकांच्या उपस्थितीत संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
भोसरी मधील आदर्श शिक्षण संस्थेच्या प्रांगणात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने प्रवेशाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी बालवाडी प्राथमिक माध्यमिक तसेच इंग्रजी माध्यम विभाग व संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बारसे यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा जल्लोत्सव साजरा झाला.
शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियांका बारसे व सह शिक्षकांनी मुलांचे औक्षण करून स्वागत केलेसह शिक्षकांनी मुलांचे औक्षण करून स्वागत केले.
बालवाडी विभागाच्या कुंभार मॅडम यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप झाले .
मुलांना शासनाची मोफत पाठ्यपुस्तके वाटण्यात आली .टाळ्या वाजवून आरडाओरडा करून मुलांनी शाळेत आल्याचा व आपले मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद व्यक्त केला.
यावेळी वंदना मोडक यांनी एक वेगळ्या पद्धतीने सेल्फी पॉईंट तयार केला. या सेल्फी पॉईंट मध्ये विद्यार्थ्यांनी फोटो काढून आनंद घेतला तसेच पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना सेल्फी पॉइंट मध्ये उभे करून फोटो काढले.मेहेजबीन तांबोळी या सहशिक्षकेने वेलकम बॅनर तयार करून मुलांचे स्वागत केले.
मुख्याध्यापिका प्रियांका बारसे यांनी वंदना मोडक, तांबोळी मॅडम व रांगोळीकार भदाडे यांचे यावेळी कौतुक केले.
ढोलताशाच्या गजरात मुलांचे स्वागत होत असताना जुने विद्यार्थ्यांना मित्र मैत्रिणी भेटल्याचा आनंद तर नविन प्रवेश घेतलेले विद्यार्थी गोंधळलेले घाबरलेले आणि छोटे मंडळींनी तर रडुन गोंधळ घातला.अस संमिश्र वातावरण संस्थेच्या आवारात दिसुन येत होत.