ताज्या घडामोडीपिंपरी

कुदळवाडी क्र.८९ शाळेमध्ये चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत

Spread the love

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पी.सी. एम. सी. पब्लिक स्कूल कुदळवाडी क्र.८९ शाळेमध्ये आज शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन करण्यात आले. तसेच पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तकांचे वितरण  दिनेश यादव नगरसदस्य,  आनंदराव यादव,  विशाल बालघरे, डॉ. सुनिल यादव, बबनराव मोरे, दिपक घन व शाळेचे मुख्याध्यापक संपत पोटघन उपस्थित होते.

विठ्ठल बगाटे यांनी प्रास्ताविक करताना शाळेमध्ये राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली तसेच खडू फळ्याच्या साक्षीने सुरु झालेली शाळा आज पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये नंबर एकवर कार्यरत आहे, असे सांगितले.

. शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेमध्ये संगणक लॅब, अद्ययावत प्रयोगशाळा व ग्रंथालय सुरु केलेबाबतचे निवेदन दिले. तसेच पुढील जुलैपासून सर्व विद्यार्थ्यांना RFID ओळखपत्र व त्याची उपयोगिता याचे महत्व सांगितले.

श्री. दिनेशशेठ यादव यांनी शाळेची गुणवत्ता व शाळेत राबवित असलेल्या उपक्रमांची स्तुती केली. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी आईवडिलांचे संस्कार व शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन घेत जावे व त्याप्रमाणे आचरण करावे असे सांगितले.

श्री. मारुती खामकर यांनी कुदळवाडी प्रभागातील सर्व नगरसेवक व सा. कार्यकर्ते यांचे सतत शाळेच्या उन्नतीसाठी करत असलेल्या प्रयत्नांचचे कौतुक केले व आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button