- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
– वाहतूकसंबंधी सर्व विभागांची महत्त्वपूर्ण बैठक पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘‘वाहतूक कोंडी मुक्त’’ भोसरी विधानसभा मतदार संघासाठी महापालिका, पोलीस प्रशासन आणि संबंधित सर्व विभागांनी सर्वसमावेशन ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे. तसेच, खासगी बस यांचे थांबे निश्चित केले जाणार आहेत. वाहतूक सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली आहे. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील वाहतूक समस्यांबाबत आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका प्रभारी आयुक्त तथा ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, महापालिका मुख्य अभियंता मकरंद निकम, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल…
”आमचा मान, आमची शान, आमचा स्वाभिमान; आमचा भाई इरफान”.. म्हणत शिवसैनिक , हितचिंतक यांची प्रेमाची हाक … भोसरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कामगार तथा शिवसेना नेते इरफानभाई सय्यद यांचा वाढदिवस विविध विधायक उपक्रमांनी साजरा झाला. दरम्यान वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिक्षण मंत्री दिपकजी केसरकर यांना भेटून आशीर्वाद घेतले तर राज्यमंत्रीमंडळातील विविध खात्याचे मंत्री, शिवसेना नेते, उपनेते, राजकीय नेते यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यमुनानगर येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळचे खा. श्रीरंग बारणे, आ. महेश लांडगे, मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे सदस्य अमित गोरखे, तुषार हिंगे, प्रवीण भालेकर,…
अलंकापुरीत निर्जला एकादशी साजरी आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणाऱ्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान अंकली जि बेळगांव येथून मंगळवारी ( दि.१८ ) हरिनाम गजरात झाले. आळंदी मंदिरात परंपरांचे पालन करीत निर्जला एकादशी हरिनाम गजरात साजरी करण्यात आली. भाविकांनी श्रींचे दर्शन घेत मंदिर व नगरप्रदक्षिणा केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात मानाचे स्थान असलेल्या माऊलींच्या अश्वाचे निर्जला एकादशी दिवशी शितोळे – अंकली (ता. चिकोडी जि . बेळगांव ) येथून प्रस्थान झाले . हे अश्व अंकली ते आळंदी हा पायी प्रवास करुन दि. २८ जून रोजी श्री संत…
– पुणे महानगर परिवहन महामंडळ अधिकाऱ्यांची बैठक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदार संघातील चऱ्होली गाव मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. येथील तनिष्क पार्क सोसायटी आणि प्राईड वर्ल्ड सिटीपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून, भविष्यात पिंपरी-चिंचवडचा हा ‘एन्ट्री पॉईंट’ राहणार आहे. त्यामुळे या भागात पीएमपी बस सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. चऱ्होली आणि परिसरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा सक्षम करण्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पीएमपीएमएमल ट्रॉन्सपोर्ट मॅनेजर सतीश गव्हाणे, सर्व डेपो मॅनेजर उपस्थित होते. तसेच, बैठकीनंतर तात्काळ फिल्ड व्हीजिट करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर,…
कष्टकरी कामगारांकडून राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजमाता जिजाऊ या कणखर,निर्भीड, हिम्मतवान तसेच पराक्रमी होत्या . जिजाऊ यांनी बालपणीच युद्ध कलेचे शिक्षण घेतले आणि पुढे त्यांच्या संकल्पनेतूनच स्वराज्याची स्थापना झाली रयतेचे राज्य, स्वराज्याच्या प्रेरणास्थान या राजमाता जिजाऊ होत असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. स्वराज्य संस्थापिका, राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघाच्या कार्यालयामध्येअसंघटित कामगार, कष्टकरी वर्गाकडून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेश माने, संतोष चव्हाण, माधुरी जलमूलवार,बालाजी बिराजदार,अरुणा वाकचौरे,ओमप्रकाश मोरया, स्नेहा वाघचौरे, अश्विनी कळमकर, विशाल सगळे,कोमल कांबळे,कविता सोनवणे, शत्रुघ्न पात्रे, सुनिल मोटे उपस्थित होते. राजमाता जिजाऊ यांना अन्यायाची नेहमीच चीड होती आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत आहे. त्यामुळे शेवटचे फक्त 12 दिवस बाकी असून कॅश काऊंटर उद्या (दि.18) जूनपासून सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कर सवलतींचा जास्तीत-जास्त मालमत्ता धारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सिध्दी उपक्रमा अंतर्गत महिला बचत गटामार्फत मालमत्ता धारकांना बिलांचे वेळेत वाटप करण्यात आले आहे. त्यामुळेच 2024-25 या आर्थिक वर्षातील अडीच महिन्यांत 3 लाख 9 हजार 233 मालमत्ता धारकांनी 362 कोटी 12 लाख रुपयांचा महसूल महापालिका तिजाेरीत जमा केल्याची माहिती कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जे वय शिकण्या बागडण्याचे असते,त्या वयात एका लहान मुलीच्या अपेक्षांना पंख न लागता,तिच्या अपेक्षांवर नियतीने पाणी फेरले आहे.त्या मुलीला विद्युत अपघातात आपल्या उजव्या हाताला गमावण्याची वेळ आल्याचे पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसियेशन चे कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर यांना समजल्यावर त्यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांना माहिती देऊन तिच्यासाठी माणुसकीचा हात पुढे करत तिला संघटनेमार्फत आर्थिक मदत केली.कमालीची गरीब आर्थिक परिस्थिती असलेल्या त्या मुलीला नव्वद हजार रुपयांची मदत करून असोसिएशन ने आपले सामाजिक कर्तव्य पूर्ण केले आहे. देहूच्या येलवाडी भागातील आदिती जयवंत पवार,वय १४ वर्षे ही आपल्या पालकांसोबत मामाच्या मुलाच्या लग्नकार्यासाठी सुदवडी, ता.मावळ येथे गेले होते.सायंकाळी आठ वाजता आदिती…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या त्याग बलिदानाचे स्मरण या ईद निमित्त मुस्लीम बांधव सर्वत्र करतात. पिंपरी चिंचवड शहरात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदची नमाज सकाळी ७ ते ९ दरम्यान विविध मशिदीत, मदरचा ईदगाह मैदानात धर्मगुरू मुफ्ती, मौलाना, हाफीज साहब यांनी मुस्लिम बांधवांना नमाज पढविला. पिंपरी चिंचवड शहरात निगडी, चिंचवड, आकुर्डी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, पिंपरी, भोसरी, घरकुल, काळेवाडी, नेहरूनगर, कासारवाडी, दापोडी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, वाकड, रावेत परिसरात ईदची नमाज सकाळी ७ ते ९ दरम्यान विविध मशिदीत, मदरचा ईदगाह मैदानात धर्मगुरू मुफ्ती, मौलाना, हाफीज साहब यांनी मुस्लिम बांधवांना त्याग व बलिदानाची माहिती विषद केली. चिंचवड परिसरात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शैक्षणिक वर्ष 2024-25 ला संपूर्ण महाराष्ट्रात 15 जूनला सुरू होत आहे. त्याचेच औचित्य साधून आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा रावेत क्र. ९७ येथे पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस सहाय्यक आयुक्त राजू मोरे तसेच मोरेश्वर भोंडवे नगरसेवक यांच्या उपस्थित त्यांनी पहिलीच्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी त्यांचे पहिले पाऊल टाकण्यास सुरुवात करणार आहेत. त्यामुळे त्यांना त्या लहान बाळगोपाळणा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या बोटाला पकडुन वर्गापर्यंत दोघेही घेऊन गेले. त्या नंतर त्या सर्व पालकांनच्या सोबत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून चॉकलेट आणि पुस्तके देऊन वर्गात बसवण्यात आले. प्रवेश उत्सहवास कार्यक्रम सुरू करताना विद्येची देवता सरस्वतीचे पूजन राजू मोरे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या काळातील मुले अत्यंत हुशार आहेत, असे म्हटले जाते, याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो. अनेक लहान मुले वेगळ्या प्रकारचे छंद जोपासून आगळावेगळा विक्रम करतात, तर काही मुले विविध स्पर्धा किंवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवून थक्क करून सोडतात. असाच एक मुलगा तळेगाव दाभाडेमध्ये आहे, ज्याने अनेक स्पर्धा, परीक्षा, खेळामध्ये यश संपादन केले आहे. त्याचे नाव आहे वैष्णव काकडे. तळेगाव दाभाडे येथील वैष्णव काकडे याने विविध स्पर्धामध्ये सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्ये खुला आसमाँ 2023 (ऑक्टो-डिसेंबर) स्पर्धेत यशस्वी, डब्ल्यू.एफ.पी.सी. स्पर्धेत यश, आय.ए. ए.सी. स्पर्धेत विजय, क्लायमेट सायन्स…
