ताज्या घडामोडीपिंपरीमावळ

वैष्णव काकडे यांची विविध स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या काळातील मुले अत्यंत हुशार आहेत, असे म्हटले जाते, याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो. अनेक लहान मुले वेगळ्या प्रकारचे छंद जोपासून आगळावेगळा विक्रम करतात, तर काही मुले विविध स्पर्धा किंवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवून थक्क करून सोडतात. असाच एक मुलगा तळेगाव दाभाडेमध्ये आहे, ज्याने अनेक स्पर्धा, परीक्षा, खेळामध्ये यश संपादन केले आहे. त्याचे नाव आहे वैष्णव काकडे.

तळेगाव दाभाडे येथील वैष्णव काकडे याने विविध स्पर्धामध्ये सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यामध्ये खुला आसमाँ 2023 (ऑक्टो-डिसेंबर) स्पर्धेत यशस्वी, डब्ल्यू.एफ.पी.सी. स्पर्धेत यश, आय.ए. ए.सी. स्पर्धेत विजय, क्लायमेट सायन्स ऑलिंपियाड सेमी-फायनलिस्ट, एनएसयीपी, एनएसयीए, एनएसयीसी, आयओक्यूएम आणि व्हीव्हीएम सहभाग, आयएएसी शर्यगिन ऑलिंपियाड सहभाग व निवड, एमआयटी व हार्वर्ड विद्यापीठाच्यावतीने सन्मानित, आर्यभट्ट गणित स्पर्धा 2024 मध्ये निवड, इंटरनॅशनल सायन्स ऑलिंपियाड स्पर्धेत निवड, भगवद गीता स्पर्धेत प्रमाणपत्र प्राप्त या स्पर्धासोबतच बाल कवी संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होत कला सन्मान मिळविला.

याबाबत बोलताना वैष्णव काकडे याने सांगितले, की आपल्या या यशामागे आई, वडील व गुरुजणांचा मोठा हात आहे. तसेच काहीतरी करून दाखविण्याच्या जिद्दीमुळे अथक परिश्रम करण्याची सवय लागली व हे यश म्हणजे त्याचेच फलित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button