Author: maharashtrabreakingnews.com

परदेशी भाषा शिक्षणातून रोजगाराच्या अनेक संधी!!! पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अनेक पालक- विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहतात; परंतु उज्ज्वल भविष्यासाठी इतरही अनेक संधी उपलब्ध आहेत. परदेशी भाषा शिक्षणातून विविध प्रकारच्या अनेक रोजगार विद्यार्थ्यांना मिळू शकतात. शैक्षणिक संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. नोव्हेल इन्स्टिट्यूटने उत्तम आदर्श निर्माण केला आहे. शैक्षणिक संस्थांनी याचे अनुकरण केले पाहिजे. म्हणजे सुजाण, उच्च शिक्षित पिढी निर्माण होईल, असे मत भाषा तज्ज्ञांनी व्यक्त केले. ‘शालेय वयापासून परदेशी भाषा शिक्षण’ या विषयावर नोव्हेल संस्थेच्या वतीने शनिवारी (२२ जून) मोफत चर्चासत्राचे आयोजन निगडीतील ग दि माडगूळकर सभागृहात केले होते. यामध्ये फ्रेंच ,जर्मन व इतर भाषांमध्ये करियर…

Read More

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार नॅशनलीस्ट ट्रेड युनियन फेडरेशन, असंघटित कामगार विभागाच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी तुषार घाटूळे यांची तर सोशल मीडिया सचिवपदी सुरज देशमाने यांची निवड मां.जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांचे उपस्थितीत करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष असून कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे इथे कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. कामगारविषयी चांगले काम करत रहा अशा शुभेच्छा जयंतराव पाटील यांनी दिल्या. तुषार घाटुळे व सुरज देशमुख हे…

Read More

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आकुर्डी दत्तवाडी प्रभागातील दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या कट्टर समर्थकांनी आज शनिवार दिनांक २२ जून रोजी पद्मविभूषण खा . शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) गटात प्रवेश केला . पुण्यातील मोदीबाग या पवारांच्या कार्यालयात भेट घेण्यात आली यावेळी सर्व कार्यकर्त्यांशी पवार साहेबांनी मनोसक्त चर्चा केली . “आम्ही सर्व आपले नेतृत्व मानून या पुढे कार्य करीत यशवंराव चव्हाण व पवार साहेबांच्या विचारांचा वारसा , तसेच शिव शाहू , फुले , आंबेडकराच्या विचारांचा वारसा जतन करतांना संविधान अधिक बळकट करण्या करिता पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे इखलास सय्यद यांनी सांगीतले .…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आदर्श नगर किवळे रावेत यांनी आपल्या संघ स्थापनेच्या प्रथम वर्षी २१जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला .या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून किवळे येथील ओम शांती केंद्राच्या दीदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात योग साधना बद्दल महिती देताना महर्षी पतंजली यांच्या अष्टांग योगाची माहिती दिली.यामध्ये कर्मयोग,भक्तीयोग,ज्ञानयोग,बरोबर राजयोग बदल सखोल माहिती दिली. सोमेश्वर महिला योगा ग्रुपच्या सर्व महिलांनी योगा प्रात्यक्षिक करून दाखवली.यामध्ये पुरुषांनी देखील सहभाग घेतला. या प्रसंगी संघाचे अध्यक्ष  सुदाम दिवटे,यांनी २१ जून हा कार्यक्रम संघ प्रत्येक वर्षी साजरा करील असे सांगितले. परिसरातील नागरिकांनी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, निगडी कॅम्पस मध्ये १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड पतंजली परिवाराचे संघटन मंत्री डॉ. नारायण हुले यांनी पीसीइटी अंतर्गत असणारे पीसीसीओई, पीसीपी, एसडीपीसीओडी, एसबीपीआयएम व पीबीएस महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना योगा विषयी माहिती, प्रात्यक्षिक व सराव करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. पीसीईटी अंतर्गत चार महाविद्यालयातील ८६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या मध्ये सहभाग घेतला. पीसीईटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे संचालक डॉ. शितल रवंदळे, पीसीसीओइचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाजीनगर येथील सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाचा आठवा वर्धापन दिन आणि आंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी सात ते आठ या वेळात योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले . योगाभ्यास वर्गास १०० पेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला. योगशिक्षक अरविंद वाडकर यांनी योगाचे जीवनातील महत्त्व योग आरोग्यासाठी कशाप्रकारे उपयुक्त आहे हे सांगत शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी प्रात्यक्षिके दाखवत योगसाधना सर्वांकडून करून घेतली. परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शास्त्रीय संगीत भजनसंध्या संपन्न झाली. जेष्ठ नागरिक संघाच्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्राचे युवाअध्यक्ष धुराजी शिंदे यांनी आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते व असंघटित कामगार प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांचे उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. धुराजी शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्र सह पिंपरी चिंचवड शहरातील विविध घटकांसोबत यशस्वी काम केलेले असून शहराध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. पिंपरी येथील माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारकासाठी त्यांचा १० वर्षांपासुन सातत्याने अंदोलन मोर्चासह पाठपुरावा केला आहे. त्यांचे सोबत रिपब्लिकन सेनेचे युवा अध्यक्ष अरुण मैराळे,सामजिक कार्यकर्ते दिनकर सोमवंशी, सामाजिक कार्यकर्ते दिपक सुधाकर वारभुवन यांचसह अनेकानीं प्रवेश केला. देशाचे नेते शरदचंद्र पवार, कार्यक्षम…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय योग दिननिमित्त सकाळी ७ ते ८.३० यावेळेत शिवछत्रपती लिनियर अर्बन गार्डन,गोविंद-यशदा चौक,पिंपळे सौदागर येथे योग शिबिराचे आयोजन  शत्रुघ्न (बापू) काटे युथ फाउंडेशन, द आर्ट ऑफ लिविंग,ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि मीडिया पार्टनर रेडिओ पुणेरी आवाज १०७.८ FM यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले . यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे सत्यजित भैया यांनी व्यासपीठावरून भजनाच्या ठेक्यावर योगाचे अनेक प्रकार नागरिकाकडून करून घेतले तसेच “योग करण्याची पद्धती व याचे महत्व” उपस्थितांना समजावून सांगितले . यावेळी ब्रह्माकुमारी संस्थेच्या बी.के.वर्षा दीदी यांनी सांगितले कि “भारत देशात प्राचीन काळी योगाचा जन्म झाला. भारतीय संस्कृतीत योगास खूप महत्त्वाचे स्थान आहे. योगामुळे…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील तीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने, नदीतील जल प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले असून नदीला जलप्रदूषणासह जलपर्णीचा विळखा पडला असून जलपर्णी समस्यां जैसे थे आहे. इंद्रायणी नदीत पिंपरी चिंचवड महानगरपरिषद हद्दीतून रसायन व मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने नदी पांढऱ्या फेसाने पुन्हा एकदा फेसाळली असून केमिकल रसायन मिश्रित पाणी थेट सोडले जात असल्याने भाविक, नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. इंद्रायणी नदीचे सातत्याने होत असलेले जलप्रदूषण वाढल्याने भाविक, वारकरी आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. पिंपवड महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अंकुश प्रदूषण करणाऱ्या घटकांवर राहिला नसल्याने…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना मध्ये दि. २१/०७/२०२४ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष राजन भानुशाली यांच्या मार्गदर्शना खाली व महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना प्रादेशिक सल्लागार पुणे संतोष सौंदणकर यांच्या संपर्क कार्यालयात इलेक्ट्रीसिटी लाईनस्टाप असोसिएशन पुणे झोन सचिव गणेश जाधव यांचा प्रवेश झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना केंद्रिय सहसचिव राजेश गाढवे, पुणे परिमंडळ अध्यक्ष मनोहर शिंदे, भोसरी विभागय सहसचिव कुमार जाबगौड उपस्थित होते. माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे जन माणसात तयार झालेली प्रतिमा तसेच त्यांच्या कार्य शैलीवर मोहित होऊन संघटनेचे तसेच पक्षाचे काम करण्यासाठी तत्पर राहील असे आश्वासन…

Read More