ताज्या घडामोडीपिंपरी

सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाजीनगर येथील सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाचा आठवा वर्धापन दिन आणि आंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी सात ते आठ या वेळात योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले . योगाभ्यास वर्गास १०० पेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला. योगशिक्षक अरविंद वाडकर यांनी योगाचे जीवनातील महत्त्व योग आरोग्यासाठी कशाप्रकारे उपयुक्त आहे हे सांगत शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी प्रात्यक्षिके दाखवत योगसाधना सर्वांकडून करून घेतली. परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सायंकाळी शास्त्रीय संगीत भजनसंध्या संपन्न झाली.
जेष्ठ नागरिक संघाच्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर मंगलाताई कदम, तुषार हिंगे, नारायण बहिरवाडे, केशव घोळवे ,अनुराधा गोरखे, डॉक्टर गुंजकर , अमित गोरखे , कैलास दुर्गे, नामदेव पोटे, बजरंग गडदे, विलास जेऊरकर, राजाभाऊ मस्के, राजेंद्र घावटे, राज आहेर राव , पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या उपाध्यक्षा सुनिता कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंगलाताई कदम म्हणाल्या की , “ज्येष्ठांनी जीवनाचा आनंद घ्यावा ,मनसोक्त स्वच्छंदी जीवन जगावे, जीवनात राहून गेलेल्या सर्व गोष्टी कराव्यात. उर्वरित आयुष्याचा आनंद घ्यावा”.

कार्यक्रमाची प्रस्तावना सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पर्वती वाडकर यांनी केली .आजपर्यंत ज्येष्ठ नागरिक संघाने केलेले कार्य व भविष्यातील करावयाची कामे याचा त्यांनी वेध घेतला .सर्व लेखकांचे व देणगीदारांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिपान बोराडे, वैजनाथ स्वामी, पांडुरंग वाघोली, अंकुश इंदलकर, गणेश बेलेकर, सदाशिव आढाव, ज्ञानेश्वर बोत्रे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव दिलीप जाधव यांनी केले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भीमसेन साळवी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button