दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांचे सहकारी इखलास सय्यद व तोहीद जावेद शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्ष प्रवेश

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी दत्तवाडी प्रभागातील दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या कट्टर समर्थकांनी आज शनिवार दिनांक २२ जून रोजी पद्मविभूषण खा . शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) गटात प्रवेश केला .
पुण्यातील मोदीबाग या पवारांच्या कार्यालयात भेट घेण्यात आली यावेळी सर्व कार्यकर्त्यांशी पवार साहेबांनी मनोसक्त चर्चा केली .
“आम्ही सर्व आपले नेतृत्व मानून या पुढे कार्य करीत यशवंराव चव्हाण व पवार साहेबांच्या विचारांचा वारसा , तसेच शिव शाहू , फुले , आंबेडकराच्या विचारांचा वारसा जतन करतांना संविधान अधिक बळकट करण्या करिता पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे इखलास सय्यद यांनी सांगीतले .
सदर पक्ष प्रवेशाच्या वेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष (शरद पवार गट ) तुषार कामठे व नगरसेविका सुलक्षणा धर- शिलवंत , विनायक रणसुभे उपस्थित होते.
या वेळी जावेद शेख यांचे जेष्ठ बंधु झाकिर रमजान शेख , चिरंजीव तौहीद जावेद शेख यांचे सह ज्येष्ठ सहकारी अण्णा कुरहाडे , नानांसाहेब पिसाळ , प्रवीण पवार यांसह ज्येष्ठ , महिला व युवक कार्यकार्त्यामध्ये ज्ञानेश्वर ननावरे , वसंत सोनार , यशवंत भालेराव , गोविंद राजेशिर्के , गंगाधर चौधरी , कांतिलाल गड़गुले , सुभाष चौधरी , अण्णा भोसले अलका कांबळे , सुवर्णा साळवे, सारिका पोटफोडे , मुमताज इनामदार , विमल गायकवाड , फरीदा शेख , ललिता माने , सोनाली जाधव , सुलभा धांडे , गीता सुतार इत्यादि महिलांसह युवकां मध्ये सुनील मोरे, जिब्राईल शेख, सुरज मोरे ,निलेश कदम, समीर शेख , रोहन वरुन , फरीद सय्यद , आदित्य मयंकर , अभिजीत पाटील , अमन शेख , अशरफ बागवान , मुदिन मनियार , रोहित पवार , तालीम शेख , शुभम लोंढे , रतनसिंह कुलकर्णी , अब्ददुल्ला खान , उमेर शेख , ईशांत शेख , अमन शेख , सारंग शिंदे , विक्की गोडसे , सनी गोडसे , सिद्धार्थ पानसरे , नीलेश कदम , साहिल मारले , दिलावर सय्यद , शुभम चव्हाण , अमृत जैस्वार , आरशान शेख , ताहिर शेख . इत्यादि उपस्थित होते .
तोहीद जावेद शेख यांनी सर्वांचे आभार मानले .









