- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व मुलींना यावर्षीपासून म्हणजे १ जून पासून उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत मिळेल असे जाहीर करून सवंग प्रसिद्धी मिळवली, आता शैक्षणिक वर्ष सुरू झाले. शिक्षण संस्थांनी विद्यार्थिनींना फिस भरण्याचा तगादा लावला आहे, मोफत शिक्षण घोषणाच ठरल्याने राज्यातील विद्यार्थिनीनां चंद्रकांत पाटलांनी फसविले अशी टीका राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार ,नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन,कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चंद्रकांत पाटलांना आज कष्टकरी कामगारानी मोफत शिक्षणाचा सवाल केला. यावेळी सरचिटणीस तुषार घाटुळे, सिद्धनाथ देशमुख, ओमप्रकाश मोरया, नाना कसबे, युवराज…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रविवारी (दि. 23 जून) रोजी शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर चार फुटांपर्यंत पाणी साचल्याच्या घटना घडल्या, ठिकठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले, महापालिकेने पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज वहिनी स्वच्छता न केल्याने तसेच ठिकठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जायला लागले, पहिल्याच पावसात ही अवस्था असेल तर पुढच्या तीन महिन्यामध्ये पावसाळ्याला शहर कसे तोंड देणार? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आक्रमक भूमिका घेत ऍक्शन मोड वर आल्याचे आज दिसून आले. आज सकाळी तुषार कामठे यांनी निगडी येथील अ प्रभाग तसेच फ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात बहुसंख्य कार्यकर्त्यांसह…
– वाहतुकीला अडथळा ठरणारा महावितरण डीपी, पोल हटवला पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिघी आणि परिसरातील वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या ममता स्वीटहोम चौकातील वाहतूक अखेर ‘कोंडीमुक्त’ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्यावर अडथळा ठरणारे महावितरण डीपी, धोकादायक पोल, स्मार्ट सिटी योजनेतील सीसीटीव्ही पोल यासह अनधिकृत शेड व्यावसायिक व प्रशासन यांच्या समन्वयातून हटवण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ‘‘वाहतूक कोंडीमुक्त भोसरी विधानसभा’’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत गेल्या आठवड्यात महापालिका, महावितरण, आरटीओ, वाहतूक पोलीस प्रशासन अशा सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी मतदार संघातील वाहतूक कोंडी होणारे ‘रेड…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पाण्याचे पाच वॉटर टॅंकर देण्यात येत आहेत. या टँकरच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात पंढरपूरपर्यंत पाच दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वॉटर टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.११ ह.भ.प.सोपान काका कराडकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.२२१ ह.भ.प.ललिता विठ्ठल घाडगे, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.१९७ ह.भ.प. बाबुराव महाराज तांदळे, दिंडी क्र.18 कै. ह.भ.प. धोंडूजी बुवा चिझघरकर व श्रीगुरु बंकट स्वामी महाराज विश्वस्त मंडळ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळ्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासन सतर्क असून आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी पाहणी करून अनुषंगिक कार्यवाही करत आहे. पावसामुळे पाणी तुंबण्याची तसेच इतर आपत्कालीन समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारची समस्या उद्भवल्यास नागरिकांनी महापालिका प्रशासनास त्वरित कळवावे, असे आवाहन आजच्या जनसंवाद सभेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ७१ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १९, ८, ८, ३,४, ७, ११ आणि ११ तक्रारी वजा सूचना मांडल्या. पावसाळ्याच्या अनुषंगाने तुंबलेली गटारे तसेच ड्रेनेजसफाईसाठी आवश्यक ठिकाणी क्षेत्रीय स्तरावर पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशा …
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “विश्वशांतीसाठी ज्ञानी लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न’ या मासिक प्रवचनमालिकेंतर्गत ‘संख्या विरुद्ध सांख्य’ या विषयावरील ५७ वे प्रवचनपुष्प गुंफताना डॉ. संजय उपाध्ये बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते कुलदीप धुमाळ, गतिराम भोईर, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, “आपल्या संस्कृतीतील धार्मिक ग्रंथांमध्ये त्रेतायुगात मंत्रशक्ती, कृतयुगात ज्ञानशक्ती, द्वापारयुगात युद्धशक्ती आणि कलियुगात संघशक्ती अस्तित्वात राहील, असे नमूद केले आहे. त्यामुळेच ज्यांची संघशक्ती प्रबळ असेल तेच जेते ठरतात. ‘सांख्य’ शब्दाचा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पहिल्याच पावसात स्मार्ट सिटी असणारे पिंपरी चिंचवड शहर झाले जलमय झाले . शहरातील नालेसफाई व ड्रेनेजची स्वच्छता याची वारंवार मागणी करुन ही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाने, शासनाने जागे व्हावे. ड्रेनेज व नालेसफाई करून घ्यावी. याबाबत पालिका प्रशासनाने ताबोडतोब उपाययोजना कराव्यात. परिसरातील झोपडपट्ट्यातील भागांमध्ये पुढील येणाऱ्या काळात बचावात्मक कार्यवाही करावी. जर प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष दिले नाही तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून तीव्र जल ठिया आंदोलन करण्याचा इशारा शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी आयुक्तांना दिला आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही ठिकाणी जवळजवळ ६ फुट रस्त्यावरून पाणी वाहत…
– चंद्रपूर येथे महाराष्ट्र विदर्भस्तरीय आटो टॅक्सी चालकांचा मेळावा उत्साहात संपन्न पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रिक्षा टॅक्सी चालकांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. राज्यातील सर्व संघटनांनी मिळून एकजूट दाखवली तर शासनावर आणि प्रशासनावर दबाव पडेल. त्यामुळे रखडलेले प्रश्न त्वरित मार्गी लागेल. मतभेद बाजूला ठेवून राज्यभरातील सर्व रिक्षा चालकांनी आणि संघटनांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे आवाहन ऑटो टॅक्सी, रिक्षा, बस, ट्रक टेम्पो ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. चंद्रपूर येथे बहुजन हिताय ऑटो चालक कामगार संघटनेच्या वतीने विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबा कांबळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन हिताय ऑटो चालक कामगार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वटपौर्णिमेनिमित्त सात जन्म हाच पति मिळावा म्हणून ज्या सौभाग्यवतींनी वडाच्या झाडाला भावपूर्ण फेऱ्या मारल्या त्या वडाच्या झाडांना पर्यावरण संवर्धन म्हणून दोरे, कापूस,पणत्या, नैवद्य फुले, हार यांनी वेढलेली वडाची झाडे मुक्त केली याचा मला विशेष आनंद वाटतो असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी गझलकार सूर्यकांत भोसले यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले.. रूढी आणि परंपरा याचे जतन करणे आपल्या सर्वांचा संस्कार आहे पण वृक्षांचे संवर्धन करणे, झाडे निकोप ठेवणे,मोकळा श्वास जसा माणसाला आवश्यक आहे तसा झाडांना आवश्यक आहे याची जाणीव ठेवून मानवी हक्क संरक्षण जागृती आणि दिलासा संस्था यांनी सामाजिक प्रेरणेतून हे समाजोपयोगी काम केले आहे याचा…
– प्रस्तावित जागेत ‘स्पोर्ट्स स्कूल’ विकसित करा! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मौजे चऱ्होली येथील आरक्षण क्रमांक २/९२ शाळेसाठी आरक्षीत असेलेली जागेत क्रीडा शाळा (स्पोर्ट्स स्कूल) सुरू करावी. सदर जागा खासगी संस्थेला वापरासाठी देण्यात तीव्र विरोध आहे, अशी भूमिका भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मौजे चऱ्होली आरक्षण क्रमांक २/ ९२ मधील शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये प्रशासनाने क्रीडा शाळा (स्पोर्ट्स स्कूल) विकसित करावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९७ मध्ये नव्याने गावे सामाविष्ट झाली. त्यामध्ये…
