Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज अहीर सुवर्णकार समाज पिंपरी चिंचवड यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे खराळवाडी (मुंबई-पुणे रोड) पिंपरी येथे वारकऱ्यांना  ५०००+ पॅकेट (२५० किलो) राजगिरा चिक्की वाटप करून अतिशय आनंदात व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष भगवान वानखेडे, उपाध्यक्ष संतोष सौंदनकर, सचिव गणेश सोनार खजिनदार शिवाजी सोनार, सदस्य दीपक सोनार, सुनील निकुंभ,कैलास पैठणकर प्रवीण दुसाने महिला सदस्य स्मिता सोनार, प्रियंका सोनार, इंद्रायणी जाधव, पल्लवी दुसाने, स्वाती सोनार नयना वानखेडे, नीलम सोनार तसेच राहुल सोनार उमेश सोनार घनश्याम वानखेडे निलेश जाधव महेंद्र सोनार असे अनेक सुवर्णकार बंधू भगिनी यांनी वारकर्यान्सोबत…

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त श्री संत तुकाराम महाराज व्यापार संकुलन व शिवतेज प्रतिष्ठान निगडी यांच्या वतीने आलेल्या सर्व वारकरी बंधू व भगिनिंचे स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला. तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड प्रशासनाच्या वतीने आषाढी पालखी सोहळा 2024 करिता माहिती पुस्तिका प्रत्येक दिंडीस देण्यात आली, या पुस्तिकेमध्ये पालखी मार्गावर असलेल्या सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक पुरविण्यात आलेले आहेत. या पुस्तिका वारीतील सर्वांच्या वाटचालीत विविध सुविधा उपलब्ध करून देतील. तसेच निगडी मध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे शहर संघटक…

Read More

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा आषाढी यात्रेस राज्यासह परिसरातून आळंदीत खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशी माळ,कपाळी बुक्का अन् मुखाने हरिनामाचा जयघोष करीत आलेल्या लाखो भाविक, वारकरी यांचे नामजयघोषात वैभवी पालखी सोहळ्याने विना मंडपातून हरिनाम गजरात सायंकाळी सुमारे एक तास उशिरा सातचे सुमारास प्रस्थान झाले. प्रथा परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा सोहळा एक दिवसाचे मुक्कामास दर्शनबारी मंडप गांधी वाड्यात विसावला. आळंदीत एक मुक्काम घेत श्रींची पालखी पुढील दोन दिवसांचे मुक्कामास पुण्याकडे रविवारी ( दि. ३० ) भल्या पहाटे मार्गस्थ होईल. आषाढी पायी वारीचा प्रस्थान सोहळा अनुभवण्यास राज्य परिसरातून लाखो भाविक हरिनाम गजर…

Read More

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी….  ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रमुख जिल्हा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंक रिक्षाचा उपक्रम राज्‍यात सर्वात प्रथम पिंपरी चिंचवड शहरात सुरू झाला. तो यशस्‍वीही झाला. हा उपक्रम आता राज्‍यभर राबविण्याच्‍या विचाराधीन शासन आहे. त्‍यानूसार दहा हजार पिंक रिक्षा देण्याचा राज्‍य शासनाचा निर्णय स्‍वागतार्ह असल्‍याचे प्रतिपादन घरकाम महिला सभेच्‍या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षा आशा कांबळे यांनी केले. आशा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली की, पिंपरी चिंचवड शहरातील कागद, काच, पत्रा, वेचक, धुणी -भांडी साफसफाई आदी कष्टाची कामे करणाऱ्या शंभर महिलांना रिक्षाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा परवाना काढला. बॅच बिल्ला काढून त्यांना परमिट मिळवून देण्याचा उपक्रम कष्टकरी कामगार पंचायत व घरकाम महिला सभा संघटनेच्या वतीने राबवण्यात आला होता. सावित्रीबाई फुले, माता…

Read More

नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशीसुद्धा कॅश काउंटर सुरू; नागरिकांना कर भरण्याचे आवाहन पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने मालमत्ताकरावरील विविध सवलतींचा लाभ घेत तब्बल साडेतीन लाखांहून अधिक करदात्यांनी तब्बल ४०० कोटींहून अधिक कराचा भरणा केला आहे. यामध्ये तीन लाख २५ हजार नागरिकांना आपला चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ताकर भरून थकीत कराचासुद्धा भरणा केला आहे. करसंकलन विभागाने आवाहन केल्यानुसार, नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरून तब्बल २८५ कोटींचा ऑनलाइन पद्धतीने कर भरला आहे. आता मालमत्ताकरावरील सवलतींचे अवघे दोनच दिवस बाकी असून नागरिकांनी मालमत्ताकरावरील सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे. सुट्टीच्या दिवशीसुद्धा…

Read More

महिला, शेतकरी, युवक, दुर्बल घटकाला समर्पित अर्थसंकल्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  देशातील गरीब, महिला, शेतकरी आणि युवा या चार जातींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विकासाचे लाभ या वर्गांतील अखेरच्या स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या संकल्पास पुरेपूर पाठबळ देऊन सरकारसोबत राहण्याची ग्वाही देणारा अर्थसंकल्प सादर करून महाराष्ट्राने देशाच्या विकासाच्या वाटचालीत आपला सहभाग स्पष्ट केला आहे. अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. शेतकऱ्यांना समस्यामुक्तीसाठी भरघोस मदतीची हमी देतानाच सौरउर्जा पंप देण्याची महायुती सरकारची घोषणा राज्याच्या कृषी क्षेत्रास संजीवनी देणारी ठरणार आहे. मागेल त्याला सौरऊर्जा पंप आणि अखंडित वीजपुरवठ्याची हमी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   आगामी विधानसभा तोंडावर आल्याने सर्वच इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तेजस्विनी कदम या देखील गेल्या काही महिन्यांपासून तयारीला लागल्या आहेत. भाजपकडून त्यांना ताकद मिळाल्यास पिंपरीला एक उच्चशिक्षित आमदार मिळणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तेजस्विनी कदम या तीव्र इच्छुक होत्या. मात्र, त्यावेळी हा मतदार संघ युतीतील मित्र पक्षाला गेल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र, 2024 साठी त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केल्याने भाजपकडून त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. कदम या विरांगणा सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंपरी विधानसभा मतदार संघातच नव्हे तर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारमधील मंत्री तथा सरकारमधील नेत्यांच्या वतीने मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा विषय ज्याप्रमाणे हाताळत आहे. या संदर्भातील सरकारची भुमिका संशयास्पद आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्लमेंटरी बोर्ड सदस्य तथा ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्लमेंटरी बोर्ड सदस्य तथा ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर म्हणाले की, राज्यात एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू होते. त्यांनतर आता ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून आंदोलन केले जात आहे. हे आदोलन सांभाळताना सत्तेतील लोक समाजात तेढ निर्ज्ञाण करण्याचा प्रयत्न करत आहे. यात सरकारची भुमिका महत्वाची…

Read More

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने वारीतील दिंडी प्रमुख, भजनी मंडळांचा गौरव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राला धारकरी आणि वारकरी अशी मोठी परंपरा आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तर दुसरीकडे संतांच्या छत्रछायेखाली एकवटलेला वारकरी संप्रदाय आपल्याला पाहायला मिळतो. संत ज्ञानेश्वर माऊलींनी कुठल्याही जातीभेदाला थारा न देता सर्वांना सामावून घेत पंढरीची वारी सुरू केली. आज शेकडो वर्षे झाली ही वारी आणि वारकरी संप्रदाय जातीभेद विसरून देवाप्रती समर्पण भावनेने विठ्ठलाच्या चरणी लीन झालेले आहेत. ज्ञानोबा तुकोबांची ही शिकवण महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या मनामनात रुजलेली आहे. अशा या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील दिंडी प्रमुख आणि भजनी मंडळांचा यथोचित सन्मान करून…

Read More