ताज्या घडामोडीपिंपरी
दहा हजार पिंक रिक्षा देण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह : आशा कांबळे – पिंपरी चिंचवड शहरांमध्ये यशस्वी उपक्रम


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंक रिक्षाचा उपक्रम राज्यात सर्वात प्रथम पिंपरी चिंचवड शहरात सुरू झाला. तो यशस्वीही झाला. हा उपक्रम आता राज्यभर राबविण्याच्या विचाराधीन शासन आहे. त्यानूसार दहा हजार पिंक रिक्षा देण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन घरकाम महिला सभेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षा आशा कांबळे यांनी केले.
आशा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली की, पिंपरी चिंचवड शहरातील कागद, काच, पत्रा, वेचक, धुणी -भांडी साफसफाई आदी कष्टाची कामे करणाऱ्या शंभर महिलांना रिक्षाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा परवाना काढला. बॅच बिल्ला काढून त्यांना परमिट मिळवून देण्याचा उपक्रम कष्टकरी कामगार पंचायत व घरकाम महिला सभा संघटनेच्या वतीने राबवण्यात आला होता. सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ व माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड येथे शंभर महिलांना रिक्षाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला शासनाची मदत मिळणे अपेक्षीत होती. मात्र ती मिळाली नाही. परंतु महिलांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी केला, असे आशा कांबळे म्हणाल्या. आता या उपक्रमाची दखल महाराष्ट्र बरोबर इतर राज्यातही दखल घेतली जात आहे. महाराष्ट्र सरकारने दहा हजार पिंक रिक्षा देण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.
या निर्णयाचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी करावी, अशी मागणी घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.








