चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी
अहीर सुवर्णकार समाजाच्यावतीने वारकऱ्यांना राजगिरा चिक्की वाटप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज अहीर सुवर्णकार समाज पिंपरी चिंचवड यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे खराळवाडी (मुंबई-पुणे रोड) पिंपरी येथे वारकऱ्यांना ५०००+ पॅकेट (२५० किलो) राजगिरा चिक्की वाटप करून अतिशय आनंदात व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी अध्यक्ष भगवान वानखेडे, उपाध्यक्ष संतोष सौंदनकर, सचिव गणेश सोनार खजिनदार शिवाजी सोनार, सदस्य दीपक सोनार, सुनील निकुंभ,कैलास पैठणकर प्रवीण दुसाने महिला सदस्य स्मिता सोनार, प्रियंका सोनार, इंद्रायणी जाधव, पल्लवी दुसाने, स्वाती सोनार नयना वानखेडे, नीलम सोनार तसेच राहुल सोनार उमेश सोनार घनश्याम वानखेडे निलेश जाधव महेंद्र सोनार असे अनेक सुवर्णकार बंधू भगिनी यांनी वारकर्यान्सोबत विठ्ठल नामाचा आस्वाद घेतला.












