Author: maharashtrabreakingnews.com

पीसीयु मध्ये शिकवले जाणार अर्थविषयक फिंटेक अभ्यासक्रम !!! पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थ्यांमध्ये अर्थ व्यवस्थापन शिक्षणाची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेऊन आर्थिक शिक्षण वाढीसाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठाने (पीसीयु) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाने एनएसई अकादमीसोबत नुकताच सामंजस्य करार केला आहे. बुधवारी (दि.४) पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील आणि एनएससी अकादमीचे सह-उपाध्यक्ष एस. रंगनाथन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.       बाजारातील आर्थिक व्यवस्थापनाची मागणी पाहता विद्यार्थ्यांचा अर्थ क्षेत्राकडे जाण्याचा कल वाढला आहे. यातून अर्थ क्षेत्राची कार्यपध्दती, फिंटेक या नव्याने उभारीस आलेल्या क्षेत्राकडे विद्यार्थी उज्ज्वल भविष्य आणि स्थैर्य प्राप्त करून देणारे क्षेत्र म्हणून पाहतो. या करारामुळे पीसीयुच्या…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  स्वरा म्युझिकल आयोजित आणि साज पुणे प्रस्तुत ‘ये इश्क नहीं आसां’ या  गजल गायन मैफिलीत  लोकप्रिय शायरांच्या गजल पारंपरिक पध्दतीने सादर झाल्या. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (छोटे सभागृह) येथे गुरुवार, दिनांक ०४ जुलै २०२४ रोजी सादर करण्यात आलेल्या उर्दू गजलांच्या मैफलीतील शृंगाररसात रसिक रंगून गेले. डॉ. शशिकला शिरगोपीकर, कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर आणि गायत्री सप्रे  – ढवळे या गायक कलाकारांनी अभिजात शास्त्रीय संगीतातील रागांवर आधारित या उर्दू गजलांचे सुरेल सादरीकरण करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. “रंज की जब गुफ्तुगू होने लगी…” (दाग दहेलवी), “कभी कहा ना किसीसे तेरे फसाने की…” (कमर जलालाबादी), “छुपाऊ लाख…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दस्ताऐवजांवर उमेदवाराच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे आणि महानगरपालिकेतील सर्व प्रशासकीय कामकाज मराठी भाषेतून करणे या दोन्ही शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यास पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरूवात केली आहे. त्यानुसार आयुक्त शेखर सिंह यांच्या नामफलकासह इतर अधिकाऱ्यांच्या नामफलकामध्ये आईच्या नावाचा समावेश करण्यात आला असून आयुक्त दालनाबाहेरील आयुक्तांचा नामफलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय दस्ताऐवजांवर मराठी भाषेत स्वाक्षरी करण्यास देखील सुरूवात केली आहे. महापालिका कामकाज आणि व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करण्याबाबत तसेच उमेदवाराच्या नावापुढे आईच्या नावाचा समावेश करण्याबाबत राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाद्वारे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत. या निर्णयांची अंमलबजावणी करत आयुक्त शेखर…

Read More

     पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात जन्म मृत्यू दाखल्याबाबत चाललेली नागरिकांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील मनपा कार्यालयात जन्म मृत्यू दाखल्याची प्रत देण्याचे काम गेल्या एक महिनाभरापासून बंद आहे त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे मा. आयुक्त साहेब आपल्या महापालिकेच्या वतीने पूर्वी ज्या सॉफ्टवेअर मधून हे जन्म मृत्यू दाखले दिले जायचे ते सॉफ्टवेअर बंद झाले असून त्याजागी अत्याधुनिक नवीन सॉफ्टवेअर १५ दिवसापूर्वी घेण्यात आले आहे, परंतु ते सॉफ्टवेअर आजच्या तारखेपर्यंत…

Read More

चिंचवडला हातगाडी,स्टॉलवरील कारवाईला विरोध पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी न करता नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत अशा सर्वच विक्रेत्यावरती कारवाईचा बडगा उगारलेला आहे. रस्ता शुशोभीकरण आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली असं गोरगरिबांना चिरडून टाकणं आणि त्यांचे साहित्ये जप्त करणे अत्यंत चुकीचे असून महानगरपालिकेने फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिला. चिंचवड स्टेशन मोहननगर येथे विक्रेत्यांनी एकत्र येऊन मनपा कारवाईस विरोध केला.यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, नीमंत्रक सलीम हवालदार, मनसेचे नितीन चव्हाण, संभाजी वाघमारे ,दिनेश नामदे, प्रकाश मोरे,संतोष कोळी, अनिल गिरी, विनायक थंबी…

Read More

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार  सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संवाद यात्रेचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – मागील सात वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना शिक्षण, पाणी, वाहतूक, आरोग्य, कचरा, प्रदूषण, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, महिला सुरक्षितता अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्यात राज्य सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे या सामान्य नागरिकांचा आवाज भ्रष्टाचारात बुडालेल्या आणि कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाच्या समोर मांडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने रविवारी ७ जुलै पासून आकुर्डी परिसरातून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता, आकुर्डी, दत्तवाडी, छत्रपती शिवाजी…

Read More

– आयुक्तालय, मुख्यालय इमारतींचा प्रश्न सुटणार? पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासंदर्भात पोलीस आयुक्तालय, मुख्यालय, हौसिंग कॉलनी तसेच, दापोडी पोलीस स्टेशन निर्मिती व चिखली पोलीस ठाण्याकरिता जागा अशा विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार महेश लांडगे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘फॉलोअप’ कायम ठेवला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रलंबित मुद्यांवर सविस्तर निवेदन दिले आहे. यासंदर्भात सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमदार लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मिती २०१८ मध्ये करण्यात आली.…

Read More

पहिल्याच दिवशी २५ हजार महिलांना अर्जांचे वाटप, तर १५ हजार महिलांचे अर्ज भरले पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चिंचवड विधानसभा मतदारसंघात गुरूवारी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी चिंचवड मतदारसंघातील तब्बल २५ हजार महिलांना या योजनेच्या अर्जांचे वाटप करून १५ हजार महिलांचे ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने प्रत्यक्षात अर्ज भरण्यात आले. संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. त्यासाठी झेरॉक्सपासून ते योजनेला लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे महिलांना भाजपकडून मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.…

Read More

– राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन – भाजपा आमदार महेश लांडगे यांची लक्षवेधी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य शासनाचे आर्थिक नुकसान होणार नाही. याची चाचपणी करुन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील मिळकती ‘फ्री होल्ड’ करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी विधानसभा सभागृहामध्ये दिले. मुंबई येथे राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ९७ हजार ४१४ मालमत्ता भाडेपट्टा करारमुक्त (फ्री होल्ड) कराव्यात, अशी मागणी लक्षवेधीद्वारे केली. यावर उत्तर देताना कॅबिनेट मंत्री सामंत यांनी प्राधिकरणवासीयांना आश्वासित केले. आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड नवनगर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ओजीडब्ल्यू फाऊंडेशन ही संस्था दुर्गम भागामध्ये जाऊन ज्या ठिकाणी खरोखर ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण त्याच्या परिस्थिती नुरूप शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांन पर्यत पोहोचते, त्या ठिकाण ची माहिती काढून त्या गावातील शाळेमध्ये किंवा शिक्षण घेत असताना त्या मुलांना ज्या अडचणी येतात त्यावर कशी मात करायची,त्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल याचा विचार ही संस्था आपले कार्य करीत असताना करते,नोटबुक्स ,पेन,पेंशील, खोडरबर,बॅग लिहिण्याचे पॅड, रेनकोट , छत्री ,अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप आताच अंदर मावळात, माळेगाव ब्रू, तडपेवाडी या दोन गावांमध्ये केले. माळेगाव ब्रू (मावळ) या शाळेतील शिक्षक श्री मनीष टोके सर म्हणाले…

Read More