- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
१८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिमाखात संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कवीवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेने १८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी येथील ‘कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य नगरी’त (महात्मा फुले महाविद्यालय) आयोजित केले होते हे संमेलन रविवारी अतिशय उत्साहात पार पडले. साहित्याचा जागर, मान्यवरांची उपस्थिती आणि राज्यस्तरीय काव्यस्पर्धेने या सोहळ्याला विशेष रंगत आणली. मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन संमेलनाचे उद्घाटन गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक दशरथ परब यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी नारायण सुर्वे यांच्या साहित्यातील कामगार जाणीवांचा वेध घेतला. संमेलनाध्यक्ष उमेश शंकर गाड यांनी मराठी साहित्याच्या…
क्षेत्रीय कार्यालयांच्या संख्या वाढीस राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध; नगरसेवक जितेंद्र ननावरे यांची भूमिका पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरात दोन नवीन क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्याच्या प्रस्तावाला यांनी विरोध दर्शविला असून, असे मत नगरसेवक यांनी मांडले.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात करण्यात आले होते. त्यावेळी जितेंद्र ननावरे यांनी मुद्दे उपस्थित केले. अपुरा आर्थिक पुरवठा, मनुष्यबळाची कमतरता आणि स्वतंत्र प्रशासकीय इमारतींचा अभाव या पार्श्वभूमीवर नवीन कार्यालये निर्माण केल्यास प्रशासनावर अतिरिक्त ताण येईल आणि नागरिकांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतील, असे ननावरे यांनी स्पष्ट केले. “नवीन क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्यापेक्षा विद्यमान कार्यालये अधिक सक्षम करून त्यातूनच नागरिकांना दर्जेदार व…
आळंदी आणि देहू संस्थाना पदाधिकारी आणि प्रशासन बैठक संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू व आळंदी पालखी मार्गावरील विविध विकासकामे १५ मे पूर्वी पूर्ण करण्यात यावीत, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना दिली. देहू व आळंदी संस्थानांकडून प्राप्त मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनामार्फत ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली. देहू ते देहू रोड या पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील तीन किलोमीटर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दोन किलोमीटरचे काम संबंधित संस्थामार्फत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. या कामासाठी आवश्यक असलेले देहूरोड कटम मंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्ये विकसित करणे तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा आणि शहरी संस्कृतीचे जतन करणे या उद्देशाने दरवर्षी पवनाथडी जत्रा आयोजित करण्यात येते .यावर्षी पवनाथडी जत्रा दिनांक २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत सांगवी पी.डब्ल्यू.डी. मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे.पवनाथडी जत्रा ही महिला बचत गटांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरली आहे. पवनाथडी जत्रेत सहभागासाठी अर्ज वाटप व स्वीकृती दिनांक १० फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आली. महिला बचत गटांकडून खालीलप्रमाणे अर्ज प्राप्त झाले आहेत. जनरल प्रवर्ग –…
महापौर रवि लांडगे यांनी घेतली आरोग्य विभागाची घेतली आढावा बैठक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या रात्रीच्या स्वच्छता उपक्रमासह आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा महापौर रवि लांडगे यांनी आज घेतला. यावेळी रात्रीच्या स्वच्छता मोहिमेत महिलांची शिफ्ट बंद करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. संबंधित अधिकाऱ्यांकडून उपक्रमाचे फायदे जाणून घेतल्यानंतर रात्रीची स्वच्छता मोहीम सुरू ठेवावी; मात्र त्यामध्ये केवळ पुरुष कर्मचाऱ्यांचा सहभाग ठेवावा, असेही ते म्हणाले. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. शहर स्वच्छ ठेवणे ही प्रशासनासोबत नागरिकांचीही जबाबदारी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात पार पडणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यपत्रिकेनुसार, या विशेष सभेत स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची नियुक्ती केली जाणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित कलमानुसार अध्यक्षांची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या बैठकीसाठी आवश्यक नियम व तरतुदी लागू राहणार असून, संबंधित विभागीय आयुक्त किंवा त्यांच्या प्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडेल. स्थायी समितीला महापालिकेची ‘तिजोरीची चावी’ मानले जाते. महापालिकेच्या आर्थिक व प्रशासकीय…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १८, केशवनगर चिंचवड येथे चैतन्य मेडीकोसमोर तसेच उद्यम सहकारी बँकेसमोरील अत्यंत वर्दळीच्या चौकात गेल्या दोन महिन्यांपासून चेंबरला मोठा आणि धोकादायक खड्डा पडलेला आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असून अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत वारंवार महापालिकेकडे तक्रारी केल्या. संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती देऊनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मुख्य रस्ता आणि प्रमुख चौकाच्या मधोमध मोठा खड्डा असल्यामुळे दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला…
शाहूनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवजयंती निमित्त श्री शाहू सार्वजनिक वाचनालय, शाहूनगर यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे प्रशिक्षक विलास जेऊरकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल यांनी प्रास्ताविक केले. मनिषा पाटील यांनी शिवरायांचा पाळणा सादर करून उपस्थितांच्या मनात शिवभक्तीची भावना जागृत केली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कैलास दुर्गे , वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेश सहाणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याचा आढावा घेत उपस्थितांना शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग ओघवत्या शैलीत सांगितले. रवींद्र अडसूळ आणि तेजश्री…
“निडर २०२६” स्पर्धेत पीसीसीओईच्या आपत्ती व्यवस्थापन ड्रोनला रौप्यपदक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज फॉर ड्रोन ॲप्लीकेशन अँड रिसर्च (निडर २०२५-२६) या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पीसीसीओई महाविद्यालयाने “आपत्ती व्यवस्थापन” विभागात सादर केलेला ड्रोन प्रकल्प सर्व तांत्रिक अटी, शर्ती पूर्ण करून रौप्यपदक आणि चार लाख रुपयांच्या बक्षीसाचा मानकरी ठरला. आपत्ती व्यवस्थापनात आणीबाणीच्या प्रसंगी उद्भवणाऱ्या परिस्थितीत बचाव कार्य करण्यासाठी पीसीसीओईने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून विकसित केलेले हे ड्रोन उपयोगी ठरेल असे प्रतिपादन पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी केले. नवी दिल्ली, ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठ येथे आयोजित केलेल्या नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज फॉर ड्रोन अँप्लिकेशन अँड रिसर्च (NIDAR)…
डॉ. मनीषा बोरा कार्याध्यक्षपदी, तर प्रा. शरयू पवार स्वागताध्यक्षपदी पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विश्वबंधुता साहित्य परिषद, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन पुणे या संस्थांच्या वतीने आयोजित २८ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांची निवड करण्यात आली आहे. १२ एप्रिल २०२६ रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हे संमेलन होणार आहे. संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी प्राचार्य डॉ. मनीषा बोरा, तर स्वागताध्यक्षपदी साहित्यिक प्रा. शरयू पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीस प्रा. शंकर आथरे यांनी दिली. प्रा. शंकर आथरे म्हणाले, “प्रकाश रोकडे यांनी गेल्या पाच दशकांपासून…
