Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या वतीने ३१व्या श्रावणी काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक कवींनी ३१ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत आपल्या कविता पाठवाव्या, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी केले आहे. सदर काव्यस्पर्धेत काव्यलेखनासह प्रत्यक्ष सादरीकरणाचे गुण ग्राह्य धरले जाणार असून कवितेला विषयाचे बंधन नाही. कविता वीस ओळींपेक्षा दीर्घ असू नये. कवितेच्या आधी ‘नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित श्रावणी काव्यस्पर्धा ३१’ असा उल्लेख करून शीर्षक, कविता, कवीचे संपूर्ण नाव, परिसर आणि संपर्क क्रमांक नमूद करावा. कवितेतून कोणत्याही प्रकारची राजकीय, सामाजिक, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त ग्रंथदिंडी व निर्मलवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी वारकऱ्यांचा वेश परिधान करून दिंडीमध्ये ग्यानबा-तुकारामचा जयघोष व हरिनामाचा जयजयकार करीत दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. हरिनामाच्या गजराने सर्वच परिसर भक्तिमय झाला होता. संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते दिंडी व ग्रंथपूजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प भंगवत गायकवाड शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, तसेच पालक विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अनेक विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठूनामाचा जयजयकार करीत, तर…

Read More

आमदार अमित गोरखे यांच्या विजय प्रचंड गर्दी.!!! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपा महायुती चे ९ च्या ९ उमेदवार विजयी झाले, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी ठरली, महाविकास आघाडी च्या काही आमदारांनी महायुतीला पाठींबा दर्शविला. या ९ उमेदवारां पैकी देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय अशी ओळख असणारे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे यांचा विजय झाला. या विजयी प्रसंगी पिंपरी चिंचवड भाजपा व अमित गोरखे मित्र परिवाराच्या वतीने वतीने भव्य विजयी रॅली काढण्यात आली,या रॅलीचे नियोजन पिंपरी विधानसभा क्षेत्रातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारक…

Read More

पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतोय डेंग्यूचा प्रादुर्भाव ढिसाळ आरोग्य यंत्रणा आणि महानगरपालिकेचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून डासोत्पत्ती स्थळ तयार होत आहेत. वाकड, मोशी आणि वाल्हेकरवाडी परिसरात डेंग्यूचे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांना रुग्णालयात पुरेसे खाट उपलब्ध नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व गोष्टींकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व गोष्टींकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ बंद करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, युवा नेते विशाल वाकडकर यांनी केली आहे. डेंग्यू, चिकुनगुनियासारखे आजार…

Read More

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुटुंबाचा कणा असलेल्या महिलेचे स्वतःच्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष असते यातून जडणारे विविध आजार आणि प्रामुख्याने वाढलेले ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. पण वेळीच उपचार केले तर तो राक्षस पळवता येतो. ही बाब लक्षात येताच लाडक्या बहिणींसाठी राहुल कलाटे सरसावले आहेत. त्यांनी स्तन कर्करोग जनजागृती व तपासणी शिबिराचा उपक्रम हाती घेतला आहे. राहुल कलाटे फाउंडेशनच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ह्या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. गेल्या बारा दिवसात वाकड आणि परिसरातील २१ सोसायट्यात झालेल्या शिबिराचा सुमारे तीन हजार महिलांनी लाभ घेतला. त्यामुळे ह्या शिबिराची गरज लक्षात घेऊन चिंचवड विधानसभा क्षेत्रात एकाच वेळी विविध ठिकाणी हे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी विविध तांत्रिक अडचणी निर्माण होत असून त्यासाठी बराच वेळ खर्ची होत आहे.  त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या केंद्रांवर ज्या पात्र महिलांचे अर्ज भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत त्यांचे आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घेऊन त्यानंतर ते अर्ज क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने  भरावेत,  अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच महिलांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  पात्र…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि एमआयटी विज्ञान कला आणि वाणिज्य महाविद्यालय आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने व वनविभागाच्या सहकार्याने चाकण वनपरिक्षेत्र कोयाळी गावच्या बाजूला असलेल्या वनजमिनीवर वड, पिंपळ, आंबा, करंज,जांभूळ कडुनिंब चिंच यासारख्या २१५ देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. येणाऱ्या जोरदार पावसाच्या सरीचा आनंद घेत जवळपास ४० स्वयंसेवकांनी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मोहन गायकवाड संस्थापक अध्यक्ष संस्कार प्रतिष्ठान यांनी केले. फक्त पर्यावरण दिनानिमित्त झाडे न लावता पावसाळ्यात अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत या उद्देशाने संस्कार प्रतिष्ठान वर्षाला पाच ते दहा हजार वृक्ष लागवटीचं…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)विभागाकडून शहराध्यक्ष मयूर जाधव यांनी दर रविवारी पिंपरी विधानसभेत आयोजित केलेली संवाद यात्रेचा दुसरा रविवाराची पदयात्रा काल दापोडी परिसरात नेहरू चौकातील शहीद भगतसिंग पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे महात्मा फुले नगर, आत्तार वीटभट्टी,एसएमएस कॉलनी, पवार वस्ती,गुलाब नगर,जय भीम नगर अशी मार्गक्रमण करत तानाजी मालुसरे स्मारकाजवळ यात्रेची सांगता झाली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये सामान्य नागरिकांना पडणाऱ्या अडचणी,अनेक प्रलंबित काम यासोबतच विद्यार्थी,तरुण, महिला,कामगार,कष्टकरी छोटा दुकानदार, व्यापारी या सगळ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत नागरिकांची संवाद साधत राष्ट्रवादी…

Read More

– मतदार संघातील विविध विकासकामांचा शुभारंभ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदार संघातील सोसायटीधारक, सर्वसामान्य नागरिक आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या हिताच्या दृष्टीने पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. सँडविक कॉलनी येथील उद्यानाच्या सुशोभिकरण कामाला सुरूवात झाली आहे, अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली. सँडविक कॉलनी उद्यान सुशोभिकरणाचे काम मार्गी लावण्याबाबत स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका भीमाताई फुगे, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, माजी नगसेवक सागर गवळी, दत्ता गव्हाणे, कविता भोंगाळे, सम्राट फुगे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, सदगुरूनगर येथे श्रीदत्त मंदिराच्या सभामंडपाचे काम मार्गी…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अमरावती येथे झालेल्या U.. 10 राज्यस्तरीय धनुर्विद्या सिलेक्शन ट्रायल स्पर्धेमध्ये विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय व श्रीमती सी के गोयल प्राथमिक विद्यालय ची विद्यार्थिनी कु भार्गवी पवार इ 4 थी हिची राज्यस्तरीय धनुविद्या नॅशनल सिलेक्शन ट्रायल स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त करून तिची राष्टीय स्पर्धेकारिता निवड झाली विद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा जगदीश दादा जाधव यांच्या  हस्ते गौरव करण्यात आला तसेच सचिव  संजयभाऊ जाधव, संचालक, विजय जाधव, अमित बच्छाव यांनी अभिनंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य  बाळाराम पाटील, प्राथ मुख्याध्यापक  साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उप मुख्याध्यापक  सुषमा संधान कोअर कमिटी सदस्य  मनीषा…

Read More