आळंदी येथे संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने वृक्षारोपण
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि एमआयटी विज्ञान कला आणि वाणिज्य महाविद्यालय आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने व वनविभागाच्या सहकार्याने चाकण वनपरिक्षेत्र कोयाळी गावच्या बाजूला असलेल्या वनजमिनीवर वड, पिंपळ, आंबा, करंज,जांभूळ कडुनिंब चिंच यासारख्या २१५ देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. येणाऱ्या जोरदार पावसाच्या सरीचा आनंद घेत जवळपास ४० स्वयंसेवकांनी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मोहन गायकवाड संस्थापक अध्यक्ष संस्कार प्रतिष्ठान यांनी केले.
फक्त पर्यावरण दिनानिमित्त झाडे न लावता पावसाळ्यात अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत या उद्देशाने संस्कार प्रतिष्ठान वर्षाला पाच ते दहा हजार वृक्ष लागवटीचं उद्दिष्ट ठेवत असते प्रत्येकाने महिन्यातून एक दिवस तरी पर्यावरणासाठी दिला पाहिजे झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा, वृक्षतोड टाळा असा पर्यावराणाचा संदेश दिला.
संतोष कंक वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण, अचल गवळी वनपाल, धनराज तोंडे वनपाल अजय कोळेकर वनपाल यांचे सहकार्य लाभले.
यावेळी एमआयटी विज्ञान कला आणि वाणिज्य महाविद्यालय आळंदी ते प्राचार्य डॉक्टर बी बी वाफरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर पद्मावती उंडाळे वाणिज्य शाखा विभाग प्रमुख अरविंद वागस्कर राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी आणि पल्लवी महागावकर विद्यार्थी कल्याण अधिकारी हे सहभागी झाले होते. संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड, खजिनदार मनोहर कड, संचालिका प्रिया पुजारी, आनंद पुजारी, सायली सुर्वे, भानुप्रिया पाटील, विकास पाटील, प्रणव पाटील, हर्षाली पाटील, मोहिणी सुर्यवंशी, अर्पिता आजगावकर, मीनाक्षी मेरूकर, वैष्णवी पुजारी, संध्या स्वामी, संजीत पद्मन, राधिका पांडे, गुलाफशा खान हे सभासद सहभागी झाले होते.माजी उपाध्यक्षा रंजना जोशी यांनी आभार मानले.