तीन हजार महिलांनी घेतला स्तन कर्करोग जनजागृती व तपासणी शिबिराचा लाभ चिंचवड विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी शिबीर
वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुटुंबाचा कणा असलेल्या महिलेचे स्वतःच्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष असते यातून जडणारे विविध आजार आणि प्रामुख्याने वाढलेले ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. पण वेळीच उपचार केले तर तो राक्षस पळवता येतो. ही बाब लक्षात येताच लाडक्या बहिणींसाठी राहुल कलाटे सरसावले आहेत. त्यांनी स्तन कर्करोग जनजागृती व तपासणी शिबिराचा उपक्रम हाती घेतला आहे.
राहुल कलाटे फाउंडेशनच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ह्या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. गेल्या बारा दिवसात वाकड आणि परिसरातील २१ सोसायट्यात झालेल्या शिबिराचा सुमारे तीन हजार महिलांनी लाभ घेतला. त्यामुळे ह्या शिबिराची गरज लक्षात घेऊन चिंचवड विधानसभा क्षेत्रात एकाच वेळी विविध ठिकाणी हे शिबिर राबविण्यात येत आहे. रहाटणी, पिंपळे सौदागर, सांगवी ह्या भागातील शिबिराची सुरुवात रहाटणीतील रॉयल रहाडकी ग्रीन सोसायटीपासून शनिवारी (ता. १४) झाली. लोकांच्या मागणीनुसार पुढे हे शिबिर कायम घेण्यात येणार आहे.
यावेळी माजी नगरसेवक राहुल कलाटे अन्य मान्यवर, रॉयल रहाडगी सोसायटीचे सर्व कमिटी मेंबर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात सर्वात आधी तज्ञ डॉक्टर व स्टाफ मार्फत शारीरिक तपासणी होते, नंतर खास लंडनहून आणलेल्या महागड्या ब्रेस्ट लाईट मशीनद्वारे विविध चाचण्या होतात. त्या चाचणीत काही गैर आढळल्यास मॅमोग्राफी टेस्ट होते. गरजेनुसार पुढील उपचार व सर्जरी करण्याचीही सुविधा आहे. तसेच शिबिरस्थळी तज्ञ डॉक्टरांमार्फत सर्व शंकांचे निरसनही केले जाते.
शिबिरासाठी ८८०५०४५९९९, ८८०६०३६९९९ ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कॅन्सरला वेळीच ओळखून उपचार सुरु केल्यास त्यावर विजय मिळवणं सहज शक्य आहे. मात्र, नियमित तपासण्यांकडे महिलांचे दुर्लक्ष असते. यातून कॅन्सर तीसऱ्या-चौथ्या स्टेजला गेल्यावर सर्वांचा नाईलाज होतो. तो त्या स्टेपला जाण्याआधी वेळीच सावध व्हावे यातून पुढील अनर्थ टळावा म्हणून हे शिबीर आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा.
– राहुल कलाटे