- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय अर्थसंकल्प आज निर्मला सीतारामन यांनी सादर केला वास्तविक जुन्या अनेक योजनांना नवीन मुलामा देऊन शिळ्या कढीला ऊत देण्याचा प्रकार आहे. भारतातील लोकसंख्येपैकी ६५% टक्के हे ३५ वर्षा खालील बेरोजगार तरुण आहेत त्यातीलही ५१ % युवकांच्या हाताला कोणतेही काम नाही, कॉलेजमधून दरवर्षी पास होणाऱ्या युवकांसाठी रोजगार उपलब्धीचा कार्यक्रम सरकारकडे दिसत नाही. स्किल इंडियासाठी २ लाख कोटींची तरतूद आहे मात्र यामधून किती तरुणांनी प्रशिक्षण घेतले ? त्यातील कितीना रोजगार मिळाला की केवळ संस्था चालकांच्या हितासाठीच हा कार्यक्रम आहे. भारतातील ५०० कंपन्यांमध्ये १ कोटी प्रशिक्षणार्थी ना केवळ ५ हजार यातून कायम रोजगार नष्ट करण्याचा प्रकार आहे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील नेहरूनगर न्यायालयात पिंपरी चिंचवड परिसरातील वकील पाल्यांच्या दहावी – बारावीत यश संपादन केलेल्या ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उतीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा संपन्न झाला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कामगार कल्याण युवा मंचाचे संस्थापक ॲड.अमोल लक्ष्मण खांडेकर लाभले होते तर कार्यक्रमास प्रमुक उपस्थिती म्हणून माजी अध्यक्ष ॲड.नारायण रसाळ, ॲड.अरुण खरात, ॲड.सुनिल कडूसकर, ॲड.बी.के कांबळे, मा.उपाध्यक्ष ॲड.प्रतिक जगताप हे लाभले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.अमोल खांडेकर यांनी “ सोशल मिडिया हे दुधारी शस्त्र आहे त्याचा वापर सांभाळून करणे कसे गरजेचे…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पिंपरीत निषेध आंदोलन पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकतेच बालेवाडी येथे पार पडलेल्या भाजपच्या अधिवेशनादरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे भाग्यविधाते, लोकनेते शरदचंद्र पवार साहेबांबद्दल अतिशय खोटारडी व खालच्या पातळीवर टीका केली. देशाच्या गृहमंत्री पदावरील व्यक्तीने बाहेरून येऊन इथे आपल्या महाराष्ट्रात पवार साहेबांवर टीका करणे अतिशय निंदाजनक व संतापजनक असून महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेच्या भावनांचा त्यांनी अपमान केला आहे. हा स्वाभिमानी महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही, असे सांगत भाजपच्या अमित शहांचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज पिंपरी येथे…
पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापुरुषांना काळाच्या परिप्रेक्षात पाहावे लागते, त्यातूनच त्यांच्या विचारांचे सूत्र समजते. महापुरुषांच्या विचारांमध्ये मतभेद होते तरी त्यांची भूमिका संवादी होती. लोकमान्य ते लोकशाहीर या प्रवासात जनजागृती, सामाजिक व्यवस्था, राष्ट्रीय विचारांचाच जागर केला गेला. महापुरुषांना जाती-पातीत विभागणे म्हणजे राष्ट्रीय पाप आहे. त्यांच्या विचारांमधील मर्यादा वजा करून त्यांचे कल्याणकारी वैचारिक सामर्थ्य स्वीकारावे, असा सूर परिसंवादात उमटला. मातंग साहित्य परिषद, पुणेतर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘टिळक, आगरकर, अण्णा भाऊ साठे यांच्या संवादी भूमिकांची बेरीज’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रीय भटक्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डेंग्यूला शहरातून हद्दपार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने डेंग्यूमुक्त पिंपरी चिंचवड शहर अर्थात “बीट डेंग्यू’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये घराच्या आजूबाजूच्या परिसरात डासांची निर्मिती होऊ न देणे, डेंग्यू आणि इतर किटक कीटकांपासून होणार्या आजाराची माहिती असणे, आपल्या आजुबाजुला डेंग्यूचे रुग्ण आढळल्यास महापालिकेच्या रुग्णालयांना कळवणे, आपले घर आणि परिसरात कोठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे आणि पाणी साठवणूक करणारे पात्र कोरडे करणे राखणे या उपाययोजनांचा समावेश आहे. तरी नागरिकांनी डेंग्यूपासून स्वत:चे आणि कुटुंबियांचे रक्षण करण्यासाठी या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी आणि अभियान यशस्वी करण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेच्या माध्यमातून करण्यात आले. पिंपरी चिंचवड…
उपाध्यक्ष नलावडे, सचिव रानवडे व खजिनदारपदी भुजबळ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदावर चारुशिला किशोर जोशी यांची निवड करण्यात आली. सोमवारी (दि.२२) संचालक मंडळाची बैठक निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे (शहर-१) संतोष लादे यांच्या अध्यक्षतेखाली व पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये विजय मुरलीधर नलावडे (उपाध्यक्ष), योगेश सुर्यकांत रानवडे (सचिव) आणि विशाल बाळासाहेब भुजबळ (खजिनदार) यांचा समावेश आहे. यावेळी पतसंस्थेचे पदाधिकारी व विद्यमान संचालक यांनी माजी अध्यक्ष झिंजुर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार विनम्र…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकींग न्यूज) – न्यू सिटी प्राइड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.उर्मिला ठोंबरे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत उपस्थित होते. निशा पवार यांनी गुरुचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. श्रावणी सोळुंके, राहुल चौधरी अभास मिश्रा, सार्थक ननवरे,श्लोक काटे, यशश्री भोसले, एंजल परिहार या मुलांनी शिक्षकांविषयी माहिती सांगितली. अर्पिता तिवारी व लुंबिनी मालगे यांनी सूत्रसंचालन केले. अरसलान शेख यांनी आभार मानले.
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “सर्व जातीपातींना एकत्र आणणारे अध्यात्म गरजेचे आहे!” असे विचार ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त गांधीपेठ तालीम मित्रमंडळाने आयोजित केलेल्या ‘मन करा रे प्रसन्न’ या मासिक प्रवचनमालिकेंतर्गत ‘अध्यात्म, गुरू आणि शिष्य’ या विषयावर निरूपण करताना डॉ. संजय उपाध्ये बोलत होते. आळंदी देवस्थानचे विश्वस्त अभय टिळक, डॉ. प्रताप कोठारी, सुबोध गलांडे, विकास नाणेकर, विनायक यादव, साधना काळे आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अंजली कुलकर्णी, चंद्रकला शेडगे, नेहा कुंभोजकर, गीतल गोलांडे, हेमा सायकर, सुप्रिया सोळांकुरे, रत्नमाला बोरकर, मंदाकिनी चोपडे यांनी डॉ. संजय उपाध्ये यांना…
दहा हजारहून अधिक रुग्णांनी घेतला आरोग्य शिबीराचा लाभ पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रभाग स्तरीय मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड मतदारसंघातील विविध १३ ठिकाणी आयोजित या शिबीरांमध्ये १० हजाराहुन अधिक गोरगरीब रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले. तसेच महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सर्व रुग्णांना फळ व बिस्कीटांचे वाटप करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, शहर सरचिटणीस विलास मडिगेरी नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, अभिषेक बारणे, उपाध्यक्ष राजू दुर्गे, रुग्णालयाचे अधिष्ठता राजेश वाबळे, वैद्यकीय अधीक्षक…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ,पिंपरी चिंचवड शहर यांच्या तर्फे सलग सहाव्या वर्षी १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे यशस्वी रित्या आयोजन काशिधाम मंगल कार्यालय चिंचवड येथे करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांमधून सुमारे १५० विद्यार्थी आणि त्यांचे पालक असे जवळपास ५०० लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या विशेष प्रयत्नातून ५ हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रशिस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीचे प्रमुख श्री निशिकांत पटवर्धन यांना ब्रम्हभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या…
