Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे असून प्रत्यक्ष कामातून ते समाजासमोर आदर्श उभा करत असतात. सेवा बजावताना या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी केली. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट देऊन पिंपरी चिंचवड महापालिका सेवेत कायम तसेच कंत्राटी असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच विविध संघटनाकडून बैठकीत प्राप्त झालेल्या सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देखील एम. व्यंकटेशन यांनी दिले. महापालिकेच्या पिंपरी…

Read More

सरकारी कार्यालयाच्या खेपा मारायची गरज नाही नेटवर्क समस्यामुळे पावसाळ्यात धान्य वाटपास ऑफलाईन परवानगी हवी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता यांची मागणी पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारकडून आता नागरिकांना ई-शिधापत्रिका (ई-रेशनकार्ड) मिळणार आहेत. त्यामुळे लोकांना आता सरकारी कार्यालयाच्या खेपा मारायची गरज नाही. या शिथापत्रिका ऑनलाइन अर्ज करून उपलब्ध होणार आहेत. मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवर या शिधापत्रिका आपल्याला डाऊनलोड करून ठेवता येणार आहे; तसेच गरज पडेल तेव्हा त्याची प्रिंटआऊटदेखील आपण घेऊ शकतो. विशेष बाब म्हणजे ही ई-शिधापत्रिका निःशुल्क मिळणार आहे. त्याची कार्यवाही सध्या सुरू झाली आहे. त्याचा राज्यभरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ऑल महाराष्ट्र फेअर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशामध्ये 25 कोटी चालकांची संख्या असून 45 कोटी असंघटित कामगार आहेत. त्या मध्ये फेरीवाले, हातगाडीधारक, पथारीधारक, फळभाजी विक्रेते, बांधकाम मजूर, साफसफाई कामगार, कष्टकरी कामगारांचा समावेश होतो. या घटकांना पेन्शन देणारा कायदा अस्तित्वात आला पाहिजे. सातत्याने ही मागणी होत आहे. त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. देशातील 25 टेम्पो, ट्रक, बस, ऑटो, टॅक्सी आदींसह सर्व प्रकारच्या चालकांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय चालक आयोगाची घोषणा केली पाहिजे. तसेच त्यांच्यासाठी सरकारने महामार्गावर एक हजार चालक भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे. त्याची सकारात्मक त्वरित कार्यवाही केली जाईल, अशी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २३ जुलै रोजी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकार देशातील नागरिकांना तीनशे वीज युनिट मोफत देणार आहे, दुसरीकडे पंजाब आणि दिल्ली सरकार ही योजना त्यांच्या राज्यात राबवत असताना भाजप सरकार त्यांना नावं ठेवत होतं. आता भाजपचे केंद्रीय अर्थमंत्री थेट देशात ही योजना राबवायला निघाले आहेत. तीही सबसिडी न देता चक्क मोफत. अशाने लोकं आर्थिक बाबतीत पंगु होतील. दुसरीकडे देशाच्या वीज कंपन्या तोट्यात चालल्या आहेत. मोफतऐवजी भाजप सरकारने वाढीव वीज दर कमी करावेत. रेवड्या वाटण्याचा प्रकार बंद करावा.’ –  संतोष सौंदणकर, सदस्य – महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती, पुणे जिल्हा

Read More

– देशात रोजगार निर्मिती अन्‌ उद्योगविश्वाला प्रोत्साहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकार व अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशातील सर्वसामान्य करदाता यांना दिलासा देणारा आणि बलशाली राष्ट्र उभारणीला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम ‘क’अंतर्गत सरकार पहिल्यांदा नोंदणी केलेल्या कर्मचार्‍यांना एक महिन्याचे वेतन देण्यात येणार आहे. एक लाख रुपयांपर्यंत वेतन असणारे नोकरदार या योजनेसाठी पात्र असतील. उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच, रोजगार देणार्‍यांनाही फायदा होणार आहे. सर्व क्षेत्रांतील नियोक्त्यांसाठी सरकार दोन वर्षांसाठी दरमहा प्रतिकर्मचारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (दि.23 जुलै) रोजी देशाची प्रगती करणारा अर्थसंकल्प आहे. देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार अमित गोरखे यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांचा सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. लोकसभेतील विजयानंतर 3.0मोदी सरकारचा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असून यामध्ये त्यांनी पीएम आवास योजनेसाठी 10 लाख कोटींचे वाटप करण्यासह गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी राजावर केंद्रित असून अर्थसंकल्पात रोजगार आणि कौशल्यावर भर दिला आहे.अर्थसंकल्पात तरुणांसाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यातआलेली आहे.

Read More

भविष्यात नागरी सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा मोबदला देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेने पशुसंवर्धन विभागाकडून जमीन ताब्यात घ्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहरातील नागरी सुविधा निर्मितीचे योग्य नियोजन व्हावे यासाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर प्रस्तावित स्पाईन रस्ता, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) विकसित करण्यासह त्या जमिनीवर वाढीव नागरी सुविधा उभारण्यासाठीचा एकत्रित प्रस्ताव सादर करावा. त्या जमिनीचा मोबदला पशुसंवर्धन विभागास देऊन महानगरपालिकेने जमीन ताब्यात घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आज ताथवडे (जि.पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या स्पाईन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २३ जुलै रोजी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला. उद्योजकांच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प कभी खुशी कभी गम देणारा असल्याचे पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी प्रतिक्रिया दिली. प्राप्तिकर दरात केलेले बदल स्वागतार्ह पण करमुक्त मर्यादा ५ लाख करायला हवी होती. मुद्रा कर्ज योजनेची मर्यादा १० लाख नी वाढवून २० लाख केली स्वागतार्ह पण गरजूंना बॅंकेनी कर्जवाटप केले पाहिजे. पंतप्रधान क्रेडिट गारंटी योजनेत यंत्र खरेदीसाठी १०० कोटी विनतारण कर्ज स्वागतार्ह पण सध्या ५ कोटी विनतारण कर्ज गरजूंना तारण ठेवल्याशिवाय बँक देतच नाही. बँकांना सरकारने कडक आदेश द्यावेत.अडचणीत असलेल्या सूक्ष्म, लघू…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2024 – 25 चा अर्थसंकल्प आज लोकसभेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आपले सत्तेतील महत्त्वाचे भागीदार असलेल्या चंद्रबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशला आणि नितीश कुमार यांच्या बिहारला विशेष आर्थिक पॅकेज देऊन इतर राज्यांवर अन्याय केलेला आहे. त्यामुळे संघराज्य पद्धतीला धोका निर्माण होऊ शकतो. देशातील सर्वात जास्त महसूल मिळवून देणारे राज्य म्हणून महाराष्ट्रा कडे पाहिले जाते, परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता आल्याचे दिसते. देशातील सत्ता टिकून राहावी यासाठी केलेली ही कसरत असून, त्यामुळे केंद्रीय निधीचे समन्यायी वाटप झालेले नाही. कृषी खर्चावर आर्थिक तरतूद वाढवणे आवश्यक होते परंतु…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – व्यापार व उद्योग क्षेत्राचा अपेक्षाभंग करणारा मात्र पगारदार करदात्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया सीए डॉ अशोककुमार पगारिया यांनी दिली. वास्तविक पाहता व्यापारी वर्ग ,उद्योजक,, स्थावर मालमत्ता आणि शेअर मार्केट यामधील गुंतवणूकदार यांना या अर्थसंकल्पापासून फार मोठी अपेक्षा आणि आशा होती, मात्र विशेष सवलती न देता भांडवली नफ्यावरील कर दहा टक्क्यावरून साडेबारापर्यंत आल्यामुळे शेअर मार्केटमध्ये निराशेचं वातावरण आहे आणि त्यामुळे शेअर मार्केट फार मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. पगारदार मित्रांसाठी प्रमाणित वजावट रु ही ५०००० वरून ७५०००पर्यंत वाढविली आहे.नवीन कर प्रणाली मध्ये तीन लाख उत्पन्नापर्यंत टॅक्स नाही. तीन ते सात लाख – पाच टक्के टॅक्स, सात…

Read More