ताज्या घडामोडीपिंपरी
वाढीव वीज दर कमी करावेत रेवड्या वाटण्याचा प्रकार बंद करावा – संतोष सौंदणकर

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २३ जुलै रोजी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला.
केंद्र सरकार देशातील नागरिकांना तीनशे वीज युनिट मोफत देणार आहे, दुसरीकडे पंजाब आणि दिल्ली सरकार ही योजना त्यांच्या राज्यात राबवत असताना भाजप सरकार त्यांना नावं ठेवत होतं. आता भाजपचे केंद्रीय अर्थमंत्री थेट देशात ही योजना राबवायला निघाले आहेत. तीही सबसिडी न देता चक्क मोफत. अशाने लोकं आर्थिक बाबतीत पंगु होतील. दुसरीकडे देशाच्या वीज कंपन्या तोट्यात चालल्या आहेत. मोफतऐवजी भाजप सरकारने वाढीव वीज दर कमी करावेत. रेवड्या वाटण्याचा प्रकार बंद करावा.’
– संतोष सौंदणकर, सदस्य – महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती, पुणे जिल्हा













