व्यापार व उद्योग क्षेत्राचा अपेक्षाभंग करणारा मात्र पगारदार करदात्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – प्रा. अशोककुमार पगारिया
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – व्यापार व उद्योग क्षेत्राचा अपेक्षाभंग करणारा मात्र पगारदार करदात्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया सीए डॉ अशोककुमार पगारिया यांनी दिली.
वास्तविक पाहता व्यापारी वर्ग ,उद्योजक,, स्थावर मालमत्ता आणि शेअर मार्केट यामधील गुंतवणूकदार यांना या अर्थसंकल्पापासून फार मोठी अपेक्षा आणि आशा होती, मात्र विशेष सवलती न देता भांडवली नफ्यावरील कर दहा टक्क्यावरून साडेबारापर्यंत आल्यामुळे शेअर मार्केटमध्ये निराशेचं वातावरण आहे आणि त्यामुळे शेअर मार्केट फार मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. पगारदार मित्रांसाठी प्रमाणित वजावट रु ही ५०००० वरून ७५०००पर्यंत वाढविली आहे.नवीन कर प्रणाली मध्ये तीन लाख उत्पन्नापर्यंत टॅक्स नाही. तीन ते सात लाख – पाच टक्के टॅक्स, सात ते दहा लाख – दहा टक्के, दहा ते बारा लाख -पंधरा टक्के ,बारा ते पंधरा लाख -:वीस टक्के आणि पंधरा लाखाच्या पुढे 30 टक्के असा नवीन कर दर असणार आहे सर्वसामान्य करदात्याला थोडासा दिलासा यामुळे मिळणार आहे इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार आहे. कॅन्सरवरच्या औषधावरची ड्युटी रद्द केली आहे, टीडीएस लेट भरण्यासाठी दिलासा आहे त्यांच्यासाठी तो गुन्हा असणार नाही पीएम मुद्रा कर्जामध्ये दुप्पट वाढ झाली आहे .
कृषी क्षेत्रासाठी १ लाख ४२ कोटी , महिला बाल विकास क्षेत्रासाठी ३ लाख कोटी, ग्रामीण विकासासाठी २ कोटी ६६ लाख , पायाभूत सुविधा सांठी ११ लाख कोटी एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद,१ कोटी तरुणांना ५०० मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशीप काही दिलासा देणाऱ्या बाबी सुद्धा आहेत एकंदरीत संमिश्र प्रतिक्रिया असणारा हा अर्थसंकल्प आहे. सीए डॉ अशोककुमार पगारिया, माजी सदस्य प्रादेशिक प्रत्यक्ष कर सल्लागार समिती,अर्थमंत्रालय ,भारत सरकार