- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड परिसरामध्ये गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिंचवड, भोईरनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्क, बिजली नगर शिवनगरी या भागामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शिवनगरी चिंचवडे नगर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने २५ ते ३० घरांमध्ये पाणी शिरले होते. या भागातील पावसाळी गटारी तुंबल्याने मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये पाणी शिरले होते त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर मदतीसाठी धावले. त्यांनी पाहणी करून महापालिकेच्या स्थापत्य विभागात सूचना केले आहेत भाऊसाहेब भोईर म्हणाले, बिजली नगर शिवनगरी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. शिवाय धरणक्षेत्रातून या नद्यांमध्ये वेळोवेळी होणारा विसर्ग लक्षात घेता नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ महापालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यभागातून पवना नदी वाहते. पवना धरण क्षेत्रातील पावसाचा वाढता जोर आणि पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सायंकाळी ४ वाजता पवना जलविद्युत केंद्रामधून विद्युत गृहाद्वारे १४००…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून त्या त्या भागातील पूर नियंत्रण परिस्थिती हाताळली जात आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे २८०० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रांमध्ये तसेच महापालिका शाळांमध्ये हलविण्यात आले आहे. याठिकाणी भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शहरात विविध ठिकाणी बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सम्राट चौक, लालटोपी नगर, भाटनगर, पिंपरी रिव्हर रोड, रामनगर, पत्राशेड लिंकरोड, बौद्धनगर आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे ६५० नागरिकांना भाटनगर पिंपरी शाळा, आंबेडकर कॉलनी, मेवणी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात नागरिकांच्या घरात आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडले. पावसामुळे शहरात उद्भवलेल्या परिस्थितीची भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी गुरूवारी पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. रावेत, नवी सांगवी व इतर भागातील परिसरात भेट देत नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन शंकर जगताप यांनी केले. दोन दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. पाऊस सतत सुरू असल्याने नद्या दुथडी भरून…
– नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वोतोपरी मदतीसाठी तत्पर – महापालिका, पोलीस प्रशासनसोबत ‘ऑन फिल्ड’ पाहणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अतिमुसळधार पावसामुळे चिखली- घरकूल परिरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे नागरिक अडकून पडले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी आपत्तीग्रस्त नागरिकांची महापालिका आपत्ती व्यवस्थान विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत भेट घेतली. परिसराची पाहणी करुन नैसर्गिक आपत्तीच्याकाळात आपत्तीग्रस्त नागरिकांना सर्वोतोपरी मदत करण्याचा ‘विश्वास’ दिला. गेल्या दोन दिवसांत पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. पवना धरणक्षेत्रात तसेच इंद्रायणी आणि मुळा नदी प्रवाहापेक्षा जास्त पाणी वाहत आहे. वाढलेले नागरीकरण आणि प्रमाणापेक्षा जास्तीचा पाऊस झाला असून, धरणांमधून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील 24 तासांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी झाडे मोडुन पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सकाळपासून घटनास्थळी स्वतः उपस्थित राहत नाना काटे यांनी संपूर्ण चिंचवड मतदारसंघातील पावसाचा आढावा घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी , अग्निशामकचे कर्मचारी यांना पाचारण करून मोडलेली झाडे बाजूला काढणे, तुंबलेले पाण्यांना वाट काढून देणे तसेच पाण्याचा योग्य निचरा करण्याच्या सुचना दिल्या. तसेच पुढील काही तासात पावसाचा जोर कमी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काल संध्याकाळी सुरू झालेल्या पावसाने आज अतिवृष्टीचे रूप घेतले आहे. सतत पडणार्या पावसामुळे प्रभागतील काही ठिकाणी पाणी साचले आहे . या परिस्थितीची गंभीरपणे दखल घेत शत्रुघ्न काटे यांनी तातडीने पालिका अधिकार्यांसोबत पाणी साचलेल्या परिसरात पाहणी केली. पाहणी दरम्यान ज्या ठिकाणी पाणी साचले आहे अश्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिले आहे . आज पिंपळे सौदागर नाहीच तर संपूर्ण राज्यभरात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसाची संततधार सुरू असल्याने प्रभागात काही ठिकाणी पुरस्थिती सारखी परिस्थिति निर्माण झाली आहे.अश्या वेळी परिसरातील नागरिकांनी महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केले आहे .
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवव्यात, आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन…
निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीसाठी तत्परता दाखवावी.. शिवसेना (ठाकरे गट) चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांची मागणी… पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांची दखल सत्ताधारी राजकीय नेतृत्वांना घ्यावी वाटत नाही, हे समाजासाठी घातक आहे. हुकूमशाहीला पोषक असे वातावरण यातून निर्माण होत आहे. प्रशासकीय राजवटीत सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नाहीत. निवडणूक आयोग देखील महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायचे धाडस करत नाही. दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुका वेळेत होतात; राज्याच्या विधानसभा निवडणूका घ्यायचीही तत्परता दिसते. तशी वातावरण निर्मितीही केली जाते. मग राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत घोडं कुठ अडलय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळण्याचं…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाच्या पुणे या ठिकाणी पार पडलेल्या राज्य अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने पिंपरी येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शहा यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले. या निषेध आंदोलन प्रसंगी बोलताना मावळ लोकसभेचे संघटक व माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करताना म्हणाले कि, पुरोगामी महाराष्ट्रात येऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विषयीचे अपशब्द बिलकुल खपवून घेतले जाणार…
