चिंचवडमध्ये अनेक घरात मुसळधार पावसामुळे शिरले पाणी, मदतीसाठी धावले भाऊसाहेब भोईर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड परिसरामध्ये गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिंचवड, भोईरनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्क, बिजली नगर शिवनगरी या भागामध्ये जोरदार पाऊस झाला.
त्यामुळे शिवनगरी चिंचवडे नगर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने २५ ते ३० घरांमध्ये पाणी शिरले होते. या भागातील पावसाळी गटारी तुंबल्याने मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये पाणी शिरले होते त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर मदतीसाठी धावले. त्यांनी पाहणी करून महापालिकेच्या स्थापत्य विभागात सूचना केले आहेत
भाऊसाहेब भोईर म्हणाले, बिजली नगर शिवनगरी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला पावसाळी गटारे स्वच्छ न केल्याने त्याचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले आणि ते पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरले.या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे तसेच तातडीने या भागातील पावसाळी गटारी स्वच्छ कराव्यात तसेच या भागातील घरांमध्ये साचलेले पाणी मोटार यांच्या माध्यमातून काढावे असे सूचना केलेल्या आहेत. ‘