- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
थकबाकीदारांना ९०% विलंब दंड सवलत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा महसूल स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीस गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकातर्फे १ मार्च २०२६ पासून विशेष ‘अभय योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या थकबाकीवर एकरकमी भरणा केल्यास मनपा करावरील विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी लागू राहणार आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधा उभारण्यासाठी मालमत्ता कर हा मुख्य महसूल स्त्रोत आहे. आतापर्यंत सुमारे ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी प्रतिसाद देत अंदाजे ७४७ कोटी रुपयांचा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे प्रभाग क्र. २६ (विशालनगर, पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, वाकड) मधील रक्षक चौक येथे उड्डाणपूल (ओव्हर ब्रिज) आणि अंडरपासचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आमदार जगताप यांनी नुकतीच या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतूक सिग्नलमुक्त व वेगवान होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. औंध ते रावेत मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच वाकड फाटा ते औंध आणि पिंपळे निलख ते पुणे या मार्गांवरील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. रोजच्या वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळणार असल्याचे नागरिकांचे मत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवीभाऊ लांडगे आणि नगरसेविका अरुणा लंगोटे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. सत्कारासाठी बुके किंवा इतर भेटवस्तू न देता पुस्तके व वह्यांचे संच द्यावेत, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले होते. त्यानुसार, दिशा सोशल फाऊंडेशनचे माजी कार्याध्यक्ष सचिन साठे आणि संचालक ॲड. अविनाश ववले यांच्या हस्ते वह्या व शालोपयोगी वस्तू देऊन महापौरांचा सत्कार करण्यात आला. तसेच युवा उद्योजक शिवराज काटे यांचादेखील सन्मान कार्याध्यक्ष राजेंद्र करपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे,दिशा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, माजी…
‘इमर्जिंग टीम ऑफ द इयर’ हा मानाचा पुरस्कार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -स्पेस रोबोटिक्स सोसायटीच्या वतीने उडपी, कर्नाटक येथे “इंटरनॅशनल रोव्हर चॅलेंज २०२६” आणि “इंटरनॅशनल स्पेस ड्रोन चॅलेंज २०२६” या जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) मधील टीम ऑटोमॅटॉन्सने चमकदार कामगिरी केली. त्यांना ‘इमर्जिंग टीम ऑफ द इयर’ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. अवकाशात अंतराळवीरांना सहाय्य करणाऱ्या मंगळ रोव्हरची संकल्पना मांडणे, त्याची रचना, विकास व संचालन करणे यासाठी प्रोत्साहन देणे, अनुकरणात्मक परिस्थितीत विशिष्ट मंगळ मोहिमा पूर्ण करणे, ग्रह रोव्हर्स डिझाईन करणे आणि चालवणे हे या स्पर्धेचे…
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) विषयक विशेष व्याख्यान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “पत्रकारांनी बदलत्या काळानुसार तंत्रस्नेही होणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे पत्रकारांच्या नोकऱ्यांसाठी धोका नसून त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि गती वाढवणारे प्रभावी साधन आहे. बातमीसाठी आवश्यक माहिती संकलन, विश्लेषण आणि संशोधन प्रक्रिया एआयमुळे अधिक वेगवान झाली आहे. मात्र, एआयचा वापर करताना संबंधित वाचकवर्ग लक्षात घेऊन योग्य प्रॉम्प्ट तयार करणे आणि प्राप्त माहितीची पडताळणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत पत्रकारांनी एआयचा प्रभावी वापर केल्यास त्यांची बातमी अधिक नेमकी, विश्वसनीय आणि वेगळी ठरू शकते,” असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय…
पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबत मनोधैर्य वाढविण्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भर – आमदार शंकर जगताप पवनाथडी जत्रेच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी पवनाथडी जत्रा हे एक मोठे व्यासपीठ ठरले आहे. जत्रेत सहभागी असलेल्या स्टॉलधारक महिलांनी आपला व्यवहार डिजिटल पद्धतीने करावा, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासोबतच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भर देत आहे. पिंपरी चिंचवड शहरात भविष्यात महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती कशी करता येईल, यासाठी महापालिका निश्चितच पुढाकार घेईल, असे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या शनिवारी (दि.28) आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समितीपुढे सादर करणार आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी होणाऱ्या पहिल्या सभेत हा अर्थंसंकल्प मांडण्यात येणार आहे. तशी तयारी महापालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या काळातील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. महापालिकेतील मागील चार वर्षांची प्रशासकीय राजवट महापौर निवडीनंतर 6 फेबुवारी 2026 पासून संपुष्टात आली. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर स्थायी समितीची स्थापना ही महत्त्वाची प्रक्रिया सुरू आहे. स्थायी समिती सदस्य नियुक्तीनंतर शनिवारी अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होत आहे. स्थायी समितीचा अध्यक्ष निवडणूक न झाल्यामुळे फेबुवारी महिन्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ‘तिजोरीची चावी’ मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपकडून अभिषेक बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची निवड आता जवळपास निश्चित झाली आहे. स्थायी समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल न झाल्यामुळे बारणे यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी (२८ फेब्रुवारी) होणाऱ्या विशेष सभेत त्यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या दिवशी पक्षांतर्गत चर्चेनंतर बारणे यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला. वाकडचे प्रतिनिधी संदीप कस्पटे आणि रहाटणीचे नगरसेवक बाबा त्रिभुवन हे देखील इच्छुक होते; मात्र पक्षश्रेष्ठींनी बारणे यांच्यावर विश्वास दाखवला. त्यानुसार बारणे यांनी…
मसाप निवडणूक ‘साहित्य संवर्धन आघाडी’ जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी ‘साहित्य संवर्धन आघाडी’ आगामी काळात ठोस आणि कृतीशील कार्यक्रम राबविणार असल्याचे ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण यांनी सांगितले. शुक्रवारी (दि.१३) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ‘साहित्य संवर्धन आघाडी’चे अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह पदाचे उमेदवार डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर आणि पुणे जिल्हा कार्यवाह पदाचे उमेदवार संदीप भानुदास तापकीर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संपूर्ण कारभार घटनात्मक…
एसबीपीआयएम च्या ११ व्या “युवोत्सव” चे उद्घाटन पेटकर यांच्या हस्ते संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जीवनात आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून यशस्वी होण्यासाठीची प्रेरणा मला स्वामी विवेकानंद यांच्याकडून मिळाली. त्यांच्या प्रेरणेनेच मी दिव्यांगावर मात करू शकलो. ऑलिंपिकच्या कुस्ती, धनुर्विद्या, हॉकी यासह ॲथलेटिक मधील बहुतांशी सर्व खेळात सहभागी होऊन देशासाठी ४७६ पदके जिंकली त्यापैकी ४७४ सुवर्ण पदके आहेत. आजच्या युवा पिढीने स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महान व्यक्तींचे जीवन चरित्र अभ्यासले पाहिजे असे मार्गदर्शन पॅरा ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदकांचे जागतिक रेकॉर्ड केलेले पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे ११ व्या…
