- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या वाकड आणि परिसरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यांवर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सर्वच प्रमुख रस्ते उखडले गेले असून नागरिक वाहनचालक यांना त्याचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. पुढील आठ दिवसांत रस्ते दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते विशाल वाकडकर यांनी दिला आहे. याबाबत विशाल वाकडकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, वाकड आणि परिसरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, यामध्ये भूमकर चौक ते हिंजवडी हा प्रमुख रस्ता यावर भूमकर चौक येथे मोठ्या प्रमाणत खड्डे…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने २०२४ या आर्थिक वर्षापासून अंदाजपत्रकात नागरी सहभाग या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील विविध उपाययोजना, प्रकल्प, उपक्रम यांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने अभिप्राय मागविण्याचे ठरविले आहे. हा उपक्रम पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशांना त्यांच्या परिसरातील विविध विकास प्रकल्पांना सार्वजनिक निधी वाटप करण्याच्या निर्णय प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देईल. ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ ही वार्षिक शहरव्यापी मोहीम २००७ पासून ऑफलाईन पद्धतीने सुरू झाली होती. ऑफलाईन पद्धतीमध्ये अर्ज जमा करण्यासाठी नागरिकांनी संबंधित विभागीय कार्यालयांना भेट देणे आवश्यक होते. ही गैरसोय टाळण्यासाठी या वर्षापासून नागरिकांचे अभिप्राय स्मार्ट सारथी ॲप आणि महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्युआर कोडद्वारे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रसंत आचार्यसम्राट आनंद ऋषीजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कासारवाडीतील जैन श्रावक संघाच्या वतीने आनंद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा प्रारंभ आनंदऋषीजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून झाला. या दिवशी जैन स्थानकाच्या आनंद दरबारमध्ये उपप्रवर्तिनी मंगल प्रभाजी, डॉ मधुस्मिताजी, हर्षिताजी आणि दिव्यांशीजी यांनी प्रवचनाच्या आणि सुंदर भक्ती गीताच्या माध्यमातून सामायिकचे महत्त्व विशद केले. मंगल प्रभाजी यांनी आगम मधील ‘सुखविपाक सूत्रांचे’ स्पष्टीकरण सांगितले. बुधवारी (ता. ३१) दान दिवस झाला. या दिवशी सर्व भाविकांनी इच्छेनुसार दान केले. कासारवाडी, दापोडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या ठिकाणचे श्रावक श्राविका प्रवचनास मोठ्या संख्येने हजर होते. ‘सोमवारपर्यंत (ता.५) सुरू असणाऱ्या या…
चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. विकास शिक्षण मंडळ संचलित शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते इ 5 वी ते 12 वी च्या विदयार्थ्यांनी यात उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संचालक श्री विजय जाधव सर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री जगदीश दादा जाधव सचिव श्री संजयभाऊ जाधव, संचालक, श्री अमित बच्छाव यांनी देखील वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदाचे परीक्षेत केळगाव येथील शेतकरी कुटुंबातील कु. रसिका नितीन कुटे या तरुणीने उज्ज्वल यश संपादन केले. तिच्या यशस्वी वाटचालीतून केळगावच्या शिरपेचा मध्ये मानाचा तुरा रोवला गेला असून केळगावचे वैभवात वाढ केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन (PSI) पोलीस उपनिरीक्षक पदी कु. रसिका नितीन कुटे हिची नियुक्ती झाली. या निमित्त केळगावात समस्त ग्रामस्थ आणि कुटे कुटुंबातील सर्व नातेवाईक मित्र परिवार यांनी जल्लोष साजरा केला. कु.रसिका कुटे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदी नियुक्ती झाल्याबद्दल केळगाव मधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, विविध…
शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते व विभागप्रमुख गोरख पाटील निलंगेकर यांच्या वतीने आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे पिंपरी चिंचवड उपशहरप्रमुख हरेश नखाते, महिला आघाडीच्या विभाग संघटिका सुजाता नखाते आणि विभागप्रमुख गोरख पाटील निलंगेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी यूनिव्हर्सल हेल्थ केअरच्या वतीने ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर भारतीय डाक सेवेच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घेतला. नव मतदारांसाठी मतदार नाव नोंदणी राबविण्यात आली. त्याचबरोबर पासपोर्ट, पॅनकार्ड, गॅजेट यांसारखे महत्वाची कागदपत्रेही जागेवर काढून…
पिंपरी(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन (जीतो) चिंचवड पिंपरी महिला विभागाच्या वतीने रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून “उडान “या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच यावेळी सिद्धी जैन राखी मेकिंग,मिसेस युनायाटेड नेशन्स ग्लोब स्पर्धा विजेत्या डॉ अंजली आवटे या व्यक्तिमत्व विकास यावर तर अखिलेश नायर हे बॉलिवूड नृत्य कार्यशाळा घेणार आहे. चिंचवड येथील चिंचवडे लाॅन्स ,आदित्य बिर्ला हॉस्पिटल जवळ , येथे 4 ऑगस्ट,रविवार रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत खुले असेल. असे जीतो लेडीज विंगच्या अध्यक्षा वैशाली बाफना आणि सहसचिव डाॅ.योगिता लुंकड यांनी सांगितले. या प्रदर्शनात आपल्याला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी तयार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने वकील बार रूम लोकशाहीर सहित्यरत्न व मराठी भाषेला जागतिक स्तरावर सन्मान मिळून देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. या वेळी माजी अध्यक्ष ॲड.नारायण (नाना) रसाळ, ॲड. सुदाम साने, ॲड.जे.के काळभोर, ॲड.अमोल लक्ष्मण खांडेकर, ॲड.अरुण (मामा) खरात, ॲड.बी.के कांबळे,ॲड. नारायण थोरात, ॲड.संगीता कुशलकर,ॲड.पूनम शर्मा,ॲड.सागर अडागळे,ॲड.मंगेश नढे इ.वकील मान्यवारांनी यांनी आण्णाभाऊ साठे कार्याबद्दल व त्यांचे विचार या संदर्भात माहिती दिली तसेच यावेळी साहित्यारत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न देण्यात यावा याची उपस्थित वकील मान्यवरांकडून मागणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड.गोरख…
लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे म्हणजे अलौकिक प्रतिमेचे आदर्श उदाहरण – सतीश काळे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संपूर्ण महाराष्ट्रभर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी होत असताना आज पिंपरी चिंचवड येथील निगडी येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन प्रवासावर संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतीश काळे यांनी त्यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला सतीश काळे म्हणाले १ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात झाला.अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळेत गेले असले तरी त्यांनी मोठी ग्रंथ संपदा निर्माण केली. उच्चवर्णीयांच्या अन्यायामुळे आणि छळामुळे त्यांनी…
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संवेदनशील स्वभावातून लेखन केले जिवंत काढतूस,मास्तर, फकीरा, वारणेचा वाघ अशा असंख्य साहित्यातून शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे कष्टकरी कामगारांचे प्रश्न मांडून त्यांना योग्य पटलावर आणून न्याय देण्याची भूमिका अण्णाभाऊंनी घेतली त्यांनी जे वास्तव मांडले त्यातील अनेक प्रश्न आजही समाजात भेडसावतात असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले . साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ, असंघटित कामगार विभाग,नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन कडून अभिवादन करण्यात आले .या वेळी चंद्रकांत कुंभार, माया कोकरे, अंजना रोडे,सलीम डांगे, विजय जाधव ,सुनील टोके , शकील शेख, ज्योती राठोड आदी उपस्थित होते.…
