ताज्या घडामोडीपिंपरी

जीतोच्या वतीने चिंचवडमध्ये उडाण भव्य प्रदर्शनाचे आयोजन

Spread the love

 

पिंपरी(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन (जीतो) चिंचवड पिंपरी महिला विभागाच्या वतीने रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून “उडान “या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे
भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच
यावेळी सिद्धी जैन राखी मेकिंग,मिसेस युनायाटेड नेशन्स ग्लोब स्पर्धा विजेत्या डॉ अंजली आवटे या व्यक्तिमत्व विकास यावर तर अखिलेश नायर हे बॉलिवूड नृत्य कार्यशाळा घेणार आहे.
चिंचवड येथील चिंचवडे लाॅन्स ,आदित्य बिर्ला हॉस्पिटल जवळ , येथे 4 ऑगस्ट,रविवार रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत खुले असेल. असे जीतो लेडीज विंगच्या अध्यक्षा वैशाली बाफना आणि सहसचिव डाॅ.योगिता लुंकड यांनी सांगितले.
या प्रदर्शनात आपल्याला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी तयार केलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनाचा खजाना बघायला मिळेल. यात ड्रेसेस,सारीज,डिझाइनर ज्वेलरी, होम ङेकाॅर ,गिफ्ट हॅम्परस ,राखी,सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ, तसेच कपडे ,आर्ट व क्राफ्टच्या वस्तु, तसेच पुरुषांसाठी कपडे, राखी मेकिंग वर्कशॉप , बॉलीवुड डान्स ऍक्टिव्हटी आणि महिलांसाठी सेल्फ गुमिंग वर्कशॉप असे खुप काही उपक्रम अनुभवता येणार आहे. असे प्रकल्प प्रमुख पुनम बंब आणि समन्वयक सोनल भंडारी यांनी सांगितले.

या प्रदर्शनाचे मॅगज बाय सानंदा बसक हे सिल्वर स्पॉन्सर तर मुनोत डेकोरेटर्स व इव्हेंट प्लॅनर (पर्ल बँकवेट) हे डेकाॅर पार्टनर आहेत.
सर्व कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट दया मनसोक्त खरेदीचा आनंद लुटावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button