- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चाकण या औद्योगिक परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजना राबवणे गरजेचे आहे. मात्र वाहतूक कोंडीच्या नावाखाली सर्वसामान्य रिक्षा चालकांवर कारवाईचा फार्स नको. प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांना त्रास नको याचीही दक्षता प्रशासनाने घ्यावी अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतपेटीच्या द्वारे धडा शिकवू यापूर्वी देखील लोकप्रतिनिधी यांनी रिक्षा चालकांना मारहाण केली होती या घटनेचा रिक्षा चालकांनी निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव केला हे उदाहरण समोर आहे, यामुळे रिक्षा चालकांना कमजोर समजू नका, असे मत महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केले. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन अशा चालकांच्या समस्या व प्रश्न मांडणार असल्याची माहिती बाबा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वराज्य संस्थांचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत म्हणून मालमत्ता कराकडे पाहिले जाते, या कर वसुलीसाठी युजर फ्रेंडली प्रणाली विकसित करून त्यावर अधिक भर देत महानगरपालिकेने कर वसुली पद्धती सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील सर्व मिळकती कराच्या कक्षेत आणण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण द्वारे मिळकतींचे सर्वेक्षण सुरु असून, त्याद्वारे महापालिकेचे उत्पन्न निश्चितपणे वाढणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरातील इमारत व जमिनीवर मालमत्ता कर आकारणी व वसुली करण्यात येत आहे. जिओ सिक्वेन्सिंग करून मनपा क्षेत्रातील सर्व मालमत्तांना प्रत्यक्ष स्थळावर जावून नवीन मालमत्ता क्रमांक देण्यात येत आहे. करसंकलन विभागामार्फत…
– आमदार महेश लांडगे यांची यंत्रणा लागली कामाला – स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार काम ‘फास्ट ट्रॅक’वर! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराचे उपनगर म्हणून नावारुपाला येत असलेल्या बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. वुड्सविले सोसायटी, कुमार प्रिन्सविले सोसायटी अशा विविध सोसायट्यांना जोडणारा आणि श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथील महानगरपालिका विकास आराखड्यातील १८ मीटर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहर आणि परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली. यामुळे सर्वसामान्य नागरिक व वाहनचालक यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. तसेच, वुड्सविले सोसायटी येथील १८ मीटर डीपी रस्ता विकसित करावा,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस सुरेश माहुरकर, झोनल हेड – क्रीडो सोलुशन पुणे,क्रिडो ओंकार पाटील,सेल्स मॅनजर पुणे नक्कीया यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनी रिया परमार, श्रावणी सोळंकी, अर्पिता तिवारी, वाघमारे प्रिया, राहुल चौधरी, समृद्धी जगताप, विद्यार्थीनीनी तसेच निशा पवार, गीतांजली दुबे व तृप्ती शर्मा लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगितली.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने शहरातील उद्याने आणि रुग्णालयांमध्ये डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर अभियान राबविण्यात आले असून उद्यानात येणारे नागरिक आणि रुग्णालयातील रुग्ण यांना डेंग्यू आजाराबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली आहे. शहरात डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त पीसीएमसी अभियान राबविण्यात येत आहे. त्याद्वारे शहरातील विविध सर्व भागांमध्ये डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आज महापालिकेच्या उद्यानांमध्ये तसेच रुग्णालयांमध्ये डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली. गजानन महाराज उद्यान येथे खेळणी परिसरामध्ये साचलेले पाणी, पालापाचोळा काढून स्वच्छता करण्यात आली आहे. सखुबाई गवळी उद्यान येथे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला आहे. आवश्यक ठिकाणी किटकनाशक धूर फवारणी करण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या बाबत खा. अनुराग ठाकूर आणि सांबित पात्रा यांनी अनुद्गार काढले त्याच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत. खा. ठाकूर आणि पात्रा यांनी याविषयी देशाची माफी मागावी अशी मागणी शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पिंपरी येथे केली. डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात गुरुवारी सायंकाळी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ठाकूर आणि पात्रा तसेच भाजप सरकारच्या विरोधी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. डॉ. कदम निषेध व्यक्त करताना म्हणाले की, ठाकूर यांच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत किवळे देहुरोड बाह्यवळण या ठिकाणी शिवेसना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ढोल ताशा वादनाने तसेच जेसीबी मधून पृष्पवृष्टी करून व फटाके वाजवून जोरदार जंगी स्वागत करण्यात आले. स्वागत प्रसंगी मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे (पाटील) यांनी पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले. या दरम्यान पुणे जिल्हाप्रमुख माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले , युवासेना प्रमुख चेतन पवार , जिल्हाप्रमुख सुलभा उबाळे, महिला शहर संघटिका अनिता तुतारे , माजी शहरप्रमुख श्री. योगेश बाबर,उपजिल्हा प्रमुख रोमी…
मागील दीड ते दोन दशकांपासून राजकारण आणि समाजकारणामध्ये सक्रीय असून देखील कारकिर्दीचे सिंहावलोकन करत असताना कायम सतावत असलेला प्रश्न म्हणजे माझं चुकलं तरी काय? आणि आता याच विषयांवर निसंकोचपणे आणि कोणताही आडपडदा न ठेवता नाना काटे मतदारांसोबत थेट संवाद साधत आहेत. तसेच नाना काटे यांच्या समर्थकांनी मतदार संघात याच आशयाचे लाखो पत्रकांचे वाटप केले आहे. त्यामुळे दोन वेळा झालेल्या निसटत्या पराभवातून अनुभवाचे धडे घेत मनामध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण करत, नियोजनबद्ध वाटचाल करत आगामी चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी नाना काटे यांनी दंड थोपटले आहेत. २००७ साली नाना काटे यांनी पहिल्यांदाच महापालिका निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले. दूरदृष्टी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड आणि ह प्रभागांतर्गत येणाऱ्या उद्यान, महापालिका शाळा व पाण्याची टाकी याठिकाणची सुरक्षा व देखभाल करण्याच्या कामांसाठी कंत्राटी पद्धतीने नमलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेत आणि किमान वेतन दरानुसार वेतन न देणाऱ्या क्रिस्टल कंपनीवर कायदेशीर कारवाई कारण्यात यावी, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील अनेक कामांचे खासगीकरण केलेले आहे त्यानुसार ड आणि ह प्रभाग हद्दीतील उद्यान, महापालिका शाळा व पाण्याची टाकी येथे सुरक्षा व देखभालीसाठी कर्मचारी नेमण्याचे काम क्रिस्टल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे निलख येथील साहिल हाईट्स सोसायटीमधील झाडे तोडली जात आहेत. अध्यक्ष विक्रांत बनसोडे आणि खजिनदार सचिन भंडारी यांना वेळोवेळी विनंती करुन देखील त्यांच्याकडून वृक्षतोड थांबवली जात नाही. त्यामुळे बनसोडे आणि भंडारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे केली आहे. यासंदर्भात रहिवाशांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाला निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे की, एकीकडे महापालिका पर्यावरणाचे संतुलन नियंत्रित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करण्यास प्रोत्साहन देत आहे. तर, दुसरीकडे उच्चशिक्षित रहिवाशांकडून सोसायटीच्या आवारातील उच्च प्रतिची झाडे तोडली जात आहेत. महापालिका प्रशासन पर्यावरण संवर्धनाला चालना देत असताना सोसायटीधारकांकडून पर्यावरणाचा -हास केला जात असल्याने…
