Author: maharashtrabreakingnews.com

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) चे युवक शहर अध्यक्ष इम्रानभाई शेख यांची “हडपसर विधानसभेच्या ” निरीक्षकपदी निवड.* *कार्यअध्यक्ष सागर तापकीर यांना शिरूर विधानसभेची जबाबदारी* पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी विधानसभेच्या पार्श्र्वभूमीवर प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या व युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)चे युवक शहर अध्यक्ष इम्रानभाई शेख यांची आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रपवार पक्षाच्या “हडपसर विधानसभेच्या”निरीक्षकपदी तर कार्यअध्यक्ष सागर तापकीर यांना शिरूर विधानसभेची जबाबदारी निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदार संघात खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ संपूर्ण भोसरीविधानसभेत शहरअध्यक्ष इम्रान शेख…

Read More

शहरातील खड्डे चार दिवसात बुजवा वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिका-यांना सूचना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे वाहतूक संथ होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शहरातील रस्त्यांवरील खड्डे चार दिवसात बुजविण्याचे आदेश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. वाहतूक कोंडी होणा-या ‘स्पॉट’वर, चौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या. पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी संदर्भात खासदार बारणे यांनी शनिवारी (दि.3) महापालिका अधिकारी, पोलिसांची एकत्रित बैठक घेतली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, वाहतूक पोलीस उपायुक्त विशाल…

Read More

पीसीसीओईआर मध्ये तंत्रज्ञानाची ‘नवधारा’ – डॉ. मारुती जाधव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – विविध नाविन्यपूर्ण उपक्र‌मांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमध्ये समाजातील वेगवेगळ्या समस्यांवर उपाय शोधण्याचे सामर्थ्य येते. अभियांत्रीकीचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये हेच सामर्थ्य प्रज्वलित करण्याचे काम करते’, असे प्रतिपादन महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशास‌कीय सेवेचे सहायक संचालक डॉ. मारुती जाधव यांनी केले.   पीसीईटीच्या रावेत येथील पीसीसीओईआर येथे ‘नवधारा २०२४’ या राज्यस्तरीय प्रकल्प व पोस्टर्स स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. मारूती जाधव बोलत होते. सासाई कंपनीचे उपाध्यक्ष केतन नवले, कि डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे संचालक एम. टी. अभिलाश, आयबीएम कंपनीचे सॉफ्टवेअर आर्किटेक्ट सर्वेश पटेल, पीसीसीसोईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख प्रा. तुषार गायकवाड, प्रा.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) पुणे, आणि आयटी क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रेड हॅट यांच्या मध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पिंपरी चिंचवड विद्यापीठात रेड हॅट अकादमी सुरु करण्यात येणार आहे. रेड हॅट ही लिनक्स प्रणालीवर चालणारी जगातली अग्रगण्य ओपन सोर्स सोल्युशन देणारी कंपनी आहे. या करारानुसार पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना रेड हॅटतर्फे आयटी कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर उपयोगी असणारे प्रमाणपत्र देण्यात येणार असून पीसीयु – रेड हॅट अकादमी असे नामकरण करण्यात आले आहे. शैक्षणिक प्रशिक्षण आणि इंडस्ट्रीतील अंतर कमी करण्यासाठी पीसीयु रेड हॅट अकादमी काम करेल. आयटी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अतिवृष्टीमुळे  नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्याने पुरग्रस्त तसेच सखल भागात पाणी साचले होते. हे पाणी ओसरल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पूरबाधित परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूरबाधित परिसरांमधील पाणी ओसरल्यानंतर शहरातील विविध भागात तसेच नदीकाठच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील विविध ठिकाणी साठलेले पाणी निवळल्यानंतर आज महापालिका पथकाच्या वतीने शहरातील विविध भागात रस्त्यावरील चिखल साफ करणे, तुंबलेल्या चेंबर्सची स्वच्छता करणे, नदीकाठी जमा झालेल्या कचरा तसेच गाळ जेसीबीच्या सहाय्याने हटविणे, माती साचलेल्या ठिकाणी पाणी फवारणी करून स्वच्छता करणे, विविध ठिकाणी तसेच पुरबाधित भागात निर्जंतुकीकरण करणे तसेच निवारा केंद्रांमध्ये…

Read More

– मुख्य वीजवाहिनी नवीन टाकण्याचे काम सुरू – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुपीनगर येथभल रुपी हौसिंग सोसायटी व परिसरात गेल्या ८ दिवसांपासून वीज नाही. मात्र, आता स्थानिक नागरिक व सोसायटीधारकांना सहन करावा लागणारा ‘अंधकार संपला’ आहे. या भागात महावितरण प्रशासनाकडून नवीन मुख्य वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. रुपीनगर येथील रुपी हौसिंग सोसायटीमध्ये मुख्य वीजवाहिनी खराब झाली होती. त्यामुळे गेल्या ८ दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन केबलला तात्पुरता जाॅईंट करण्यात आला. मात्र, वीज समस्या…

Read More

नदीच्या पुराने दरवर्षी स्थलांतरित व्हावे लागणाऱ्या कुटुंबियांना सततच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याबाबत तोडगा काढू, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरबाधितांना दिले. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहरातील पुरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहरात आले होते. सांगवी येथील अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळेत महापालिकेने स्थापित केलेल्या निवारा केंद्रास त्यांनी भेट दिली. यावेळी पूरबाधित नागरिकांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप,  विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त…

Read More

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन चिंचवड,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड मतदार संघातून जाणाऱ्या मुंबई- बंगळुरू महामार्गालगतच्या सेवा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाल्याने रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड येथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. किवळे ते वाकडपर्यंत असणाऱ्या या सेवा रस्त्यावर सध्या वाहन चालवणे अवघड झाले आहे. अक्षरश: खड्ड्यांमध्ये रस्ता शोधावा लागत आहे. वाकड परिसरातील सेवा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. येथील सेवा रस्त्याचे डांबरीकरण करावे, हा रस्ता चांगला करावा, अशी मागणी वारंवार केलेली आहे. मात्र हा सबवे व रस्ता राज्य शासन, केंद्रीय रस्ते मंत्रालय यांच्या कार्यक्षेत्रात येत असून, महापालिका येथे काही…

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार  महेशदादा लांडगे युवा मंच व दिनेशभाऊ यादव मित्रपरिवार यांच्या वतीने कावड यात्रेत सहभागी भाविकांना अल्पोपहार चे वाटपआज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने सालाबादप्रमाणे चिखली ते घोराडेश्वर पायी कावड यात्रा आज सुरुवात झाली. विश्व हिंदु परिषद बजरंग दल चिखली प्रखंड व व्यापारी संघटना चिखली वतीने सालाबादप्रमाणे या वर्षी श्रावण महिन्याचे आवचित्य साधुन आज सोमवारी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर ते घोरडेश्वर डोंगर पायी कावड यात्रा आयोजित केलेली होती सकाळी पुजा करुन कावड यात्रेला सुरुवात झाली, हजारोच्या संख्येने भाविक कावड यात्रेत सहभागी झाले होते. या भाविकांना आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व दिनेश यादव मित्र…

Read More

*पिंपरी-चिंचवड साहित्य मंच आयोजित* 🕉️ *शिवदर्शन -भाग १*🕉️ *लेखन- सौ. माधुरी शिवाजी विधाटे, पुणे* *हंपी ,एक वैभवशाली शिल्पनगरी* *पाताळेश्र्वर शिवमंदिर आणि बडवी शिवमंदिर,हंपी* *५ ऑगस्ट २०२४* *पहिला श्रावणी सोमवार* हंपी या वैभवशाली शिल्पनगरीमध्ये नीलगगनाच्या घुमटाखाली हिरव्या वृक्षराजीच्या छायेमध्ये विसावलेल्या शिवमंदिरात आम्ही सहकुटुंब आलो होतो. हे मंदिर पाताळेश्वर नेलमालिगी देवालय म्हणून तसेच प्रसन्न विरूपाक्ष मंदिर या नावाने ओळखले जाते. या पूर्वाभिमुख देवालयाचा पृष्ठभाग जमिनीला जवळजवळ समांतर असून ते भूस्तरापासून खाली आहे. म्हणून याला पाताळेश्वर मंदिर म्हणतात . पूर्वी हे मंदिर फक्त राज परिवारासाठी असून सामान्य प्रजाजनांना त्यात प्रवेश नव्हता. मंदिराच्या द्रविड स्थापत्यशैलीवरून पहिल्या बुक्करायाच्या कारकिर्दितील हे मंदिर असावे असे मानतात. देवालयाच्या…

Read More