रुपीनगरमधील रुपी हौसिंग सोसायटीचा ‘अंधकार संपला’
– भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
रुपीनगर येथील रुपी हौसिंग सोसायटीमध्ये मुख्य वीजवाहिनी खराब झाली होती. त्यामुळे गेल्या ८ दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन केबलला तात्पुरता जाॅईंट करण्यात आला. मात्र, वीज समस्या पुन्हा उद्भवली होती.
दरम्यान, माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांच्या पुढाकाराने स्थानिक नागरिकांनी सदर समस्या भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या कानावर घातली. आमदार लांडगे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता अतूल देवकर यांच्याशी संवाद साधला आणि नवीन वीज वाहिनी टाकण्याबाबत सूचना केली. त्याची तातडीने दखल घेण्यात आली आणि आज ३१० मीटर अंतरावरील वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले. विशेष म्हणजे, आमदार महेश लांडगे यांनी सदर काम स्वनिधीतून केले आहे.
यावेळी माजी नगरसेवक शांताराम भालेकर, कार्यकर्त्या अस्मिता भालेकर, रविंद्र काळे, गणेश मगर, शिवाजी बोडके, विशाल खाणेकर, प्रशांत हिवाळे, सुनिल समगीर, अरुण पाटील, साहेबराव मळेकर, किरण पाटील, रविराज शेतसंधी, अनिल भालेकर, रमेश भालेकर, संदीप जाधव, शिरीश उत्तेकर यांच्यासह सोसायटीमधील रहिवाशी सुमन काकडे, शीतल पारखी, केणेकर, स्वाती कासार आदी उपस्थित होते.
***
रहिवाशांनी मानले आमदार महेश लांडगे यांचे आभार….
दरम्यान, अतिमुसळधार पावसामुळे रुपीनगर, तळवडे परिसरातील सखल भागामध्ये पाणी साचले. आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक पातळीवर माजी नगरसेवक शांताराम भालेकर आणि सहकाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. नैसर्गिक आपत्तीच्या काळात आमदार लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे यांनी परिसरात पाहणी केली. स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन, रस्त्याची दुरुस्ती अशी कामे हाती घेण्यात आली. तसेच, नागरिक, गृहिणी-विद्यार्थी आणि व्यापारी-उद्योजकांना भेडसावणारी वीज समस्या निकालात काढण्यासाठी मुख्य वीजवाहिनी नवीन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि सोसायटीधारकांनी आमदार महेश लांडगे यांचे आभार मानले आहेत.