Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने मागील वीस वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्या अंतर्गत यावर्षी गुरुवारी (दि.१५) दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.     १५ ऑगस्ट,  सकाळी १० वाजता, पिंपळे निलख येथील मुख्य बस स्टॉप चौकात, मनपा शाळेसमोर आयोजित केलेल्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप, प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आदींच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी बारावीतील प्रथम गुणवंत विद्यार्थ्याला स्वर्गीय आमदार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पिंपळे गुरव येथील 8 टू 80 उद्यानाच्या बाजूला प्रथम वृक्षमित्र अरुण पवार व डॉ भारती चव्हाण यांनी वृक्ष पालखीचे पुजन केले. गणेश वंदना दिगंबर राणे यांनी म्हणत सुरुवात केली. वृक्षदिंडी मध्ये मंडळाचे कोअर कमिटी सदस्य आण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर पर्यावरण जनजागृतीचा संदेश लिहीलेला शर्ट घालुन, कावळा म्हणतो काव,काव ,एकतरी झाड लाव असे म्हणत परीसर दणाणून सोडला ते सर्वाचे लक्ष वेधून घेत होते तुकाराम महाराजांच्या भुमिकेत ह.भ.प रामदास साबळे होते तर किरण कांबळे यांनी डोक्यावर झाड, तोंडाला ऑक्सीजनचा मास्क लावून पर्यावरणाचा संदेश दिला. वृक्षवल्ली आम्हां,सोयरे ,वनचरे” असे भजन म्हणत…

Read More

पिंपळे सौदागर ते हिंजवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी : उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे यांची भाजप शहराध्यक्ष मा.शंकरभाऊ जगताप यांच्याकडे मागणी. पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सततच्या पावसामुळे पिंपळे सौदागर ते हिंजवडी दरम्यानच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाल्याची स्थिती आहे.पिंपळे सौदागर ते हिंजवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदा भिसे यांनी भाजप शहराध्यक्ष  शंकर जगताप यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की,   खराब रस्त्यांमुळे दररोज ये-जा करणाऱ्या आय.टी. अभियंते आणि नागरिकांना ट्रॅफिक समस्या , खडयांमुळे उद्भवणाऱ्या ‘स्पॉंडेलिसिस’ / मणका विकार ‘ , वाहनांचे नुकसान यांसारख्या समस्यांना दैनंदिन स्वरूपात सामोरे जावे लागत आहे. आजमितीला…

Read More

‘सोसायटीच्या उत्कर्षासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार’ – दीपक मोढवे – पाटील पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डीतील जय गणेश व्हिजन या प्रशस्त आणि प्रतिष्ठीत हाउसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे – पाटील यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकमताने त्यांच्या चेअरमनपदी नियुक्तीचा ठराव संमत करण्यात आला. सोसायटीच्या सचिवपदी उमेश नामदे तर खजिनदारपदी बाबासाहेब बांगर यांची निवड झाली आहे. जय गणेश व्हिजन ए विंग प्रिमायसेस को-ऑप सोसायटीच्या नवीन व्यवस्थापकीय समितीच्या सभासदपदी अ‍ॅड. सरला निकाळे, संतोष काशीद, प्रदीप अग्रवाल, रवींद्र चौधरी, शांतीलाल आगरवाल, संतोष सुतार, बापूराव चोपडे, शैलेंद्र गायकवाड, मीना…

Read More

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२३ च्या पुणे विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा पुणे ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशभरात पुण्याच्या गणेशोत्सवाचे महत्व आहे. गणेशोत्सव हा समाजाचा उत्सव आहे. त्यामुळे त्यामध्ये लोकसहभाग कशा पद्धतीने वाढेल, हे आपण पाहिले पाहिजे. आजमितीस उत्सवातील लोकसहभाग कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे उत्सवाला धार्मिक, मंगलमय आणि समाजहिताचे रुप देण्याचा प्रयत्न करुया, असे आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२३ पुणे शहर महापालिका क्षेत्र परितोषिक वितरण सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. यावेळी पुण्याचे पोलीस…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – घरोघरी तिरंगा मोहिम ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्याच्या सूचना राज्यशासनामार्फत प्राप्त झाल्या असून आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इनोव्हेटीव स्कूल मोशी यांच्या वतीने आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा प्रारंभ उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते झाला. या रॅलीदरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी तथा उप आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुरज पवार तसेच आशिष काळदाते, वैभव फापडे, धनराज नाईकवाले, इनोव्हेटिव्ह शाळेचे अध्यक्ष संजय सिंग, प्रशांत पाटील, आरोग्य विभागाचे तानाजी दाते तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आनंद नागरे, आनंद मोरे सहभागी झाले होते. तसेच भालचंद्र देशमुख, भिकाजी थोरात या जेष्ठ नागरिकांनीही या…

Read More

नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवसेंदिवस विमानाने प्रवास करणार्‍यांची संख्या वाढत असल्यामुळे विमानतळांवर आता रेल्वे स्टेशन सारखी गर्दी होऊ लागली आहे. पुणे व मुंबई विमानतळावरील वाढता ताण कमी करण्यासाठी पनवेल-नवी मुंबई येथे होत असलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम शासनाने लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. केंद्र शासनाच्या वतीने मांडण्यात आलेल्या भारतीय विमान विधेयक 2024 वर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत खासदार बारणे यांनी वरील मागणी केली. खासदार बारणे म्हणाले की, सद्यस्थितीत भारतात 157 विमानतळ आहेत. देशातील वाढत्या लोकसंख्येनुसार विमानतळे वाढण्याची आवश्यकता आहे. एका अहवालानुसार 16 कोटी लोक विमानाने प्रवास करत आहेत. 3 कोटी लोक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळवडे गावठाणा मध्ये वारंवार वीजेची समस्या निर्माण होत होती. नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते. त्यामुळे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी 300 के.वी. ची 240 मीटर केबल, ४.५ ते ५ लाख रुपये किमतीची केबल उपलब्ध करून देऊन तळवडे येथील नागरिकांना विजेचे समस्येपासून वंचित केले. याप्रसंगी महेश दादा यांचे बंधू कार्तिक लांडगे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून केबल टाकण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी तळवडे ग्रामस्थांनी तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार महेश लांडगे यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे,मा. नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर, स्वी.नगरसेवक पांडुरंग भालेकर,…

Read More

जास्तीत जास्त संख्येने महिलांनी लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहावे – डॉ.नीलम गोऱ्हे पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ दि. १७ ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांचे उपस्थितीत करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची आखणी व नियोजन करण्यासाठी आज दि. १० ऑगस्ट रोजी बालेवाडी क्रिडा संकुल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विधानपरिषद उपसभापती मा.डॉ.नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांत पाटील, महिला व बाल कल्याण मंत्री मा.श्रीमती.आदिती तटकरे, आमदार प्रसाद लाड या सर्व मान्यवरांनी बैठकीत नियोजनाचा आढावा घेतला. सदर…

Read More