Author: maharashtrabreakingnews.com

‘अग्निविरां’मुळे समाजातील शिस्त वाढेल मेजर जनरल विजय पिंगळे पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पंतप्रधानांचे स्वप्न हे देशाला विकसित करण्याचे आहे. भारत त्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. अग्निविर योजनाही त्याचाच भाग आहे. भारताच्या प्रतिष्ठीत सैन्यात सेवा देऊन जेव्हा हे ‘अग्निवीर’ समाजात परततील तेव्हा, समाजातील शिस्त आणि समतोल देखील वाढेल. परिणातः देशातील भावी पिढी अधिक शिस्तप्रीय व जबाबदार होण्यास मदत होईल. तसेच देशप्रेम हे एक दिवसीय असू नये तर ते वर्षभर कार्यरत असावे,असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल विजय पिंगळे यांनी केले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे भारताच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी, व्यासपीठावर…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील  मोटार वाहन निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी बुधवार ऑगस्ट ला जेजुरी येथील फ्लाईंग राहिनो पॅरामोटार यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन २५०० फूटउंचावरुन पॅरामोटरींग करत रस्ता सुरक्षा जनजागृती होण्याच्या दृष्टीकोनातून ११ विविध प्रकारचे रस्ता सुरक्षाविषयक संदेश फलक दाखवून  इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये नोंद केली. रस्ता सुरक्षाविषयक संदेश फलक    एका पाठोपाठ एक असे दाखवून एक अनोखा व प्रेरणादायी उपक्रम केला. या उपक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये झाली आहे. त्याअनुषंगाने मेडल आणि प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. ही उल्लेखनीय बाब असून रस्ता सुरक्षा संदेश जनमाणसांमध्ये प्रसारित करण्याच्या महत्वपूर्ण व उल्लेखनीय कामगिरीबद्दल  महाराष्ट्र …

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय व श्रीमती सी के गोयल प्राथमिक विद्यामंदिर व श्रीमती के जे गुप्ता ज्युनिअर कॉलेजमध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालक संघाचे अध्यक्ष  हर्षदा दुर्गुडे,व रेल्वेचे पोलीस निरीक्षक  अनिल सरोदे साहेब यांच्या  हस्ते ध्वजारोहण झाले .तसेच पालक संघाचे सदस्य ऍड युवराज गटे, रवींद्र बिरादार, उद्योजक गणेश राव कांबळे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष जगदीश दादा जाधव सचिव संजय भाऊ जाधव संचालक  विजय जाधव, संचालक  अमित बच्छाव त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक साहेबराव…

Read More

युवक काँग्रेसच्या वतीने आशा स्वयंसेविकांचा आरोग्य दूत पुरस्काराने सन्मान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळेवाडी येथे देशाच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभागातील आशा स्वयंसेविकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने १९ आशा स्वयंसेविकांना ‘आरोग्य दूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष कैलास कदम, प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस बिंदूताई तिवारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्ते गौरव चौधरी, कार्याध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष सजी वर्की, वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण विभाग सरचिटणीस अमर नाणेकर, सेवा दल मा.अध्यक्ष मकरध्वज यादव, हिरामण खवळे पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, प्रदेश सोशल मीडिया…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकशाहीचा जागर करीत शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी महापालिका कटिबद्ध असून आपल्या प्रेरक इतिहासाचा अभिमान बाळगत, उज्ज्वल भविष्य साकारण्यासाठी वर्तमानातील जबाबदारी स्विकारत मंगलमय भावनेने स्वातंत्र्य दिन साजरा करूया, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा ७७ वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना आयुक्त सिंह बोलत होते.    या राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमास आमदार उमा खापरे, माजी महापौर अपर्णा डोके, उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसदस्य नामदेव ढाके, गोविंद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने लढणार आहे. यासाठी राज्यातील २८८ मतदारसंघाबाबत दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू झाली आहेत. राज्यात पक्षानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. यात खेड-आळंदी मतदारसंघात गेल्या चार वर्षापासून आम्ही कंबर कसली असून तयारीत आहोत. आता ‘इंडिया आघाडी’सोबत निवडणूक लढायची की स्वबळावर लढायची, यासंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, परंतु आम्ही सध्या संपूर्ण मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे, अशी जाहीर भूमिका आम आदमी पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष ‘मयूर दौंडकर’ यांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजगुरूनगर येथे पत्रकार परिषद पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की,…

Read More

– पुण्यातील कमलनयन बजाज रुग्णालयात घेतली कुटुंबियांची भेट – विजय मैदानात पुन्हा येईपर्यंत सर्वोतोपरी मदत करण्यासाठी पुढाकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –महाराष्ट्राचा उदयोन्मुख कुस्तीपटू विजय डोईफोडे याला गंभीर अपघात झाला. डोईफोडे कुटुंबियांना आधार देण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी रुग्णालयात भेट दिली आणि सर्वोतोपरी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुण्यात झालेल्या अपघातामध्ये महाराष्ट्राचा उदयोन्मूख कुस्तीपटू पैलवान विजय डोईफोडे याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक स्पर्धांमध्ये राज्याला पदकांची कमाई करुन देणारा हा कुस्तीपटू अक्षरश: मृत्यूशी झुंज देत आहे. कुस्तीक्षेत्रात यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी पैलवान विजय डोईफोडे याची आज रुग्णालयात भेट घेतली.…

Read More

– पंधरा दिवसात परवाना न दिल्यास आक्रमक आंदोलनाचा बाबा कांबळे यांचा इशारा पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – 2023 च्या सर्वेनुसार शहरातील सर्व टपरी, पथारी, हातगाडीधारकांना येत्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर परवाना द्या. अन्यथा पिंपरी चिंचवड महापालिकेला टाळा ठोकून महापालिका कामकाज बंद पाडू, असा गंभीर इशारा टपरी, पथारी, हातगाडी पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला. टपरी, पथारी, हातगाडीधारकांच्या प्रश्नांवर संघटनेच्या वतीने बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महापालिका मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाबा कांबळे बोलत होते. यावेळी टपरी पथारी हातगाडी पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे सरचिटणीस प्रकाश यशवंते, शहराध्यक्ष रमेश शिंदे ,शहर उपाध्यक्ष मेहबूब पटेल , सरोज कुचेकर…

Read More

खान्देश कानबाई माता उत्सव समितीच्या वतीने उत्सवाचे आयोजन     पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कानबाई उत्सव हा खान्देशातील प्रमुख उत्सव आहे. जात, पात, धर्म बाजूला ठेवून हा उत्सव साजरा केला जातो. खान्देशात पिढ्यानपिढ्यापासून हा उत्सव सुरु आहे. सासू सुनेला, आई आपल्या मुलीला या उत्सवाबद्दल सांगत परंपरा पुढे नेण्याचा सल्ला देत असून, ‘कानबाई’ उत्सवातून खान्देशच्या सांस्कृती-परंपरेचे दर्शन घडत असते. वडीलधाऱ्यांकडून मिळालेला हा वारसा पुढे नेण्याचे काम पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक नगरीत सुरू असल्याचा एक खान्देशी म्हणून अभिमान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले. खान्देश कानबाई माता उत्सव समिती, पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने खान्देशातील संस्कृती, परंपरा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पादचाऱ्यांसाठी, सायकलप्रेमी तसेच लहान शाळकरी मुलांसाठी आणि रहिवाशांसाठी सार्वजनिक परिसर हा स्वच्छ, सुंदर आणि उत्साहवर्धक बनवण्याच्या उद्देशाने आपण हरित सेतू हा उपक्रम राबवीत आहोत, तसेच घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा झेंडा फडकवावा,तसेच महापालिकेच्या हरित सेतू उपक्रमात देखील आपला सहभाग नोंदवून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा या मोहीम तसेच हरित सेतू उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी आज सकाळी ६ वाजता आकुर्डी परिसरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते. आजच्या कार्यक्रमात सह…

Read More