Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी न्यायालयात स्वातंत्र्यदिनी नवनियुक्त न्यायाधीशांचा सन्मान समारंभ संपन्न पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी, नेहरूनगर येथील न्यायालयात देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रध्वजाला न्यायालयीन पोलिसांद्वारे शासकीय मानवंदना देऊन झाला. पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एन. आर. गजभिये आणि पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांच्याद्वारे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व वकिलबांधवांनी सामुदायिकपणे राष्ट्रगीताचे गायन केले. पिंपरी न्यायालयात नव्याने रुजू झालेले नवनियुक्त न्यायाधीश ऐ. के. अमुदी, एस. एन. गवळी, श्रीमती टी. एस. महाडीक, वी. एस. डामरे यांचा सत्कार पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. दिनकर बारणे, ॲड. विलास कुटे,…

Read More

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –   चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, मधील प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (सीबीएसई) प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, सोमाटणे व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उद्योगपती व प्रख्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमणलाल जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ.भूपाली शहा, प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, पी.आय.बी.एम.चे संचालक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जगतगुरु संत तुकाराम महाराज व शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन पुण्यभुमित भक्तीशक्ती निगडी येथे  ७८ व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने आमच्या OGW FOUNDATION अंतर्गत २५ महिला व मुलींचा पारंपारिक पोशाखामध्ये ध्वज वंदना करत देशभक्तीपर गितांवर लेझीम पथकाने लेझीम नृत्य सादर केले . यावेळी संस्थेच्या फाउंडर अध्यक्षा डॉ. रेखा भोळे म्हणाल्या की आपण शहरात आपली मुलं इंग्लिश मीडियम मधून शिक्षण घेत असताना काळाच्या ओघाने आपली पारंपारिक संस्कृती व पोशाख विसरत चाललेले आहोत त्यासाठी OGWF च्या माध्यमातून आमच्या संस्थेशी जुळलेल्या सर्व महिला भगिनीं या कार्यक्रमा अंर्तगत संस्कृती जोपासण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत. यामध्ये  गोरी सरोदे, विभावरी…

Read More

नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तुल्हा क्लासेस,समता नगर,नवी सांगवी येते रक्षाबंधन साजरा करण्यात आला क्लास )च्या विद्यार्थी मुलींनी मेघराज लोखंडे अध्यक्ष – चिंचवड विधानसभा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रपवार,पिंपरी – चिंचवड शहर ( जिल्हा ) यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली. या वेळी दिशिका पवार,रेखा परमार,अनयरा जगताप,आराध्या खंडाळे,सिद्धी चव्हाण,आस्था बनघाल,सावनीओव्हाळ,वेदिका शिंदे,समीक्षा शिंदें,लक्ष्मी जंगडी,सई लाड,अक्षरा बिरादार,शुभरा रांजणे,अनुष्का पोटगल या विद्यार्थी मुली उपस्थित होत्या.

Read More

विविध उपक्रमांनी अरुण पवार यांचा वाढदिवस साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या १२ वर्षात शासन दरबारी खूप प्रयत्न करूनही पिंपरी – चिंचवड शहरात मराठवाडा भवनसाठी जागा मिळू शकली नाही. मात्र, पिंपरी – चिंचवड शहरात मराठवाडा भवन करायचेच, हा निर्धार मनात ठेवून मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांनी स्वतःची पिंपळे गुरव येथील १० गुंठे जागा मराठवाडा भवन बांधण्यासाठी दान केली. आज पिंपळे गुरवसारख्या ठिकाणी तब्बल ४० लाख रुपये प्रति गुंठा जागा असतानाही आपल्या फायद्याचा विचार न करता १० गुंठे जागा दान केल्याने शहरातील मराठवाडा वासियांनी अरुण पवार यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात वृक्षमित्र अरुण…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काँग्रेस पक्षाच्या आघाडी संघटनांकडून खड्ड्यांचे फोटो असलेली फ्रेम देत आयुक्तांचा निषेध करण्यात आला, याप्रसंगी आयुक्तांनी सदर फ्रेम घेण्यास नकार देत निघून जाणे पसंत केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारत द्वारा जवळील पायऱ्यांवर आज काँग्रेसच्या आघाडी संघटनांकडून युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि एन एस यू आय च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तसेच शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात असलेल्या खड्ड्यांमुळे आणि सर्वत्र नागरिकांच्या झालेल्या गैरसोयींच्या निषेधार्थ फ्रेम भेट आंदोलन करण्यात आले. खड्ड्यांच्या या विषयाकडे तात्काळ लक्ष वेधून योग्य उपाय योजना व्हाव्या यासाठी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या खड्ड्यांचे फोटो एकत्रित एका फ्रेम वर घेऊन ती फोटो फ्रेम आयुक्तांना भेट देण्यासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  स्वातंत्र्य दिनानिमित्त चिंचवड येथील युनिक  व्हिजन इंग्लिश मीडियम स्कुल येथे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी  अश्विनी चिंचवडे, शाळेचे संचालक श्रीराज चिंचवडे, महेश बारसावडे, शिक्षक, विधार्थी व पालक उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कार्यक्रम बघुन पुन्हा शालेय जीवनाची आठवण झाली.

Read More

स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजाने उजळले आकाश आनंद, अभिमान, सन्मानाचा जयघोष पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर इथे ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या पार्श्वभुमीवर शाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांनी मानवंदन संचलन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. देशभक्तीपर गाणी, नृत्य, नाटक, तसेच भाषणे सादर करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉ. पोपटराव येवले यांनी ध्वजारोहण केले. त्यांच्या भाषणाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. कार्यक्रमाला चॅलेंजर पब्लिक स्कूलचे चेअरमन श्री संदीप काटे तसेच श्री निलेश काटे, सौ लीना काटे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. डॉ कविता शिंदे, प्रतिभा पाटील, हेरंभ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी १०.१० वाजता साजरा करण्यात आला.पिंपरी विधानसभेचे आमदार श्री.आण्णा बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. आमदार आण्णा बनसोडे आपल्या भाषणात म्हणाले की, भारत देश हा सर्वात मोठा शेती प्रधान व लोकशाही मानणारा देश आहे. भारत देशात अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात व एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात. स्वातंत्र्यानंतर देशाने विविध क्षेत्रांत प्रगती केली असून शिक्षण क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे. आपण सर्वांनी देशासाठी बलीदान देणाऱ्या सैनिकांना व विविध क्षेत्रात देशासाठी योगदान देण्याऱ्या महामानवाचे नेहमी स्मरण करावे, तसेच स्वातंत्र्य दिनाच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पिंपरीच्या वतीने गुणवंत कामगाराची रॅली काढून  गुणवंत कामगार आण्णा जोगदंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संततुकाराम नगर येथील ध्वजारोहण प्रसंगी आण्णा जोगदंड यांनी तिरंगा ध्वजाचा मान राखून, स्वतंत्र सैनिक, वीर हुतात्मे यांच्या भावनेचा व कार्याचा सन्मान करून मी भारताचा विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेल अशी उपस्थितांना शपथ दिली. भारतीय नागरिकांनी आपण सर्व जण प्रथम भारतीय आहोत. सर्वांनी एकोप्याने गुण्या गोविंदाने राहून जात,धर्म, वंश याचा भेदभाव न करता आपण सर्वजण एकाच भारतमातेचे पुत्र आहोत याची सर्वांनी जाण ठेवावी. आप आपसातील मनभेद,व मनभेद बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र आले पाहिजे असे मत जोगदंड यांनी…

Read More