नेहरूनगर न्यायालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
पिंपरी न्यायालयात स्वातंत्र्यदिनी नवनियुक्त न्यायाधीशांचा सन्मान समारंभ संपन्न
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी, नेहरूनगर येथील न्यायालयात देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रध्वजाला न्यायालयीन पोलिसांद्वारे शासकीय मानवंदना देऊन झाला. पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एन. आर. गजभिये आणि पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांच्याद्वारे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व वकिलबांधवांनी सामुदायिकपणे राष्ट्रगीताचे गायन केले. पिंपरी न्यायालयात नव्याने रुजू झालेले नवनियुक्त न्यायाधीश ऐ. के. अमुदी, एस. एन. गवळी, श्रीमती टी. एस. महाडीक, वी. एस. डामरे यांचा सत्कार पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. दिनकर बारणे, ॲड. विलास कुटे, ॲड. किरण पवार, ॲड. गोरखनाथ झोळ यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पुणे अति. जिल्हा न्यायाधीश राजकुमार भक्त, निवृत्त न्यायाधीश श्रीयुत पोळ तसेच पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. मोरे, व्ही. एन. गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. मुकुंद ओव्हाळ आणि ॲड. अप्पु मुल्या यांनी देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले. तसेच प्रत्येकवर्षी नित्यनियमाने व्यवस्थित राष्ट्रध्वज बांधणारे ॲड. दत्ता झुळूक यांचा विशेष सत्कार करण्यात आला, त्यावेळी उपस्थित ॲड. संगीता परब, ॲड. सुजाता बीडकर, ॲड. मोनिका गाढवे, ॲड. अतुल अडसरे, ॲड. योगेश थंबा, ॲड. गौरव वांळुज, ॲड. अमोल गव्हाणे, ॲड. राकेश जैध, सरकारी वकील ॲड.भूषण पाटील, ॲड. राठोड, ॲड. मंगेश खराबे, ॲड. रिना मगदुम, ॲड. मानसी उदासी, ॲड. विवेक राऊत, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. सारिका भोसले, ॲड. राज जाधव इत्यादी सर्व मोठ्या संख्येने न्यायालयीन कर्मचारी व वकील बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, खजिनदार ॲड. अजित खराडे, सदस्य ॲड. मीनल दर्शले, ॲड. दशरथ बावकर, ॲड. फारूख शेख यांनी केले. ॲड. धनंजय कोकणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ॲड. उमेश खंदारे यांनी आभार मानले.