काँग्रेसकडून शहरातील खड्डयांची फोटो फ्रेम भेट देत आयुक्तांचा निषेध
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काँग्रेस पक्षाच्या आघाडी संघटनांकडून खड्ड्यांचे फोटो असलेली फ्रेम देत आयुक्तांचा निषेध करण्यात आला, याप्रसंगी आयुक्तांनी सदर फ्रेम घेण्यास नकार देत निघून जाणे पसंत केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारत द्वारा जवळील पायऱ्यांवर आज काँग्रेसच्या आघाडी संघटनांकडून युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि एन एस यू आय च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तसेच शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात असलेल्या खड्ड्यांमुळे आणि सर्वत्र नागरिकांच्या झालेल्या गैरसोयींच्या निषेधार्थ फ्रेम भेट आंदोलन करण्यात आले.
खड्ड्यांच्या या विषयाकडे तात्काळ लक्ष वेधून योग्य उपाय योजना व्हाव्या यासाठी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या खड्ड्यांचे फोटो एकत्रित एका फ्रेम वर घेऊन ती फोटो फ्रेम आयुक्तांना भेट देण्यासाठी कार्यकर्ते गेल्या 16 दिवसापासून प्रयत्न करत होते मात्र आयुक्त त्यांना सातत्याने भेट देणे टाळत होते या पार्श्वभूमीवर आज थेट आयुक्तांना गाठत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने फ्रेम भेट देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ते नाकारत तत्काळ निघून जाणे पसंत केले.
याप्रसंगी महिला काँग्रेसचे अध्यक्ष सायली नढे महिला काँग्रेस नेत्या स्वाती शिंदे ज्येष्ठ नेते अभिमन्यू दहिदुले शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, एन एस यू आय चे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. उमेश खंदारे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, आबासाहेब खराडे, तन्मय इंगवले क्षितिज गायकवाड, विशाल सरवदे, भाग्यश्री थोरवे, प्रज्ञा जगताप, प्रियांका सगट, संयम कर्नावट आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.