Author: maharashtrabreakingnews.com

– महानगरपालिका सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मान्यता – आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारणीलाही चालना पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात भर घालणाऱ्या संविधान भवनाच्या उभारणीसाठी वास्तू विशारद संस्थेच्या नियुक्तीला महानगरपालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता लवकरच या ऐतिहासिक वास्तुची पायाभरणी होणार आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करता यावा. तसेच, संविधानाबाबत जनजागृती व्हावी. या करिता भारतातील पहिले संविधान भवन उभारण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित भारतीय संविधान भवन आता शहरवासीयांच्या दृष्टीक्षेपात आले असून, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासनाने प्रस्तावित जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात दिली आहे.…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक आणि भाजपचे माजी नेते रवि लांडगे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आज मंगळवार दिनांक २० ऑगस्ट रोजी, मुंबईतील मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रवि लांडगे शिवसेनेत औपचारिकरित्या प्रवेश करणार असून रवी लांडगे यांच्या हाती मशाल असणार आहे. प्रवेश सोहळ्यासाठी लांडगे यांच्यासोबत सुमारे ५०० वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला होता. रवि लांडगे यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ते भाजपकडून बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निवडीसोबतच पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्तेचा पाया रचला गेला होता. लांडगे कुटुंबीय हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे शैक्षणिक  संकुलात 78 वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा करण्यात आला. डूडुळगाव शैक्षणिक संकुलात 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाला कॅप्टन पदमसिंह सिकरवार अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला. त्याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  विलास लांडे , सचिव  सुधीर मुंगसे, खजिनदार  अजित गव्हाणे,  विक्रांत लांडे,  शुभांगी  लांडे,  विनया मुंगसे,  सुमित मुंगसे, प्रा. किरण चौधरी, रजिस्ट्रार अश्विनी भोसले सर्व प्राचार्य डाॅ. किशोर जैन, डाॅ. धनंजय बागूल, डाॅ. लक्ष्मण चौधरी,  नीतू अरोरा,  धनश्री कुतवाळ,  उर्मिला जाधव, डाॅ. के. जी. कानडे सर, कुंभार सर, शेळके सर, भालेराव सर यांच्यासह ज्यांनी भारत…

Read More

१५ ऑगस्ट दिनी माऊली मंदिरात लक्षवेधी उपक्रम उत्साहात आळंदीकरांनी लुटला देशभक्तीचा आनंद आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पहिला क्रांतिकारक जर कोण असेल तर ते आद्य क्रांतिकारक भगवान विष्णू होत.त्यांनी वराह अवतारात पृथ्वीस दुष्टांपासून सोडविले. जमिनीला मातृत्वाचा अधिकार दिला. स्वातंत्र्य दिनी आळंदी मंदिरात २००० क्रांतिकारकांचे छायाचित्रांचे प्रदर्शन होत आहे. याचा आनंद होत आहे. यापुढे असेच अधिक प्रशस्त जागेत अतिशय उत्तम प्रदर्शन पुन्हा भरवावे. त्यास सर्वोतोपरी सहकार्य आळंदी देवस्थान करेल अशी ग्वाही सर्व क्रांतीकारकांच्या त्यागाच्या देश सेवेच्या भूमिकेस वंदन करीत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी यांनी दिली. देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने प्रणित कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधन दिनी श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने पाठविलेली राखी श्रींचे समाधीला स्पर्श करीत श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी यांचे हस्ते अर्पण करण्यात आली. श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांचे वतीने मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी यांचे प्रमुख उपस्थितीत श्रींना रक्षा बंधन दिनी श्रींचे संजीवन समाधीस स्पर्शीत…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  येथील डुडुळगाव ( ता.हवेली ) येथून वाहणा-या इंद्रायणी नदीत वेदश्री तपोवन या संस्थेत वेदांचे शिक्षण घेणारे तीन साधक विद्यार्थी बुडातयाची दुर्दैवी घटना सोमवारी ( दि. १९ ) सकाळी नौचे सुमारास घडली. या घटनेतील एक मुलास बाहेर काढल्या नंतर उपचार दरम्यान मृत्यू झाला. तर दुस-या मुलाचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला. अजून तीस-या मुलाचे शोध कार्य रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. श्रावण निमित्त नदी पूजन विधीसाठी डुडुळगाव येथील नदी काठा वरती मुले उतरले होते. हे सर्व वैदिक विद्यार्थी नदी पूजनासाठी इंद्रायणी नदीच्या काठी डुडूळगाव येथे गेले होते. आळंदीपासून जवळच असलेल्या डुडुळगाव येथील इंद्रायणी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाजीनगर येथील स्टेप्स फाउंडेशनच्या वतीने माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. तसेच 1350 वृक्षांचे देहू आणि आळंदी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कारगील योद्धा रामदास मदने, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संदेश मुखेडकर, रोटरी क्लबचे पिंपरी सचिव संदीप पोलकम, मोरया अकॅडमीचे संस्थापक प्रा.नितीन साळी, संजीवनी डिंबळे, अश्विन गुडसुरकर, अजिंक्य जाधव, ज्ञानसागर स्कूलचे प्रमुख प्रदीप रॉय, नीलम गुप्ता, नरेश सोंडकर, संदीप मिश्रा, डॉ. अमित बेलोकर, डॉ. संतोष पाचपुते, लीतेश घरडे, कमलजीत सिंह, भक्ती मुखेडकर, संदीप मोरे, अभिषेक कुंटुरकर, दीपाली नारगुंडे, दुर्गेश पुराणिक, व्यंकटेश सोमवंशी, मनोज दराडे, ऋषिकेश गुडसुरकर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आपण समाजाचे काहीतरी…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३१ व्या नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत जुबेन अलिफ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी ज्येष्ठ कवी अशोक कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा संपन्न झाली. यावेळी नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव, सचिव माधुरी ओक, सह सचिव अश्विनी कुलकर्णी, संपतराव शिंदे, दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. काव्यलेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे ९२ कवींपैकी सुमारे ६५ कवींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कविता सादरीकरण…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – “ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा व्हावा आणि तो सदैव उघडा राहावा!” असे विचार सांगली येथील सुप्रसिद्ध कवी ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे यांनी क्लब हाऊस, प्रिस्टीन प्रोलाईफ सोसायटी, वाकड येथे रविवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी व्यक्त केले. सेवानिवृत्त प्राचार्य, ज्येष्ठ पत्रकार, व्यंगचित्रकार आणि कवी कै. रा. ना. तथा दिनेश रोडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त काव्यजागर पुरस्कार स्वीकारता नितीन चंदनशिवे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, डॉ. अतुल रोडे, छायादेवी रोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. नितीन चंदनशिवे पुढे म्हणाले की, “आईच्या कवितेत बापाची जागा शोधायची असते.…

Read More

पीसीयु मध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ’ सोहळा उत्साहात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शैक्षणिक प्रवासात कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही आयुष्याचा भक्कम पाया तयार करण्यासाठी शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे शिक्षण घेताना अनंत अडचणी आव्हाने आपल्यासमोर येतात या आव्हानांना जिद्द चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामोरे जा हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयु) उपलब्ध संसाधनांचा आणि संधींचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. पीसीयु येथील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेचा २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे स्वागत…

Read More