- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बदलापूर येथील आंदोलनकर्त्या वरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर वतीने पक्षाचे नेते माननीय अजितभाऊ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरअध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “भिक्षा दे ग माई सीतेचे अपहरण करण्यासाठी साधू वेषात आलेल्या रावणाचे हे शब्द होते. आत्ताही तसेच घडत आहे. निवडणुकीच्या तोंडावर माता-बहिणींच्या मतांचे अपहरण करण्यासाठी तीन तोंडी रावण लाडकी बहीण, लाडकी बहीण म्हणत दारोदार भटकत…
एनईपी मुळे देशातील शैक्षणिक सुधारणांना डिजिटल “बुस्टर” – आनंदराव पाटील पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारने देशातील शैक्षणिक सुधारणांवर भर दिला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २०२० (एनईपी) दीक्षा, माध्यान्य भोजन, निष्ठा, प्रेरणा, ध्रुव, प्रकाश, युडीआय एसईप्लस, अपार आयडी, सफल, पीएम ई-विद्या, आभासी प्रयोगशाळा तयार करण्यात येत आहेत. याव्दारे वर्तमान आणि भविष्यातील शैक्षणिक बदलांची गरज ओळखून डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला जाणार आहे. या बदलांसाठी शैक्षणिक संस्था, शिक्षकांनी सज्ज रहावे, असे आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड ट्रस्ट एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या रावेत येथील एस.बी. पाटील पब्लिक स्कूल…
आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची उपस्थिती पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदार संघातील सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्याकरिता तसेच शहराच्या विकासासाठी सूचना व संकल्पना मांडण्यासाठी ‘संवाद सोसायटीधारकांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली, मोशी, चऱ्होली पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने रविवारी (दि.२५ ऑगस्ट) लक्ष्मी चौक, चिखली येथील सिझन बॅन्क्वेट हॉल येथे सकाळी १० वाजता ‘संवाद सोसायटीधारकांचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सोसायटीधारकांशी विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. तसेच, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत अशी माहिती फेडरेशनच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कामगार नेते यशवंत भोसले यांच्या विनंती नुसार पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ पुणे म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संत तुकाराम नगर पिंपरी येथे म्हाडाच्या घरांची पाहणी केली व म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नागरिकांना दिले. याप्रसंगी व कामगार नेते मा यशवंत भाऊ भोसले यांच्या हस्ते मा शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा म्हाडाचे अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी माजी खासदार अमर साबळे, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील प्रकल्प अधिकारी मोरडे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष मा सदाशिव खाडे, माजी नगरसेवक बबनराव गाढवे, मा नगरसेविका सुजाता…
चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मधील एमबीए व एमसीए मध्ये पदवी घेतलेले 251 विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपनीमध्ये प्लेसमेंट द्वारे रोजगार उपलब्ध करण्यात आला आहे अमेरिकन डिलाईट कंपनीत एमबीए ची पदवी घेतलेला कृणाल परदेशी याला १९ लाख ५० हजाराचे तर एमसीए मध्ये पदवी घेतलेला रोहन राऊत याला ११ लाखाचे पॅकेज मिळाले आहे. एमबीए मध्ये शिक्षण घेत असलेले नऊ विद्यार्थ्यांची आयआयटी मुंबई येथे कॅम्पस अँबेसेडर इनोव्हेशन सेल उद्योजकता सेल विभागात निवड झाली. पुणे जिल्ह्यातून एकमेव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मालविका ओझा हिने सेट परीक्षेत प्राविण्य मिळविले. नुकतेच महाविद्यालयाच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार अमित गोरखे यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा देत SC/ST अतीवंचित दलितांचा भारत बंदला विरोध दर्शवला आहे. गोरखे म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता हमाली करणाऱ्या, नाली साफ करणाऱ्या आणि कष्टकरी मजुरांच्या मुला-मुलींना अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आम्ही भारत बंदला विरोध करत आहोत.” वर्षानुवर्षे SC/ST अतीवंचित दलित जातीतील विद्यार्थी उपेक्षित राहिले आहेत, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण उपवर्गीकरण निर्णयामुळे गरजवंत विद्यार्थी आता लोकशाहीतील न्याय, बंधुता आणि समानतेचा अधिकार मिळवू शकतील. या निर्णयामुळे अतीवंचित गरीब विद्यार्थ्यांना शासकीय निवासी वस्तीगृह, शासकीय महाविद्यालय, शिष्यवृत्ती, आणि इतर शैक्षणिक योजनांचा लाभ मिळणार आहे. गोरखे पुढे म्हणाले की, “शिक्षणाच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड शहरातील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित बसविण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर सतर्कता म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य व सक्तीचे करणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बहुतांश प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे दिसून येत आहे. अनेक पालकांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिथे कॅमेरे आहेत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली २६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत दिव्यांग भवन फाऊंडेशन मोरवाडी, पिंपरी -१८ या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने विविध विभागप्रमुखांमार्फत मोरवाडी येथील दिव्यांग भवन व परिसराची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, समाजविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट, माहिती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत हस्तांतरित करण्यात आलेली आर्थिक लाभाची रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित करण्यात येऊ नये, तसेच आधार कार्ड बँकेशी संलग्न नसल्यास विशेष मोहीम राबवून यासंदर्भात कामकाज लवकरात लवकर पूर्ण करावे, आणि लाभार्थ्यांचे प्रलंबित कर्जाची परतफेड न केल्यामुळे बंद असलेले बँक खाते तत्काळ सुरु करण्यात यावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अनुषंगाने जुलै आणि ऑगस्ट २०२४ महिन्याची एकत्रित रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यानुसार लाभार्थी महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहे. परंतु काही लाभार्थी महिलांच्या खात्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘ विद्यालयाविषयी कृतज्ञताभाव जपणे हाच मोलाचा संस्कार आहे. याच भावनेतून समाजाला दिशा देण्याचे अनमोल कार्य घडत आहे.’ असे प्रतिपादन सासवड मधील बाल संस्कार वर्गांचे संचालक आणि ज्येष्ठ वास्तुशास्त्रज्ञ संजय रोकडे यांनी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघिरे विद्यालयाच्या मार्च १९८८ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मिळून उभारलेल्या निधीतून विद्यालयात शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नववा सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर वाघिरे विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका सुषमा न्हालवे, सिरम इन्स्टिट्यूटचे वंदन वढणे आणि बांधकाम व्यावसायिक मुकुंद शेवते या मान्यवरांची उपस्थिती होती. शारदामातेचे पूजन करून आणि राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. ज्येष्ठ कवयित्री…
