- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
नांदेड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – एक संघ समाज ही काळाची गरज असून समाजाचे अनेक आंदोलने आणि समाजाने दाखवलेली एकजूट यातून समाजाच्या कल्याणाचे अनेक निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत.मला मिळालेली ही आमदारकी ही समाजाच्या लढ्याचे आणि त्यागाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आमदार अमित गोरखे यांनी केले. ते नांदेड येथील नियोजन भवन मध्ये आयोजित केलेल्या अण्णा भाऊ साठे जयंती व्याख्यान कार्यक्रम आणि सत्कार कार्यक्रमानिमित्य सकल मातंग समाज आयोजित सत्कार समारंभाला उत्तर देताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की समाजावर होणारे अन्याय अत्याचार आणि समाजाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रात कुठेही शब्द खर्च करण्याची गरज पडेल तिथे मी कमी पडणार…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – तळवडेतील सहयोगनगर येथील वाहतुकीच्या रस्त्यामध्ये 40 वर्षांपासून असलेला टॉवर अखेर हटविण्यात येणार आहे. त्याजागी मोनोपॉल उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. मोनोपॉल कमी जागेत उभारल्याने सहयोगनगर ते त्रिवेणीनगर दरम्यान होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे. परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत तळवडे प्रभाग क्रमांक 12 मधील सहयोगनगर येथे वाहतुकीच्या रस्त्यामध्ये महापारेषणाचा अतिउच्च दाबाचा (220 kv EHV line) टॉवर सुमारे 40 वर्षांपासून कार्यरत आहे. तळवडे ही औद्योगिक वसाहत तसेच आयटी पार्क असल्यामुळे लोकवस्ती व वाहतूक कोंडी येथे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.…
विद्यार्थी- महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाची सतर्कता पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील शासकीय व खासगी शाळांमध्ये ‘सुरक्षा ऑडीट’ करण्याबाबत नियमावली तयार करण्यात येणार आहे. तसेच, शाळांना मान्यता देताना सुरक्षाबाबत नियमावली व कडक अंमलबजावणी करण्याबाबत ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केली. बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच निगडीत असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळेतील तेरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाला निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे. तसेच, पूर्वी अशा प्रकारचा गुन्हा केल्यानंतर पुन्हा त्याला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यासह…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पश्चिम बंगाल, बदलापूर, कोल्हापूर या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घडलेल्या घटना अत्यंत दुदैवी आहे. समाज मन दुखावणा-या, महिला अत्याचाराच्या या घटनेचा भाजपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात राज्यात सर्वत्र “जाणीव जागर” करण्यात येत आहे. या अनुषंगाने भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने काळ्या फिती बांधून “जाणीव जागर” करण्यात आला. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वात चिंचवड स्टेशन चौक येथे वस्ताद लहूजी साळवे पुतळ्यास पुष्पार्पण करून या जाणीव जागराला सुरुवात झाली. यावेळी, नागरिकांना स्त्री सुरक्षा विषयक शपथ देण्यात आली. शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले कि, बदलापूर, कोल्हापूर, पश्चिम बंगाल या सारख्या घटना अत्यंत…
– सोसायटीधारक नागरिकांना मोठा दिलासा – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली येथे डिफेन्स कॉलनी परिसरातील पाणी समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सोयटीधारक व स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. डिफेन्स कॉलनी येथील पाणी पुरवठा विस्कळीत आणि अपुरा होत आहे. अशा तक्रारी स्थानिक नागरिक व रहिवाशांनी यांनी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालयाचे संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. पाणी समस्या कायमस्वरुपी सोडवण्याकरिता उपाययोजना करण्याची सूचना केली होती. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे यांच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिका…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – बदलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्या अत्याचारी नराधमास फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे. सध्याच्या सरकारमध्ये गृहखातं पूर्णपणे झोपलेले असल्याचे दिसून येते. या अत्याचारांच्या घटनांबाबत सरकार अत्यंत असंवेदनशील असून राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. भारतीय संविधान व न्यायव्यवस्था यांचा आदर करणारे आम्ही लोक आहोत, त्यामुळे राज्यव्यापी बंद न करता निषेध आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु या…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने एक्सवर याची माहिती दिली आहे. दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून हेलिकॉप्टरमधील वैमानिकासह तीनही प्रवाशी सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. सदर हेलिकॉप्टर मुंबईहू हैदराबादच्या दिशेला जात होते. मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. अपघातात पायलटला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरमधील तीन प्रवासी सुखरुप असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली. ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे हेलिकॉप्टर तीन प्रवाशांना घेऊन मुंबईतील जुहूमधून हैद्राबादकडे निघाले होते. पौड परिसरात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड वीज उपकेंद्र परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिक वैतागले आहे. पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात विद्युत महामंडळाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचा आरोप करत याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी भाजपा उपाध्यक्ष तथा ब प्रभाग माजी स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी यांनी पत्राद्वारे केली आहे. वाल्हेकरवाडी भागात वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने बिभीषण चौधरी यांच्या नेतृत्वात शिष्ठमंडळाने महावितरणच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी वीज पुरवठा…
काळेवाडी प्रभागातील सर्वच शाळा व्यवस्थापकांना दिले निवेदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- बदलापूरच्या घटनेनंतर शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळेत लहान मुलींची काळजी घेण्यासाठी पुरुष कर्मचारी नेमल्याने ही घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये मुलींच्या काळजीसाठी महिला कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड उपशहरप्रमुख हरेश नखाते यांनी केली आहे. यासंदर्भात हरेश नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक आणि पालकांच्या शिष्टमंडळाने काळेवाडी प्रभागातील सर्वच शाळा व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. यावेळी विभागप्रमुख गोरख पाटील, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, बाळासाहेब येडे, कृष्णा येळवे, सुंदर खंडागळे आदी उपस्थित होते. सदर निवेदनात म्हंटलं आहे की, बदलापूर मध्ये…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- गणरायाच्या आगमन व विसर्जन मार्गांत अडथळा ठरणारे खड्डे पुढील एक आठवड्यात बुजविण्यात यावेत. या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेत घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी चिंचवड शहर खड्डे मुक्त झाले पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे अनेक महिन्यापासून पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु याची दखल न घेतली गेल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दापोडी येथील मेट्रो स्टेशनच्या खाली असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत आंदोलन करण्यात आले. तसेच यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांच्या दालनाच्या येथे घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी…
