ताज्या घडामोडीपिंपरी

वाल्हेकरवाडी भागात वीज पुरवठा सुरळीत करा; अन्यथा आंदोलन भाजपा उपाध्यक्ष बिभीषण चौधरी यांचा महावितरणला इशारा

Spread the love

 

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड वीज उपकेंद्र परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिक वैतागले आहे. पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात विद्युत महामंडळाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचा आरोप करत याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी भाजपा उपाध्यक्ष तथा ब प्रभाग माजी स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी यांनी पत्राद्वारे केली आहे.

वाल्हेकरवाडी भागात वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने बिभीषण चौधरी यांच्या नेतृत्वात शिष्ठमंडळाने महावितरणच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी वीज पुरवठा खंडीत होणे, घरगुती उपकरणे जळणे, शाँर्टसर्किट होणे, मंजूर ट्रान्सफाँर्मर बसविणे, अंडरग्राऊंड केबल जळणे, तसेच नागरिकांची नूकसान भरपाई देणे आदी समस्या सोडविण्याची मागणी केली. यावर, महावितरणचे अधिकारी देशमूख, पाटील यांनी आठ दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी पाटीलबूवा चिंचवडे, दिलीप गडदे, शिरीष कर्णिक, गोविंद चितोडकर, हनुमंत सकुंडे, अनिकेत क्षीरसागर, विकास नागरगोजे, नंदकूमार गोरे, मारूती पाळेकर, किशोर पाटील, प्रकाश आखाडे आदी उपस्थित होते.

रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. या भागात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. चिंचवड उपकेंद्रात बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणने नागरिकांची समस्या त्वरित दूर करून वीज पुरवठा सुरळीत करावा. येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील बिभीषण चौधरी यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button