- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात साजरा होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सुविधांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आणि शहरातील विविध गणेशोत्सव मंडळे तसेच महानगरपालिका, पोलीस प्रशासन, वीज वितरण अधिकारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आज गुरूवार २९ ऑगस्ट २०२४ रोजी ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी प्राधिकरण येथे दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे. यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपुरक व शांततापूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी शहरातील सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी तसेच शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित रहावे आणि आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. या बैठकीत महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवात विसर्जन…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातील मूर्ती तयार करणारे कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादकांनी केवळ शाडू मातीच्या मुर्तींची निर्मिती किंवा विक्री करावी. नागरिकांनीही केवळ पर्यावरणपूरक शाडू मातीच्या नैसर्गिक रंग वापरून तयार केलेल्या आणि पाण्यात सहज विरघळणाऱ्या मुर्त्या तसेच पर्यावरणपूरक सजावटीचे पूजा साहित्य वापरून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शहरातील नागरिकांनी नेहमीच पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यास प्राध्यान्य दिले आहे. आपले पिंपरी चिंचवड पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित राहील याची दक्षता घेण्याची जबाबदारी ही शहरातील प्रत्येक नागरिकाची आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. तसेच मूर्ती तयार करणारे सर्व कारागीर, मूर्तिकार…
रस्त्यांवरील खड्ड्यांवरून युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांचा आयुक्तांना परखड सवाल पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना महापालिका प्रशासनाकडून शहरभर खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. यामध्ये महापालिका प्रशासनाने रहाटणी, थेरगाव, पिंपरी या तिन्ही प्रभागातील खड्डे बुजविण्याचे काम केले. मात्र या तीनही प्रभागाच्या मधोमध असलेल्या काळेवाडी प्रभागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे व्यक्त केली. काळेवाडी प्रभागातील खड्ड्यांचा प्रश्नासह विविध मुद्द्यांवर शहर काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील कचरावेचक व्यक्तींच्या पाल्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याच्या विषयासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत राहत असलेले व कचरावेचकांचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलांचे जीवनमान उंचविण्याच्या तसेच त्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या वतीने शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याच्या योजनेस प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय सैनिकांसोबत रक्षा बंधन करावे सैनिकांचा सहवास मिळावा,संवाद व्हावा अशी अभिसार फाउंडेशन संचलित वाकड येथील दिव्यांग शाळेतील मुलांची,पालकांची तसेच शिक्षकांची खूप इच्छा होती.त्यांनी हि इच्छा वूई टुगेदर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलून दाखविली. फाउंडेशनच्या माध्यमातून त्वरित आर्मी युनिट लायन्स खडकी येथील मिलेटरी वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून वरील उपक्रम साठी सहकार्य करण्याची विनंती केली त्यांनीही त्वरित पाठपुरावा करून वरील उपक्रम घेण्याची परवानगी दिली. अतिशय आनंदी वातावरणात हा रक्षाबंधन व संवाद उपक्रम पार पडला. या उपक्रमासाठी वूई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष सलीम सय्यद,सल्लागार मधुकर बच्चे आदी पदाधिकार्यानी पुढाकार घेतला.कर्नल साहेब सह सर्व सैनिकांनी दिव्यांग मुले,पालक,शिक्षक, वूई टुगेदर फाउंडेशन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिघीमध्ये अद्यावत अग्निशामक केंद्र होणार आहे. या केंद्राच्या कामाचे भूमीपूजन भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. या केंद्रामुळे दिघी व बोपखेल परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. या केंद्रासाठी भाजपचे माजी नगरसेवक विकास डोळस, माजी उपमहापौर हिराबाई घुले, माजी नगरसेविका निर्मला गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता. उद्घाटनावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रमुख विकास डोळस, दत्तात्रय गायकवाड, माजी उपमहापौर हिराबाई घुले, माजी नगरसेविका निर्मला गायकवाड, भाजपचे माजी चिटणीस कुलदिप परांडे, संजय गायकवाड, माजी सैनिक आमसिध्द भिसे, ज्येष्ठ नागरिक पांडूरंग वाळके,उमेदसिंह पनवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे-आळंदी…
भारताच्या आर्थिक विकासात स्टार्टअप्सचे भरीव योगदान – आनंद गानू पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मागील दहा पंधरा वर्षांत जागतिक आर्थिक आलेखात भारताने आपली ओळख आणि उपयुक्ता सिध्द केली आहे. भारताच्या आर्थिक विकासात स्टार्टअप्सचे योगदान महत्त्वाचे आहे. स्टार्टअप्सच्या वाढीसाठी तसेच प्रभावी संशोधन, विकासासाठी पीसीयु आणि गर्जे मराठी ग्लोबलच्या वतीने सुरू केलेले इनक्युबेशन सेंटर प्रभावी व्यासपीठ मिळवून देईल, असे प्रतिपादन गर्जे मराठी ग्लोबलचे सह-संस्थापक आनंद गानू यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि गर्जे मराठी ग्लोबल इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन गानू यांच्या हस्ते पीसीयु साते मावळ येथे सोमवारी (२६ ऑगस्ट) करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय व्यवसाय वृध्दी तज्ज्ञ…
पीसीसीओईमध्ये अप्रेंटिसशिप भरती मेळाव्यात ९३ कंपन्यांचा सहभाग तर साडेसहा हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
अप्रेंटिसशिपव्दारे कौशल्य विकासाला चालना – पी. एन. जुमले पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – औद्योगिक क्षेत्राची आवश्यकता ओळखून भारत सरकारने अप्रेंटिसशिप योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभव शिवाय विद्यावेतन मिळते तर कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळण्यासाठी मदत होते. येत्या काळात बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंग केंद्र अधिकाधिक लोक केंद्रीत आणि प्रभावशाली करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा असे आवाहन बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंगचे संचालक पी. एन. जुमले यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई), भारत सरकारचे बोर्ड ऑफ अप्रेंटीसशीप ट्रेनिंग व महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स यांच्या संयुक्त…
चिखलीत ‘संवाद सोसायटीधारकांचा’ कार्यक्रमात आ. महेश लांडगे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वाढत्या नागरीकरणात विकास प्रकल्प राबविणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पिंपरी चिंचवड मेट्रो शहराचा विकास झपाट्याने होत आहे. येथे नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या वेगाने पायाभूत सेवा सुविधा सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सक्षम आहे. विकास प्रकल्प राबवत असताना उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्याबाबत आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वास पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला. चिखली, मोशी, चऱ्होली, पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने ‘‘संवाद सोसायटीधारकांचा’’ या कार्यक्रमात शेखर सिंह बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, मुख्य अभियंता मकरंद निकम, पोलीस प्रशासनाकडून डॉ. शशिकांत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) पिंपरी येथील आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्रावणधारा काव्यसंध्या-२०२४, या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना शाल, श्रीफळ, ग्रंथ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील लेखक,कवी, पर्यावरण मित्र आणि वसुंधरा पर्यावरण प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष तानाजी एकोंडे-पाटील यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल “राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक,कवी, डॉ.सुरेश वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात ३१ कवींनी आपल्या वैविध्यपूर्ण कवितेतून श्रावणसरीचे कवित्व गायले.त्यावेळी हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर,हभप अशोकमहाराज गोरे,शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक,जनार्दन गिलबिले,रमेश पाटील,कवी राजेंद्र सगर,शामराव सरकाळे, मनोजकुमार सूर्यवंशी, प्रकाश…
