Author: maharashtrabreakingnews.com

पेनाँग(मलेशिया)/ पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मलेशियातील पेनाँग राज्यात झालेल्या आशियाई इनडोइअर रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या ‘स्कुल ऑफ लाँ’चे प्राध्यापक आदित्य केदारी यांनी मास्टर मेन (वय-३० ते ३९) गटाच्या ५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई करत महाराष्ट्रासह विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. प्रा.केदारींनी अंतिम फेरीत १:२१.२ अशी वेळ नोंदवित दैदिप्यमान कामगिरी केली. तर सौदी अरेबियाच्या अल्हायने १ः२१.९ वेळेसह रौप्य तर पाकिस्तानच्या ईमरान डोगरने १ः२२.३ अशी वेळ नोंदवत या गटात कांस्यपदक पटकाविले. यासह प्रा.केदारी यांनी २०००मीटर प्रकारातही सहभाग नोंदवत ६ः३८.३ वेळेसह चौथा क्रमांक पटकाविला. प्रा.केदारींनी पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय इनडोअर रोइंग स्पर्धेत एकंदर चौथा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  आजच्या या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात मानसिक संतुलन राखणे गरजेचे आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरामय ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते आहे. दररोज योगा केल्याने शारीरिक आरोग्य उत्तम राहते, तर ध्यानधारणा केल्याने मन शांत आणि एकाग्र राहते, इतरांशी चांगला संवाद साधणे शक्य होते. आकलनक्षमता वाढते, आपल्यातील सृजनशीलतेचा विकास होण्यास मदत होते, कामाच्या ठिकाणचा तान कमी होतो, स्वास्थ्य आणि संपन्नतेचा अनुभव येतो, असे प्रतिपादन विंझरे प्रायव्हेट लिमिटेडचे हेल्थ कोच मा. सर्वरीश चंद्रा यांनी व्यक्त केले. महात्मा फुले महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने, पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांची सभा दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी महापालिकेमध्ये आयोजित करण्यात आली होती. संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि इतर संस्थांच्या प्रतिनिधींनी या सभेला उपस्थिती दर्शविली. गणेशोत्सव आणि आगामी नवरात्र उत्सव साजरा करताना पर्यावरण पूरक मूर्ती आणि पूजा साहित्य अवलंबण्याचा आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले. सर्व संस्था प्रतिनिधींनी आपापल्या सूचना या सभेमध्ये मांडल्या . यावेळी संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे तर्फे विविध सूचना आणि अडचणी संदर्भात निवेदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड आणि सचिव आनंद पाथरे यांच्या वतीने प्रशासक महोदय माननीय श्री शेखर सिंह…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल व भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कसरती सादर करीत साजरा करण्यात आला. शैक्षणिक आणि शारीरिक विकासाला चालना देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, क्रीडा शिक्षिका सुषमा पवार, ज्योती मोरे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध कसरती करीत मानवी मनोरे, बॉक्सिंग, कुस्ती, योगासने, फुटबॉल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात क्रीडा दिवस साजरा केला जातो.या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.हेमंत साठे आणि इतर शाळेचे सहकारी शिक्षक वृंद जाधव चारुशीला , पांडुरंग घुगे , सुखदेव वीर , शशी चौधरी , कुणाली मॅडम, भागेश सर , इत्यादी उपस्थित होते. क्रीडा शिक्षकांनी खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. व शाळेमध्ये वेगवेगळ्या खेळाचे आयोजन करण्यात आले. लंगडी,फुटबॉल कबड्डी, लिंबू चमचा, रब्बी, वेगवेगळे खेळ खेळण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हा सर्व कार्यक्रम…

Read More

सलग १५ तास गायन करून आशा भोसलेंना पिंपरी चिंचवडकर देणार वाढदिवसाची सुरेल भेट पिंपरी चिंचवडमध्ये होणार इंडिया बुक रेकॉर्ड भाऊसाहेब भोईर यांच्यावतीनं या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच १३० गाण्यांचे सलग १५ तास गायन करून पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने त्यांना एक खास सुरेल भेट देण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. येत्या ८ सप्टेंबरला प्रख्यात गायिका आशा भोसले ह्या ९१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि वॉल्टझ म्युझिक अकादमी यांच्या वतीनं १ सप्टेंबर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून सोमाटणे व तळेगाव (ता. मावळ) येथील अनधिकृत पब, बार अँड रेस्टॉरंट यासह अनधिकृत होर्डीगवर गुरुवारी सकाळी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. पीएमआरडीएच्या हद्दीतील सर्व पब, बार व रेस्टॉरंट्स यांचा सर्व्हे चालू असून अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई यापुढे पण चालू राहील, असे उपजिल्हाधिकरी डॉ. दीप्ती सूर्यवंशी स्पष्ट यांनी केले. या कारवाईत हॉटेल काव्या बार अँड रेस्टो या हॉटेलचे परवानगी व्यतिरिक्त वाढीव बांधकाम पीएमआरडीएने काढत या पुढे अनधिकृत बांधकाम करणार नसल्याचे जबाबद्वारे नोंदवण्यात आले. हॉटेल आदित्य बार हॉटेलवर कारवाईसाठी गेले असता स्थानिक प्रतिनिधी यांनी पीएमआरडीएने संबंध‍ित व्यावसायिकांना हॉटेल अधिकृत…

Read More

 चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज मध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन व्याख्याते प्रदीप लोखंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते व्याख्याते प्रदीप लोखंडे, वी.आर. रासकर,  वर्ल्ड नेटवर्किंग सर्विसेसच्या प्रतिनिधी शिरीन अली, व्हिएतनामचे टांच यांचा स्मृतिचिन्ह तर; यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरती प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज, उपप्राचार्य डॉ.क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आदी मान्यवर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शाळांमध्ये भविष्यातील सुजाण नागरिक घडत असतात. विद्यार्थ्यांची सुरक्षा हा विषय खूप संवेदनशील असून त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सर्वांनी जबाबदारी घेणे आवश्यक असून याबाबत शहरातील सर्व शाळांमध्ये सर्वांनी अत्यंत सजग राहून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांच्यासह महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय देखील महत्वाचा आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शहरातील महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील तसेच खासगी शाळांतील सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत विद्यार्थी सुरक्षा- संवाद…

Read More

पीसीसीओई मधील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  प्रगतीचा ध्यास घेऊन माणूस नवनवीन प्रयोग, संशोधन करत आहे. त्यामुळे जगभरात विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधक नवे तंत्र विकसित करत आहेत. या संशोधनामुळे सार्वजनिक विकासाला गती मिळते. संशोधनामुळेच अभियांत्रिकी विकासाला गती मिळाली आहे असे मत सीओईपी तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे आठवी ‘आयसीसीयुबीईए – २४’ आणि तिसरी ‘आयमेस – २४’ या अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित दोन आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या त्याच्या समारोप प्रसंगी डॉ. भिरूड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.…

Read More