- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगपालिका ज्युनिअर इंजिनीअर्स असोसीएशनच्या अध्यक्षपदी सुनील बेळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी मनपा भवन येथे पिंपरी चिंचवड ज्युनिअर इंजिनीअर्स असोसीएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या बैठकीत सुनील बेळगावकर यांच्यासह कार्याध्यक्ष – चंद्रकांत कुंभार, सचिव – संतोष कुदळे, सहसचिव विपीन थोरमोठे, खजिनदार – महेंद्र देवरे, सह खजिनदार – सचिन मगर आणि महासंघ प्रतिनिधी – अभिमान भोसले यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्ष बेळगावकर म्हणाले की, येणाऱ्या काळात इंजिनीअर्स व अधिकारी यांच्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान कार्यशाळा, परिषदांचे आयोजन करण्यात येईल. शहरात विकासकामे करताना अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून काम करावे लागते. अशावेळी अनेक समस्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकमेव वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अर्धाकृती महाराणा स्मारक निगडी गावठाण या भागामध्ये आहे, शहरातील समाज बांधवांच्या वतीने दरवर्षी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येते. वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारकाची काल रात्री काही अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली , पुतळ्याला असणारे महाराणा प्रताप यांचे अस्त्र भाला हे काही अज्ञात व्यक्तींनी तोडून चोरून नेले , हा झालेला प्रकार खूप निंदनीय असल्यामुळे झालेल्या घटनेचा शहरातील समाज बांधव व विविध संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आणी लवकरात लवकर ज्याने हा निंदनीय प्रकार केलेला आहे , तो…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह दांडगा असला तरी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती ही स्विकारावीच लागते, असे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त करून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुढील आरोग्यदायी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पिंपरी, येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील मधुकर पवळे सभागृह येथे माहे ऑगस्ट २०२४ अखेर नियमित वयोमानानुसार आणि स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या १४ अधिकारी, कर्मचा-यांचा आज अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी शुभेच्छा देताना ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी…
पर्यावरणाविषयी जनजागृती आणि आकर्षक बक्षिसे पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिक दरवर्षी मोठ्या उत्साहाने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. नागरिकांच्या या सकारात्मक प्रतिसादाला व्यासपीठ मिळावे तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाविषयी व्यापक स्तरावर जनजागृती व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. आणि पीसीएमसी स्मार्ट सारथी यांच्या वतीने ऑनलाईन पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिक…
कृपया प्रसिद् यंदाचा गणेशोत्सव होणार शांततापूर्ण आणि पर्यावरणपूरक पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- गणेशोत्सवाच्या काळात मंडप परवान्यासाठी ऑनलाईन सुविधा महापालिका व पोलीस प्रशासनाकडून संयुक्तरित्या देण्यात येणार असून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. मिरवणूक मार्ग, विसर्जन घाटावरील अतिक्रमणे दूर करण्यात येणार असून रस्त्यांची दुरूस्तीसह आवश्यक सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या नियोजन बैठकीस अतिरिक्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील पीएमआरडीएने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेल्या से.क्र. ५ व ८ मधील जागेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सद्यस्थितीत चबुत-याचे काम चालू आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या १००फूट उंच ब्रॉझ मधील पुतळ्याचे काम जगप्रसिद्ध शिल्पकार श्री.राम सुतार करीत असून दिल्ली येथील फाउंड्री येथे पुतळ्याची निर्मिती करण्यात येत आहे. पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन आयआयटी मुंबई यांचे मंजूर संरचनेनुसार करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सदर पुतळ्याचे काही भाग दिल्ली येथून पिंपरी चिंचवड येथे ट्रकने वाहतूक करून मोशी येथे आणण्यात आले आहेत. प्रत्यक्ष पुतळा उभा करणे पूर्वी, पुतळ्यासाठी ब्रॉझ धातूने सांधे जोडणी व इतर…
‘दगडूशेठ’ च्या जटोली शिवमंदिर सजावटीचे उद्घाटन शनिवारी (दि.७) श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू (हुमनाबाद, कर्नाटक) यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना ; सायंकाळी विद्युतरोषणाईचे उद््घाटन पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३२ व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेश चतुर्थीला शनिवार, दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता केंद्रीय मंत्री…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेला जबाबदार मंत्र्यांच्या प्रतिमांना जोडे मारा आंदोलन करत प्रतिमा फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. नुकत्याच झालेल्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेबाबत राज्यभर हाहाकार व्यक्त होत असून याबाबत संबंधित जबाबदारांना कडक शासन व्हावे आणि सरकारने जबाबदार मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, माफी मागावी अशीच जनसामान्यांची भावना आहे. या पार्श्वभूमीवर आज राहटणी येथील शिवछत्रपती स्मारकाजवळ युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले याप्रसंगी निषेदाच्या घोषणा देत झालेल्या घटने प्रति तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी गावातील लांडगे लिबांची तालीम मित्र मंडळ अध्यक्ष संतोष सोपान लांडगे वराष्ट्रीय खेळाडू योगेश भाऊ सोपान लांडगे यांच्या मातोश्री होत्या व स्वी सदस्य दिनेश यादव यांच्या आजी होत्या. अत्यंत चांगले संस्कार त्यांनी सर्व कुटुंबातील सदस्यांना दिले त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली, सुना,नांतवडे असा मोठा परिवार आहे.
वाहतूक कोंडीपासून दिलासा; पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट अंतर्गत रस्त्याचे काम पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागर मधील रहदारीचा ”हॉटस्पॉट” मानला जाणाऱ्या कुणाल आयकॅान रस्त्याचा शिवार गार्डन ते कुंजीर चौका पर्यतच्या कामाला लवकर सुरुवात होणार आहे .या कामाची शुक्रवारी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी संबधित महापालिकेच्या बीआरटीएस विभागाचे अधिकारी व सल्लागार यांच्या समवेत पाहणी केली. पिंपळे सौदागर भागातील हा रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने वाहतुकीचे योग्य नियोजन करून काम करण्यात यावे. तसेच या रस्त्यामध्ये येणाऱ्या सेवावाहिन्यांचे पुढील 30 ते 40 वर्षांचे योग्य रीतीने नियोजन केले जावे अशा सूचना काटे यांनी अधिकाऱ्यांना…
