ताज्या घडामोडीपिंपरी

निगडी येथील महाराणा प्रताप पुतळ्याची काही अज्ञात व्यक्तीने केली विटंबना महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह , ॲक्शन मोडमध्ये लगेच प्रशासना कामाला लागले

Spread the love

 

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकमेव वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अर्धाकृती महाराणा स्मारक निगडी गावठाण या भागामध्ये आहे, शहरातील समाज बांधवांच्या वतीने दरवर्षी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येते.

वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारकाची काल रात्री काही अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली , पुतळ्याला असणारे महाराणा प्रताप यांचे अस्त्र भाला हे काही अज्ञात व्यक्तींनी तोडून चोरून नेले , हा झालेला प्रकार खूप निंदनीय असल्यामुळे झालेल्या घटनेचा शहरातील समाज बांधव व विविध संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आणी लवकरात लवकर ज्याने हा निंदनीय प्रकार केलेला आहे , तो व्यक्ती समाजाच्या समोर यावा त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या स्वरूपाची पोलीस प्रशासनाकडे विविध संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली.

वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर सर्व समाज बांधवांच्या वतीने महाराणा स्मारक येथे संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनाच्या बाहेर विविध संघटनेच्या व समाजाच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले , कारण मागील दोन ते तीन वर्षापासून शहरातील राजपूत समाज संघटनेच्या वतीने अशी मागणी केली की त्यांनी या ठिकाणी चोवीस तास सुरक्षा रक्षक नेमावा कारण निगडी या भागातून साधारण रोज साडेचार ते पाच हजार नागरिक निगडी ते पुणे प्रवास करतात काही अनोळखी लोक विसावा घेण्यासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप उद्यानामध्ये येत असतात त्यामुळे या भागामध्ये कोणताही अनुचित प्रकार कधीही घडू शकतो याची आयुक्तांना संघटनेनी पूर्ण कल्पना दिली होती परंतु या मागणीकडे आयुक्तांनी कानडोळा केल्याने हा निंदनीय प्रकार घडला.
झालेला सर्व प्रकार आयुक्त यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लगेच सुरक्षा रक्षक नेमला जाईल असे संघटनेच्या प्रतिनिधींना आश्वासन देवून स्मारकाचे झालेली जी तूट फूट आहे , ती लगेच दुरुस्ती केली जाईल असे सकाळी आश्वासन देवून तशी कार्यतत्परता दाखवत वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा भाला जो चोरीस गेला होता , तो लगेच नव्याने महापालिकेच्या वतीने बसवण्यात आला व त्याचप्रमाणे उद्यानातील किरकोळ दुरुस्तीचे काम सुद्धा केले जाईल असे आयुक्तांनी यावेळी आश्वासन दिले आहे.

पोलीस आयुक्त यांनी लवकरात लवकर पुतळ्याची विटंबना करणारा व्यक्ती लवकरात लवकर समाजासमोर आणावा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे संघटनेच्या वतीने केलेली आहे.
महाराणा प्रतांपांनी समाजाला दिलेल्या चांगल्या विचारांना मुळे शहरात शांतता मार्गाने निषेध आंदोलन करत महाराणा प्रताप यांचा भाला पुर्ववत करून घेण्यात आले.

आंदोलन करण्यासाठी राजपूत संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार बायस,सचिन चिखले, सचिन काळभोर, श्रीराम परदेशी, नेताजी सिंह राजपूत , सचिव राणा अशोक इंगळे , गणेश राजपूत, राजेंद्र सिंह राठौड, प्रविण राजपूत,चतुर्भुज चव्हाण, माऊली जगताप,दिनेश पाटील, सोपान पाटील, नितीन पाटील,विशाल सुरवसे, ऋषिकेश पवार, गणेश उरडकर, रवींद्र कच्छवे, रोहन सर्वोदय, मयूर मगर, विकी कुराडे, जावेद शेख, सुरज हातागळे, गजानन जाधव,गणेश वाघमारे, अमोल पवार, राजपूत, ललित पवार, गणेश राजपूत, रुपेश राजपूत सह समाज बांधव मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button