- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट द्वारे संचालित पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे सौर उर्जेवर चालणाऱ्या हवामान, वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राला मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासातील अधिकारी ब्रेंडा सोया यांनी भेट दिली. यावेळी समन्वयक अनन्या घोष तसेच पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. ब्रेंडा सोया यांनी हवामान निरीक्षण केंद्राचे कार्य, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदी, हवामान बदल याविषयी माहिती जाणून घेतली. नोव्हेंबर २०२३ मध्ये सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (सीयुएनवाय) आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या द्वारे या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यूएस कॉन्सुलेट जनरल- मुंबई द्वारे ब्रॉन्क्स समुदायाला प्रदान केलेल्या अनुदानाद्वारे हवामान…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कशिश प्रस्तुत रू – ब – रू या हिंदी – मराठी गझलांच्या सुरेल मैफलीने रविवार, दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २७अ, संत तुकाराम उद्यानाच्या मागे असलेल्या आय. आय. सी. एम. आर. ऑडिटोरियममधील गझलप्रेमी रसिकांना मंत्रमुग्ध केले. संपदा रानडे आणि कुमार करंदीकर यांच्या एकल आणि युगुलस्वरातील गझलांचा संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर रसिकांनी आस्वाद घेतला. गझल ही लिखित विधा गायनाच्या माध्यमातून जेव्हा रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचून उत्स्फूर्त दाद मिळवते तेव्हाच ती पूर्णत्वाला जाते, असे म्हटले जाते. याचा पुरेपूर प्रत्यय रू – ब – रू मैफलीत आला. गालिब, नासीर काझमी,…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – संस्कार प्रतिष्ठान आणि जयवंत प्राथमिक शाळा भोईर नगर चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आज भोईर नगर दळवी नगर परिसरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव जनजागृती फेरीचे आयोजन केले होते याचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड आणि जयवंत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सावंत यांनी केले होते. संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले. यामध्ये गणेशोत्सव काळात शाडू माती किंवा इको फ्रेंडली मूर्तीची स्थापना करून पर्यावरण पूरक सजावट करा विसर्जनाच्या वेळी मूर्ती घरीच विसर्जन करा किंवा मूर्ती दान करा निर्माल्य दान करा मातीचा पुनर्वापर…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – तब्बल ५२५ वर्षांची परंपरा लाभलेली, चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तींची भाद्रपद पालखी यात्रा येत्या बुधवारपासून ( ता. ४) सुरू होत आहे. यात्रेचा समारोप शुक्रवार (ता. १३) सप्टेंबरला होईल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी सोमवारी (ता. २) दिली. चिंचवड येथील महान गाणपत्य श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज दरमहा श्री मयूरेश्वराच्या दर्शनास मोरगाव येथे जात असत. त्यांनी सन १५६१ साली चिंचवड येथे पवना नदीच्या काठावर संजीवन समाधी घेतली. श्री मोरया गोसावी महाराजांना वयाच्या ११७ व्या वर्षी सन १४८९ मध्ये श्री मयुरेश्वराची तांदळामूर्ती श्री क्षेत्र मोरगाव येथील कऱ्हा…
जुनी सांगवी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “जेष्ठ नागरिक ही राष्ट्राची संपत्ती आहे. वयाबरोबरच अनेक बऱ्यावाईट अनुभवांची शिदोरी त्यांच्या सोबत असते. सुख आणि दुःखाच्या अनुभवातून मिळालेल्या अनुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन पुढच्या पिढ्यांना दिशा देण्याचे काम जेष्ठांनी करावे. कुटुंब आणि समाजासाठी त्यांनी दीपस्तंभ बनावे. आनंदाच्या नवनवीन वाटा शोधून आपाल्या सभोवती चैतन्य निर्माण करत निरामय आयुष्य जगावे. ” असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते आणि लेखक राजेंद्र घावटे यांनी केले. सांगवी येथील अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात “जगणे सुंदर आहे” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे हे होते. संघाचे अध्यक्ष रवींद्र निंबाळकर, बबनराव शितोळे, विलास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहर फक्त उद्योगनगरी न राहता आता आयटीनगरी झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस हरित क्षेत्र कमी होत चालले आहे. रावेत, मोशी, चिखली, ताथवडे या भागात अनेक नवीन बिल्डींग्स उभ्या राहत आहेत. त्यात हवामान बदलाचा फटका सर्वांना बसत आहे. कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळाचे चित्र पाहायला मिळते. या सर्वांवर उपाय म्हणजे झाडे लावणे. आणि म्हणूनच अंघोळीची गोळी संस्थेकडून “एक झाड,एक सोसायटी ” हा उपक्रम सुरु करण्यात आला. रावेत या भागातून या उपक्रमाची सुरवात झाली.अंघोळीची गोळी संस्था प्रत्येक सोसायटीला एक झाड लावून देणार आहे. तसेच ते झाड सोसायटीच्या मदतीने जोपसणार सुद्धा आहे. “एक झाड,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील एक नामवंत कराटे प्रशिक्षण केंद्र विश्वा स्पोर्ट्स अकादमी या संस्थेच्या वतीने स्व संरक्षण काळाची गरज या विषयावर कराटे प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालक यांचा पोलिस अधिकारी आणि पत्रकार यांच्याशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक १ सप्टेंबर रविवारी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराच्या शेजारील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी पालकांशी संवाद साधताना विधानसभा परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले, त्या म्हणाल्या,आज समाजात विकृती चे प्रमाण वाढले असून कोणतेही सरकार प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक संरक्षण पुरुवू शकत नाही. त्यामुळे आज स्व संरक्षण हे काळाची…
पुणे (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – *हिंदू तत्त्वज्ञान श्रेष्ठ परंतु त्यांचे पालन न करण्यामुळे व जाती भेदभाव आचरणामुळे हिंदू धर्र्म कमजोर होत चालला आहे असे उद्गार विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी काढले. विश्व हिंदू परिषदेच्या षष्ठाव्दी पूर्ती कार्यक्रमा निमित्त सिंहगड, विठ्ठलवाडी पुणे येथील कार्यकमात आशिर्वचन भागवताचार्य किर्तन केसरी राजेंद्र महाराज यप्रे यांनी केले, राष्टीय स्वयंसेवक संघ नगर संघचालक संजय बापट, विहिप जिल्हा अध्यक्ष शरद जगताप, जिल्हा उपाध्यक्षा शुभदा गोडबोले, जिल्हा मंत्री साईनाथ कदम, प्रांत मंदिर अर्चक संम्पर्क सह सूर्यकांत थोरात, प्रखंड मंत्री सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला…
*पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित* 🕉️ *शिवदर्शन*🕉️ *श्री क्षेत्र चांगावटेश्वर, सासवड, ता.पुरंदर जि. पुणे* *पंचम श्रावणी सोमवार* *२ सप्टेंबर २०२४* ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून निर्माण झालेल्या कऱ्हा नदीच्या तीरावरील सासवड नगरीत श्री क्षेत्र चांगावटेश्वर वसले आहे. नारायणपूर मार्गावरील या मंदिराचा कळस हिरव्यागर्द सृष्टीराणीच्या मुकुटातील हिरा शोभत आहे. तेराव्या शतकातील हे प्राचीन मंदिर आहे. चौदाशे वर्षे वयोमान असलेल्या श्री चांगदेवांनी या मंदिराची प्रतिष्ठापना केल्यामुळे चांगावटेश्वर म्हणतात. हिरव्याजर्द वनराजी मध्ये समोर भटार नावाचा ओढा आणि पाठीमागे खळखळून वाहणारी कऱ्हा नदी यांच्या जललहरींच्या संगीतात रंगलेले हे श्री क्षेत्र चांगावटेश्वर मंदिर बघताच मनात प्रसन्नतेच्या आनंद लहरी उचंबळू लागतात. सभोवताली भरभक्कम दगडी तटबंदी असलेल्या या पूर्वाभिमुख मंदिराच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – काळेवाडीत गटार साफसफाई करताना मॅनहोलमध्ये उतरलेल्या ठेकेदाराकडील सफाई कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना दहा लाखाचा विमा निधी अर्थसाह्य मिळून देण्यात आले. महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे माजी उपाध्यक्ष अॅड. सागर चरण यांनी याबाबतची माहिती दिली. चरण म्हणाले, भरत डावकर हे महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराकडे सफाई कामगार म्हणून काम करत होते. १३ सप्टेंबर २०१७ रोजी मॅनहोलमध्ये काम करत असताना त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनंतर डावकर कुटुंबीयांनी संपर्क साधला. हाताने मैला साफ करण्यास प्रतिबंध व सफाई कामगारांचे पुनर्वसन कायदा-२०१३ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या २०१४ व २०२३ च्या निर्देशानुसार कार्यरत कामगार कामाच्या ठिकाणी मृत्युमुखी पडल्यास त्याच्या…
