- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगरपालिका अंतर्गत आनंद ऋषी विद्यालय मुख्याध्यापक सुरज कुलकर्णी सर यांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. शिक्षक हा आपल्या तीस वर्षाच्या नोकरीमध्ये जवळपास चार हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घडवत असतो समाजात शिक्षकांच्या नावे साजरा होणारा दिवस म्हणजे शिक्षक दिन हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं आणि अशा भाग्यवंतांपैकी एक म्हणून सुरज कुलकर्णी यांचा विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आज श्री चौगुले, प्रशांत पवार, महाले सर व महेश लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आनंद ऋषी विद्यालयाच्या इबुसे सर, सुप्रिया मॅडम, भारती मॅडम व जयश्री मॅडम यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी मुलांनी आज शिक्षक…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विकास शिक्षण मंडळ चिंचवड संचलित शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीना सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.2 सप्टेंबर 2024 रोजी विद्यालयात माध्यमिक विभागातील मुलींना सुरक्षेबाबत मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते इ 9 वी ते 12 वी च्या विदयार्थ्यांनी यात उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. प्रमुख मार्गदर्शक डॉ भाग्यश्री लहाने( मुंडे ),डॉ सीमा तळेले (भापकर) महानंदा मुंडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर मुंडे यांनी विद्यार्थिनींना विद्यार्थी सुरक्षा समिती अंतर्गत शासनाने सुचविलेल्या गुड टच बॅड टच म्हणजे काय? चांगल्या सवयी आत्मसात करणे किती गरजेचे आहे.उत्तम आरोग्य कसे ठेवावेत , सकस आहार कसा घ्यावा याबद्दल विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन केले.या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लहान गणेश मुर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन हौदांमध्येच करावे तसेच शाडू मातीच्या बाप्पाचे विसर्जन घरीच स्वच्छ पाण्यात करावे जेणेकरून शहरातील वातावरण पर्यावरणपूरक राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, गणेश विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विसर्जन घाटांवर पुरेसे कर्मचारी आणि यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, निर्माल्य कुंडाची व्यवस्था करणे, कृत्रिम विसर्जन हौदांची स्वच्छता आणि डागडुजी करणे अशा विविध सुचनाही आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज शहरातील सर्व प्रमुख गणेश विसर्जन घाटांची तसेच…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रिडा विभागाकडील सर्व व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी तसेच जीवरक्षक व इतर सुरक्षा कर्मचारी यांची सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कामकाजासाठी ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गणेश विसर्जन घाटांवर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आलेली असल्याने शहरातील सर्व जलतरण तलाव या कालावधीत बंद राहणार असल्याची माहिती क्रिडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी दिली आहे. महापालिकेच्या वतीने येत्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय असणाऱ्या विघटन केंद्र, विसर्जन घाटांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मुर्ती संकलनासाठी तसेच इतर कामकाजासाठी सुमारे ६४० वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिका हद्दीत सुमारे ८५ विसर्जन घाट…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “मातृत्वाच्या भूमिकेतून शिक्षण देणारे आचार्य म्हणजे शिक्षणाचा आत्मा आहेत!” असे विचार आळंदी येथील ह. भ. प. डॉ. सुभाषमहाराज गेठे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित शिक्षकदिन कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून प्रमुख वक्ते म्हणून संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, तत्त्वज्ञ ह. भ. प. डॉ. सुभाषमहाराज गेठे बोलत होते. पद्मश्री गिरीश प्रभुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, माजी उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, शाला समिती अध्यक्ष नितीन बारणे, सदस्य आसराम कसबे, राहुल बनगोंडे, ह. भ. प. रामकृष्ण गेठे, प्रा.डॉ. धनंजय भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुभाषमहाराज गेठे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुजरातचे माजी गृहमंत्री तथा प्रवासी प्रभारी नेता प्रदीपसिंह जडेजा यांनी आज पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभांचा आढावा घेतला. तसेच, पक्षाने केलेली विकासकामे, पक्षाची बूथ रचना, मतदार नोंदणी याबाबत माहिती घेवून तिनही विधानसभा निहाय पदाधिका-यांसोबत चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी, शहराच्यावतीने शंकर जगताप यांनी श्री. जडेजा यांचे स्वागत केले. यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेशदादा लांडगे, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार उमाताई खापरे, समन्वयक राम गावडे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, संतोष कलाटे, महेश कुलकर्णी, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास…
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – हयात भर आपल्या कर्तुत्वाने विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करत चमचमणारे तारे वयाच्या साठी नंतर मंद होऊ लागतात. मात्र वृद्धापकाळातही त्याच उमेदीने त्याच मनोबलाने हे मंद तारे सुद्धा आजही तारांगण फुलवू शकतात हे आज दिसून आले निमित्त होते सँडविच कंपनीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या मैत्री कट्ट्याच्या सहाव्या वर्धापन दिनाचे. सँडविक मैत्री कट्ट्याचा सहावा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवडच्या सहकार क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणारे पिंपरी चिंचवड सहकारी बँकेच्या स्थापनेतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व व शहरात अनेक पतसंस्थांचे स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे नाना भुजबळ, पिंपरी चिंचवड सहकारी बँकेच्या स्थापनेतील आणखी एक महत्त्वाचे व्यक्तित्व…
कासारवाडी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्रीवर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ कासारवाडी यांच्या वतीने तपस्वींचा यथोचित सन्मान समारोह संपन्न झाला. चंद्रकला तप करणारे 40 बालक तपस्वी आणि 48उपवास आज ज्यांना आहे त्या गीता जैन तसेच आयंबिल चे मासखमान तपस्वी मंगला पगारिया, एकासण्याची दीर्घ तपस्या करणाऱ्या सुशीला भंडारी, छाया भंडारी आणि शारदा भंडारी यांचा कासारवाडी मधील नमिनाथ जैन मंदिरापासून जैन स्थानकापर्यंत शोभायात्रा मिरवणुकीच्या माध्यमातून ” पगारिया सभागृहा”मध्ये पर्यंत जय जयकाराच्या घोषात मिरवणूक काढण्यात आली. उपप्रवर्तिनी परमपूज्य मंगल प्रभाजी डॉ मधुस्मिताजी प पू हर्षिताजी आणि प पू दिव्यांशीश्रीजी यांच्या मंगलमय सानिध्यात तपस्वींचा यथोचित सन्मान भेटवस्तू देऊन करण्यात आला यावेळी…
महिलांच्या कल्पकतेला व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील – सचिव चंद्रशेखर जाधव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- महिलांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त कला गुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती आयोजक युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांनी दिली आहे. या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील महिला सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेअंती प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते काढले जाणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ३,०००/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला २,०००/- रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्यातील महायुती खोके सरकारचा महत्त्वाचा प्रोजेक्ट असलेला “शक्तिपीठ” महामार्ग रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे या प्रकल्पामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या २७ हजार हेक्टर जमिनी बाळकावल्या गेल्या असत्या म्हणून शेतकऱ्यांनी विरोध केला आणि आंदोलने केली त्याला यश मिळाले असून शक्तीपीठ बाबत सरकार झुकले हे शेतकरी आंदोलनाचे यश असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले. महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांच्या विरोध वाढतच गेला त्यातच लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये हे महायुती आणि खोके सरकारला त्याचा फटका बसला, अनेक अनावश्यक प्रकल्प केले जात आहेत त्यांना आता जाग आलेली आहे. शक्तीपीठ हा महायुती…
