सुरज कुलकर्णी यांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगरपालिका अंतर्गत आनंद ऋषी विद्यालय मुख्याध्यापक सुरज कुलकर्णी सर यांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. शिक्षक हा आपल्या तीस वर्षाच्या नोकरीमध्ये जवळपास चार हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घडवत असतो समाजात शिक्षकांच्या नावे साजरा होणारा दिवस म्हणजे शिक्षक दिन हे भाग्य खूप कमी लोकांना मिळतं आणि अशा भाग्यवंतांपैकी एक म्हणून सुरज कुलकर्णी यांचा विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आज श्री चौगुले, प्रशांत पवार, महाले सर व महेश लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आनंद ऋषी विद्यालयाच्या इबुसे सर, सुप्रिया मॅडम, भारती मॅडम व जयश्री मॅडम यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. यावेळी मुलांनी आज शिक्षक म्हणून घेतलेला अनुभव तसेच शिक्षकांप्रती असलेल्या प्रेम आणि भावना अतिशय व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाले सर म्हणाले की, “आमचं आयुष्य शिक्षक म्हणून गेलं असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बद्दल विशेष प्रेम आहे आणि त्यात समाजात नवीन आणि चांगले काहीतरी करून दाखवणारे विद्यार्थी आमच्याकडून घडले की आम्हाला नव्याने ताकद मिळते.”
यावेळी बोलत असताना स्वराज्य संग्रामचे अध्यक्ष महेश लाड म्हणाले की, ” आयुष्यात कसल्याही समस्या असल्या तरी त्या सोडवण्यासाठी शिक्षण ही एक चावी आहे, ही एक संधी आहे आणि ती चावी तुमच्याकडे असल्यावर तुम्ही कोणत्याही संकटावर मात करून पुढे जाऊ शकता”
सत्कार ला उत्तर देताना कुलकर्णी सर म्हणाले की, “शिक्षक दिन हा तसा भाऊक करणारा दिवस आहे पण आज विद्यार्थ्यांचे हे प्रेम आणि कृष्णाकाठच्या लोकांकडून होत असलेल्या सत्कार म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. ”
कार्यक्रमाचे संयोजन, सूत्रसंचालन व आभार याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेतली होती आणि आपल्या शिक्षकांना टाळ्यांचा प्रचंड गजरात मानवंदना देत कार्यक्रमाची सांगता झाली.