Author: maharashtrabreakingnews.com

कुरेकर महाराज यांना “शांतीब्रह्म” पुरस्कार आणि ढोक महाराज यांना “तुलसीदास” पुरस्कार प्रदान  पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन अर्पण करून राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा दाखविण्याचे काम करीत आहे. त्यातूनच समाज घडत आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.    आळंदी येथे फ्रुट वाले धर्मशाळा येथे झालेल्या ह.भ.प मारोती महाराज कुरेकर यांच्या ९३ व्या व ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या ७० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ह.भ.प. कुरेकर महाराज यांना “शांतीब्रह्म” पुरस्कार आणि ह.भ.प. ढोक महाराज यांना “तुलसीदास” पुरस्कार प्रदान करण्यात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत. हे अर्ज पिंपरी मध्यवर्ती कार्यालय येथे उपलब्ध होते. पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक असलेले पक्षाचे सरचिटणीस सचिन गायकवाड यांनी पक्ष उमेदवारी अर्ज पक्षाच्या पिंपरी मध्यवर्ती कार्यालय येथे जमा केला आहे. सचिन गायकवाड यांचा पिंपरी विधानसभेतील सामाजिक कार्यात हिरारीने पुढाकार असतो. त्यांचा मोठा जनसंपर्क तसेच मित्रपरिवार या मतदारसंघात आहे. सर्वसामान्य कुटुंबातून असल्यामुळे जनतेच्या प्रश्नांची जाण त्यांना चांगल्या प्रकारे आहे. म्हणूनच पिंपरी विधानसभेतून उमेदवारी मिळाल्यास नक्कीच विजय होईल असा विश्वास सचिन गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. पिंपरी विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

Read More

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार उमा खापरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार माजी सरपंच स्व. गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक देविदास तांबे यांच्यावतीने आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- माजी सरपंच स्व. गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारतीय जनता पक्ष काळेवाडी मंडल यांच्या वतीने रहाटणी-तापकीर नगर प्रभागातील १०वी-१२वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रहाटणी येथील विमल बँकवेट हॉल येथे रविवारी (दि. ८ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात आणि रहाटणीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. भाजपचे काळेवाडी मंडल अध्यक्ष तथा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष देविदास आप्पा तांबे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ओरिएंटल मार्व्हल सोसायटी तर्फे गणेशोत्सव निमित्त रविवार दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमास महिला व पुरुषांनी भरगोस प्रतिसाद देऊन १०८ बॅगचे रक्त संकलन झाले. गणेशोत्सवा निमित्त आज पर्यंत च्या झालेल्या रक्तदानाच्या जास्तीच्या बाटल्यांचे रक्तदानाचे उद्दिष्ट साध्य झाले. YCM रक्तपेढी डॉ. मुसर्गी यांच्या साहाय्याने हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. यंदाचे रक्तदान शिबिराचे हे सलग ९ वे वर्षे आहे, या शिबिरात अठरा वर्ष पूर्ण झालेले युवक व युवतींनी देखील विशेषता रक्तदान केले यामध्ये सोसायटी चे अध्यक्ष- विशाल कुलकर्णी, सचिव – साकेत भलगट, खजिनदार- चंद्रशेखर शिरसागर , संतोष…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गणेशोत्सव व पुढील सणासुदीच्या काळात शहरात अखंड वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) केली. पिंपरी-चिंचवड शहरातील वीज पुरवठा सुरळीत होण्याकरिता पिंपरी येथील महावितरण विभागीय कार्यालय येथे खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता शहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वासराव भोसले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सांगवी विभाग कल्याण गिरी, अतिरिक्त अभियंता खराडी विभाग भुजंग पवार, कार्यकारी  अभियंता भोसरी विभाग अतुल देवकर, सहाय्यक कार्यकारी अभियंता किरण सरोदे, सहाय्यक कार्यकारी अभियंता रत्नदीप काळे, सहाय्यक  कार्यकारी अभियंता…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘जब छाये मेरा जादू…’ या लोकप्रिय हिंदी – मराठी चित्रपटगीतांच्या नि:शुल्क दृकश्राव्य मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड  येथे गुरुवार, दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर, उपाध्यक्ष संतोष बाबर, माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, किरण साळी, अनिल दळवी, अभिमान विटकर, सुभाष चव्हाण, राजेंद्र देसाई, नरेंद्र मोहिते, शरद शेजवळ, वि. ल. पवार, विनायक बहिरट, जीवन गायकवाड, सतीश रानवडे, विठ्ठल गरुड यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. विनायक कदम, सुजाता माळवे, नंदकुमार कांबळे, उज्ज्वला वानखेडे,…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “कुटुंबसंस्था हा हिंदू संस्कृतीचा पाया आहे!” असे विचार ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सदानंद तथा नंदू फडके यांनी पुणे येथे व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद स्थापनेच्या षष्ट्यब्दीपूर्ती वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, विधी प्रकोष्ट संचलित श्रीराम जानकी मोफत  कौटुंबिक समुपदेशन सेवा केंद्राचे उद्घाटन करताना ॲड. फडके बोलत होते. धर्माचार्य डॉ. सुभाषमहाराज गेठे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड. सतिश गोरडे, उपाध्यक्ष माधवी संशी, सी ए अभय माटे, ॲड. प्रशांत यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. सदानंद फडके पुढे म्हणाले की, “विश्व हिंदू परिषदेने आज खर्‍या अर्थाने कुटुंबसंस्थेसाठी मोठे विधायक कार्य केले आहे.…

Read More

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये नियोजनबद्ध प्रशस्तरस्ते  आहेत.  मात्र वाहतूक पोलिसांचे झालेले दुर्लक्ष यामुळे विविध चौकामध्ये, विविध ठिकाणी वाहतूक कोंडी (ट्राफिक जाम)  होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना, वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. तो दूर करण्यात यावा अन्यथा लवकरच आंदोलनाची भूमिका बाबत पत्र देण्यात आले यावर सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग सतीश कसबे यांनी  कामगार नेते काशिनाथ नखाते व शिष्ठमंडळांशी चर्चा  केली यावर त्यांनी आपल्या मागण्यावर सकारात्मक विचार करून लवकरच त्या सोडवण्यात येतील असे आश्वासन आज दिले. यावेळी  प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने ,कार्याध्यक्ष इरफान चौधरी ,सहदेव होनमने, संभाजी वाघमारे,रवींद्र गायकवाड, संजय कांबळे उपस्थित होते. रस्त्यावर असलेले खड्डे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लाडके बाप्पा आज, शनिवारी गणेश चतुर्थीला विराजमान होणार आहेत. असे असले तरी शहरातील सार्वजनिक मंडळांच्या बहुतांश गणेशमूर्ती गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच ढोल-ताशांच्या निनादात प्रतिष्ठापनेसाठी मंडपात दाखल झाल्या. आज विधिवत गणपती बाप्पा आसनस्थ होत असून घरोघरीही गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळली होती. विघ्नहर्त्या बाप्पांचा गणेशोत्सव शनिवार दि. 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गणेश चतुर्थीला सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती बाप्पांची प्रतिष्ठापना होत आहे. लाडक्या बाप्पांच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती नेल्या जात आहेत. शुक्रवारीही सकाळपासूनच सातारा शहरात…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – गणपती बाप्पा मोरया…, मंगलमूर्ती मोरया… असा जयघोष करीत, ढोल ताशांच्या निनादात, विघ्नहर्त्या गजाननाचे अर्थात लाडक्या गणपती बाप्पांचे उद्योगनगरीत शनिवारी आगमन झाले. पारंपरिक वाद्यांचा वापर, गुलाल विरहित आणि पर्यावरण पूरक गणशोत्सवावर भाविकांनी भर दिला आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव. कामगार कष्टकऱ्यांची नगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड नगरीचा नूर काही औरच होता. गेल्या महिनाभरापासून सुरू असणारी उत्कंठा संपली. आज सकाळपासूनच उद्योगनगरी गणेशमय झाली होती. गणरायाची महती सांगणारी गीते कानावर पडत होती. त्यामुळे शहरातील वातावरण दिवसभर मंगलमय असेच होते. प्राणप्रतिष्ठापनेसाठी आज पहाटे ब्राम्ह मुहूर्तापासून तर दुपारी दीड वाजेपर्यंत उत्तम मुहूर्त होता. त्यामुळे घरगुती उत्सवाची लगबग अगदी…

Read More