रहाटणीत १०वी-१२वीतील २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार उमा खापरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार
माजी सरपंच स्व. गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक देविदास तांबे यांच्यावतीने आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- माजी सरपंच स्व. गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारतीय जनता पक्ष काळेवाडी मंडल यांच्या वतीने रहाटणी-तापकीर नगर प्रभागातील १०वी-१२वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रहाटणी येथील विमल बँकवेट हॉल येथे रविवारी (दि. ८ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात आणि रहाटणीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. भाजपचे काळेवाडी मंडल अध्यक्ष तथा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष देविदास आप्पा तांबे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषद आमदार उमा खापरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण बिगबॉस फेम इरिना रुडाकोवा या होत्या.
या सोहळ्यात सीईटी परीक्षेत ९९.७ टक्के गुण मिळविणारे राहुल दांडगे यांच्यासह यशवर्धन अग्रवाल, समीक्षा तांबे, शिवम सहानी, हर्षवर्धन गवळी, वैभवी भानुसे, विशाखा मोरे, तन्मया केंद्रे, हर्ष मवाळ, मिताली शिंदे, अस्मिता लगड यांना पांडुरंगाची मूर्ती आणि २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार उमा खापरे यांच्या हस्ते करण्यात आला.
त्याचबरोबर काव्य मित्र संस्था, पुणे यांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल एम.एम. विद्यामंदिरचे शिक्षक विजयकुमार सोळुंके आणि पहिल्याच प्रयत्नात सी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या हर्षदा जाधव यांचा आयोजक देविदास तांबे यांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी कौतुक करताना शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, गुणगौरव सोहळा हा विद्यार्थ्यांचे मनोबल उंचविण्यासाठी गरजेचा असतो. मिळणाऱ्या पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त यश मिळविण्याचा ध्यास लागतो. अशाप्रकारचा सुंदर सोहळा आयोजित केल्याबद्दल आयोजक देविदास तांबे यांचे विशेष आभार मानतो. आणि दरवर्षी अशाप्रकारचे कार्यक्रम त्यांनी राबवावेत अशी अपेक्षा, शहराध्यक्ष जगताप यांनी व्यक्त केली.
यावेळी अनिता तांबे, कल्पना पठारे, सुनील कोरडे, बाबासाहेब तांबे, दीपक नागरगोजे, स्वप्नील अभाले, दीपक जाधव, सुनील कुंजीर, संजय आरगडे, मयूर शिनगारे, सोमनाथ तापकीर, नीरज भोसले, अंकुश कोळेकर, यशवर्धन तांबे, नारायण काटे, संदीप नखाते, राजू कापसे, मयूर गवळी, सागर नखाते यांच्यासह रहाटणी परिसरातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने २००० उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.