Author: maharashtrabreakingnews.com

आयआयएमएस तर्फे एमबीए व एमसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विद्यार्थ्यांनी सतत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रॅक्टिकल ज्ञान घेण्याला प्राधान्य दिले तरच स्पर्धेच्या युगात टिकणार आहात. संधी, आव्हाने आणि प्रगती या तिन्ही गोष्टीचा मेळ घालता आला पाहिजे, असे आवाहन सॅन्डविक कोरेमंट इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापक हेमंत नाडगौडा यांनी केले.              यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स (आयआयएमएस) तर्फे एमबीए (MBA) व एमसीए (MCA) विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाडगौडा बोलत होते. यावेळी आयआयएमएस (IIMS)…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहर स्वच्छ व सुंदर करण्याबरोबरच शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे  शहराला भारतातील सर्वात सुंदर व स्वच्छ शहर बनविण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना शहरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असतो. शहरातील नागरिक ओला आणि सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून स्वच्छतेच्या उपक्रमात सहभाग घेत असतात, अशा शब्दांत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांचेप्रतीही कृतज्ञता व आभार व्यक्त केले आणि महापालिकेच्या ‘ स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात देखील शहरातील नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे, असे आवाहन केले. महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जिल्हाधिकारी यांचेकडील सर्वसाधारण शाखेच्या आदेशानुसार  आमदार महेश लांडगे यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली इ प्रभाग कार्यालयात  भोसरी विधानसभाअंतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक संपन्न झाली, सर्वप्रथम सदस्य सचिव निलेश भदाणे तथा उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी अध्यक्षांचे स्वागत करून बैठकीची रूपरेषा सांगितली. सदर बैठकीत भोसरी विधानसभाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. क, इ व फ या प्रभागांतर्गत प्रभाग स्तरावरून पडताळणी केलेले अर्ज व त्यांवर केलेली कार्यवाही याबाबत चर्चा झाली बैठकीदरम्यान अध्यक्ष यांनी अर्ज पडताळणी दरम्यान येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या व संबंधित अडचणी महिला व बालकल्याण विभागामार्फत सोडविण्याबाबत पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.…

Read More

– लोणावळा शहरात हॉकर झोन व आधुनिक भाजी मंडई निर्माण करण्याची मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असून या ठिकाणी आधुनिक पद्धतीने हॉकर झोन निर्माण व्हावे, सर्व सोयी सुविधांनी युक्त भाजी मंडई निर्माण व्हावी, यासह विविध मागण्या घेऊन लोणावळा नगर विक्रेता समितीच्या नवनियुक्त निवडून आलेल्या सदस्यांनी मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांची भेट घेतली. व लोणावळा येथे भेटून ही मागणी करण्यात आली. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात हे सदस्य आमदार शेळके यांना भेटले. त्यामध्ये सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून निवडून आलेल्या निर्मला वसंत पांगारे.अनुसूचित जाती मधून अशोक राम कदम, सर्वसाधारण पुरुष मधून गणेश चव्हाण, संदीप…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मी पक्ष सोडलेला नाही, फक्त पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तो मंजूर करायचा की नाही, हे पक्ष श्रेष्ठींच्या हातात आहे. त्यामुळे राजू दुर्गे यांच्या सारख्या बदनाम व्यक्तींनी हुजरेगिरी करून बक्षीसी मिळविण्याच्या नादात आमच्या चिंचवडच्या राजकारणात स्वःताची पोळी भाजून घेऊ नये. मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा राम वाकडकर यांनी दिला आहे. राम वाकडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे प्रवक्ते राजू दुर्गे यांच्यावर सडकून टीका करत गंभीर आरोप देखील केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ओंकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून राजू दुर्गे यांनी पिंपरी चिंचवड परीसरातील शेकडो गोर-गरीब नागरिकांना ज्यादा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप आणि चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांच्यासंदर्भात जाणीवपूर्वक अफवा आणि खोटे वृत्त पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामाध्यमातून भारतीय जनता पक्षालाही नाहक बदनाम करण्याचे षडयंत्र दिसून येत आहे. त्यामुळे अशाप्रकारे खोटे वृत्त पसरविणाऱ्यांची  सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, भारतीय जनता पक्षाचे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली आहे. यासंदर्भात नामदेव ढाके यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि निवेदन दिले आहे. सदर निवेदनात ढाके यांनी म्हंटले आहे की, दोन दिवसांपूर्वी बुधवारी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवडमध्ये भाऊसाहेब भोईर युवा मंचच्या वतीनं घरगुती गणपती बाप्पाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. शहराच्या जीवनदायिनी असणाऱ्या नद्या आणि इतर जलस्त्रोतांना हानी पोहोचू नये म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भाऊसाहेब भोईर युवा मंच यांच्या वतीने विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमात ऋषिकेश कुंभार, रुपेश गायकवाड, प्रदीप चव्हाण यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गणेश विसर्जनाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्धपणे पार पाडली. नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होत पर्यावरण रक्षणासाठी योगदान दिले. महानगरपालिका आणि भाऊसाहेब भोईर युवा मंच यांच्या सहकार्यामुळे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार श्रीमती अश्विनी जगताप यांनी आज भारतीय जनता पार्टी कदापि सोडणार नाही हे सांगून पक्षावरील आपले प्रेम व पक्षावरील निष्ठा सिद्ध करून दाखवली आहे. उमेदवारी मिळो अथवा नाही, परंतु भाजप कदापि सोडणार नाही. अशी भूमिका विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी जाहीरपणे मांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अश्विनी जगताप हा भाजप सोडून तुतारी हाती घेणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर आता त्यांनी भाजप सोडणार नसल्याचे सांगितले आहे. माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी अलीकडेच भाजप सोडत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या पक्ष सदस्यत्व राजीनाम्याचे सोशल मीडियावर समजले. राजीनामा देताना त्यांनी भाजपवर तसेच जगताप कुटुंबावर बिनबुडाचे आरोप करीत स्वतःची निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्यांचा राजीनामा व आरोप म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या बदनामीचे सुनियोजित कटकारस्थान असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष व पक्ष प्रवक्ते राजू दुर्गे यांनी केला आहे. याबाबत राजू दुर्गे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजप पक्षात प्रवेश करताच राम वाकडकर यांना २०१७ ची महापालिका निवडणुक लढविण्याची संधी पक्षाने दिली. त्यावेळी त्यांच्यासह भाजपच्या संपूर्ण पॅनलचा पराभव होऊनही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाकडकर यांना…

Read More

म्युरल्सची तातडीने स्वच्छता न झाल्यास आंदोलन करणार :- इम्रान शेख पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “ई” क्षेत्रीय कार्यालयातील जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे शिल्प धुळखात पडून आहे. हे म्युरल्स साफ करण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याचे पाहून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) कार्यकर्त्यांनी ई क्षेत्रीय अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली. हे म्युरल्स म्हणजे केवळ पुतळे नाही. तर आपली परंपरा, इतिहास सांगण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत असते. त्यांच्या बाबतचा हा अक्षम्य हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. तातडीने हे पुतळे स्वच्छ करण्यात यावे अन्यथा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल असा इशारा युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी दिला.…

Read More