Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपळे सौदागरमधील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक (कुणाल आयकॉन रोड) रस्त्याला आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली आहे. पिंपळे सौदागरमधील वाहतूक कोंडी प्रश्न मार्गी लावण्यासाठी ५५ कोटी रुपये मंजूर करून या प्रकल्पाद्वारे रस्त्यांचे १८ मीटर आणि १२ मीटर रुंदीकरण आणि आधुनिकीकरण करण्याचे महापालिकेने मान्यता दिली आहे. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आज त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या प्रकल्पामध्ये इतर आवश्यक सेवांबरोबरच पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन पावसाळी वहन नलिका, जलनिस्सारण वाहिनी, पाणीपुरवठा वाहिनी,पथदिवे आणि दिशादर्शक सूचनाफलक आदी सुविधांचाही समावेश असणार आहे. तसेच प्रकल्पासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग  न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिका व मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) पिंपरी चिंचवड व मराठवाडा भूमिपुत्र यांच्या संयुक्तपणे ७६ वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, वृक्षमित्र अरुण पवार यांनी पिंपळे गुरवसारख्या ठिकाणची मुख्य जागा मराठवाडा भवनसाठी दान केली. आज तुकड्या तुकड्यासाठी वाद होत असताना अरुण पवार यांनी मराठवाडा भवनसाठी ५ ते ६ कोटी रुपयांची जागा दान करणे ही महाराष्ट्रासमोरचा आदर्श आहे, असे गौरवोद्गार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी काढले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, स्वामी रामानंद तीर्थ, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्य सेनानी गोंविदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महापालिकेचे…

Read More

पीसीईटी संचलित पुणे बिझनेस स्कूलचा दुसरा पदवी प्रदान सोहळा उत्साहात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करून प्रत्यक्ष व्यवसायिक जगतामध्ये प्रवेश करत आहात. यापुढील जिवनात अनेक आव्हाने समोर येतील. या आव्हानांना सकारात्मक विचार करून सामोरे जा. यश नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त तथा पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले.    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पुणे बिझनेस स्कूलचा दुसरा पदवी प्रदान सोहळा निगडी येथील संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उप कुलगुरू डॉ. पराग काळकर, डिलॉईट कंपनीचे कार्यकारी संचालक रवी प्रताप सिंग, हॉर्टिकल्चर इन्सेक्टिसाईड इं.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – रहाटणी पिंपळे सौदागर मधील ९ मीटर ते ४५ मीटर पर्यत संपुर्ण रस्ते आत्याधुनिक पध्दतीने विकसीत झाले आहेत. परंतु शिवार चौक ते गोविदं गार्डन चौक कुणाल आयकॅान रस्ता हा परिसरातील मुख्य रस्ता असुन या रस्त्या लगत मोठ्या रहिवाशी सोसायट्या,व्यवसायीक दुकाने, रूगणालय, बॅक, हॅाटेल, शाळा असुन  नागरिकांना वाहतुक कोडीं ला सामोरे जावे लागत होते, हा रस्ता लवकरात लवकर विकसीत व्हावा यासाठी नाना काटे यांनी वेळोवेळी  आयुक्त तथा मनपाचा संबधीत स्थापत्य प्रकल्प विभाग व इतर विभागाशी प्रत्यक्ष भेटुन व पत्र व्यवहार केला होता.नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश कुणाल आयकॅान रस्ता होणार अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेटं नुसार विकसीत स्थायी…

Read More

बार्टी आणि भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालय यांच्यावतीने दोन दिवसीय कार्यशाळा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व भोसरी इंद्रायणी नगर येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसीय करिअर मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. इंद्रायणी नगर, भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सकाळी ९:३० वा. उद्घाटन होणार आहे.      उद्घाटन प्रसंगी आमदार अमित गोरखे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, बार्टीचे महासंचालक…

Read More

अत्याधुनिक शहरी विकास आणि स्मार्ट सिटी उपक्रमांचा घेतला प्रत्यक्ष अनुभव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )– कर्नाटकातील बागलकोट येथील बी.व्ही.व्ही.एस. पॉलिटेक्निक च्या तिसऱ्या वर्षाच्या सिव्हिल इंजिनियरिंग विद्यार्थ्यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांना भेट दिली. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक शहरी विकास आणि स्मार्ट सिटी उपक्रमांना प्रत्यक्ष पाहणी केली. शैक्षणिक वर्षातील अभ्यास दौ-याचा एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौ-यात प्राध्यापक गिरीष मल्लीकटटी, सचिन बावलटटी, सविता सोबारड, सौजन्या कटटी यांच्यासह ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यादरम्यान, विद्यार्थ्यांना विविध स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमधील एबीडी एरियातील ८ टू ८० पार्क, लिनिअर गार्डन, रस्ते विकास, सायकल मार्ग, योगा पार्क तसेच, निगडी येथील आयसीसीसी मधून स्मार्ट वाहतूक व्यवस्था, कचरा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर प्रयत्नपूर्वक मात करून पुन्हा सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगण्याचा संदेश देणारे ‘ब्युटी ऑफ लाईफ –  द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर’ या लेखिका आशा नेगी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि.२२) सायंकाळी पाच वाजता, निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह (लहान सभागृह) येथे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहक आणि संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनिता राजे पवार यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आमदार अमित गोरखे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत, तर भारती विद्यापीठाचे प्रा. डॉ. वैभव ढमाल, कॅन्सर तज्ञ रेश्मा पुराणिक, ज्येष्ठ छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर, ईरा पब्लिकेशनच्या संस्थापिका अमृता…

Read More

BIG NEWS : इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला महायुती सरकारचा ‘ग्रीन सिग्नल’ पर्यावरण विभागाची ‘एनओसी’ अखेर मिळाली आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवडकरांसह राज्यातील वारकरी सांप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. नदी सुधार प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पर्यावरण विभागाची बहुप्रतिक्षीत ‘एनओसी’ अर्थात ना हरकत दाखला मिळाला आहे. त्यामुळे प्रकल्पाची कार्यवाही सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी २०१७ मध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी ‘‘भोसरी व्हीजन- २०२०’’ अभियान हाती घेतले होते. त्यामध्ये ‘नमामी गंगा’ प्रकल्पाच्या धर्तीवर ‘नमामी इंद्रायणी’ प्रकल्प हाती घेण्याचा संकल्प करण्यात आला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सांगवी-किवळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे २६.४० मीटर रुंदीच्या भुयारी मार्गाची बांधणी करण्यात येणार आहे.या प्रस्तावित भुयारी मार्गामुळे प्रवाशांना रहदारीसाठी सुलभता निर्माण होणार असून, यामुळे इंधन व वेळेचीही बचत होणार आहे. सांगवी ते किवळे या रस्त्यावर ४५ व ३० मीटर रुंदीचा बीआरटी मार्ग विकसित करण्यात आला आहे. तसेच हा रस्ता पिंपरी चिंचवड व पुणे या दोन्ही महापालिकांना जोडणारा तसेच मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर वाकड, हिंजवडी, पुनावळे, रावेत, किवळे, ताथवडे या भागात होत असलेल्या विकासामुळे तसेच वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाढत्या रहदारीमुळे येथील वाहनांच्या…

Read More

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत २९७२ विद्यार्थ्यांना बहाल होणार पदवी पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या ७व्या दिक्षांत समारंभाचे सोमवार दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.०० वा. आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मा.श्री.सी.पी.राधाकृष्णन (मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत तर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली लोणी काळभोर येथे पार पडणार आहे. यंदा विद्यापीठातील २९७२ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात येणार आहे. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ, गांधीनगर, गुजरातचे कुलगुरू, पद्मश्री डॉ.जयंतकुमार एम.व्यास यांना विज्ञान व तंत्रज्ञानामधील योगदानाबद्दल भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने…

Read More