- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शनिवारी साजऱ्या होणाऱ्या विजयादशमी आणि श्री साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे – आळंदी रोड, वडमुख वाडी येथील साई मंदिरामध्ये रविवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री साईबाबा मंदिर, वडमुखवाडी, आळंदी रोड पुणेचे विश्वस्त, अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. विजयादशमीच्या निमित्त पुर्वसंध्येला शुक्रवारी (दि.११) पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती, सनईवादन, मंगल स्नान, पारायण प्रारंभ, सकाळची आरती यानंतर दुपारी १२ वाजता माध्यान्ह आरती, सायंकाळी धुपारती, रात्री शेजारती होणार आहे. तसेच मुख्य दिवशी शनिवारी (दि.१२) विजयादशमीच्या निमित्त पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती, सनईवादन, मंगल…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचं भूमिपूजन, लोकार्पण सोहळा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. आयोजित शेतकरी मेळाव्याला अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. अजित पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आम्ही राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहा जिल्ह्यांमध्ये सरकारी मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम काल पंतप्रधानांच्या हस्ते झाला, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. माझ्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी, त्यांच्या फायद्यासाठी हे सरकार सदैव प्रयत्नशील आहे. लाखांचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला वीज बिल माफी दिली. एक रुपयात पीक विमा दिला. दुधावर प्रतिलिटर ५ ऐवजी ७…
कृपया प्रसिद्धीसाठी ————————– चार दिवसीय ‘दांडिया ग्रुप डान्स’ स्पर्धेचा समारोप; स्पर्धकांकडून बक्षिसांची लयलूट पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “नवरात्र” हा एक उत्सव नसून सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यात हा सण नुसताच साजरा होत नाही तर, सबंध देशाला एका माळेमध्ये जुंपण्याचे महत्वाचे कार्य त्याद्वारे पार पडत असते. नवदुर्गाच्या पूजनाने आसमंतात एक वेगळीच शक्ती संचारते. तीच शक्ती आज अखंड भारत मातेला सुरक्षा प्रदान करते. विविधतेत एकतेने नटलेल्या पिंपरी चिंचवड शहरात आज देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक एकत्र आले आहेत. त्यांच्या परंपरा, चालीरीती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काच व्यासपीठ प्रदान करण्याच कार्य पिंपळे सौदागरमधील उन्नती सोशल फाउंडेशन मोठ्या उत्साहात पार पाडीत असते. नवरात्रोत्सवानिमित्त…
*कामगार पुरुष भजन स्पर्धेत टाटा मोर्टरस कंपनी लि .पिंपरी.श्री.गुरुदत्त सेवा भजनी मंडळ तर महिला विभागा मधे कामगार कल्याण केंद्र,भोर,पुणे.सुमंगल भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकविला पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुणे गटाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रीय सप्ताह निमित्त गटस्तरीय कामगार पुरुष भजन स्पर्धा व महिला भजन स्पर्धा दिनांक ७ व ८ ऑक्टोबर२०२४ रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर एच. ए.कॉलनी पिंपरी येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत महिला भजन स्पर्धेत एकुण ११ संघाने व कामगार पुरुष भजन स्पर्धेत एकूण ८ संघाने सहभाग घेतला. कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.सतिश मोटे सिनिअर मॅनेजर एच. आर टाटा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात भर घालणारा ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ (जैवविविधता उद्यान) तळवडे येथे विकसित करण्यात येत आहे. सुमारे ७० एकर जागेत होणारा हा प्रकल्पामुळे निसर्ग परिसंस्थेचा जीर्णोद्धार होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी तळवडे येथे ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी महानगरपालिका, राज्य सरकारकडे सातत्त्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ योजनेतून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.…
प्रती महिना २ टक्के वाढणारे विलंब शुल्क टाळण्याचे करसंकलन विभागाकडून आवाहन! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आजअखेर ५०८ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. करसंकलन विभागाने मालमत्ताकरावर पहिल्या तिमाही व दुसऱ्या तिमाहीमध्ये जाहीर केलेल्या विविध सवलतींचा लाभ घेऊन नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला आहे. परंतु अद्यापि कर न भरलेल्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ताकरावर १ ऑक्टोबर पासून २ टक्क्यांचे विलंब शुल्क लागू झाले आहे. सबब, ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही आपल्या कराचा भरणा केलेला नाही अशा नागरिकांनी त्वरीत आपल्या कराचा भरणा करुन थकित रकमेवर वाढणारे विलंब शुल्क टाळावे, असे आवाहन कर आकारणी व…
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन विभागाकडून आयोजकांसाठी नियमावली जाहीर अग्निशामक विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे उत्सव आयोजकांना आवाहन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी – चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये दरवर्षी दसरा (रावण दहन) उत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरीकांची व भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सदर कार्यक्रमासाठी विविध ठिकाणी मंडप/पेंडॉल उभारण्यात येतात. सदर उत्सवाची सांगता सार्वजनिक ठिकाणी लहान-मोठ्या उंचीच्या रावण मुर्तीं उभारुन त्यांचे दहन करण्यात येते. अशा सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिने उत्सावाच्या आयोजकांनी नागरिक व भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या उपाययोजना कराव्यात. यासाठी अग्मिशमन विभागाकडून नागरिकांनी अनुसरावयाच्या उपाययोजनांबाबत नियमावली जाहीर केली आहे. सदर नियमावलीचे शहरातील सर्व…
मर्जीतल्या ठेकेदारांसाठी आयुक्तांचे गळचेपी धोरण पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये निविदा प्रक्रिया राबवताना केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग करून ठराविक ठेकेदारांना फायदा मिळवून दिला जात आहे. या ठेकेदार कंपन्या राजकीय पदाधिकाऱ्यांशी संबंधित असून, यांच्या दबावाखालीच आयुक्त शेखर सिंह या निविदा प्रक्रियेला मंजुरी देत आहेत. रुग्णालय, शाळा तसेच प्रशासकीय इमारतींसाठी लागणारे सुरक्षा रक्षक आणि ट्राफिक वॉर्डन यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळ पुरविण्याच्या निविदा अत्यंत चुकीच्या पद्धतीने काढलेल्या आहेत. यातून मोजक्या ठेकेदारांचा फायदा होणार आहे. त्यामुळे अशा निविदा रद्दबातल करून जाचक अटी शर्ती कमी कराव्यात अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी (दि. 10) केली. दरम्यान यावेळी महाविकास आघाडीच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सांप्रदायाची पार्श्वभूमी लाभलेले पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून नावारूपास आले. या शहराचे विकासाच्या दृष्टीने पुढे पाऊल पडत असून कटिबद्ध जनहिताय हे ब्रीदवाक्य असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेचा ४२ वा स्थापना दिवस दि. ११ ऑक्टोबर रोजी जल्लोषात साजरा होत आहे. यानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा तसेच शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना दि. ११ ऑक्टोबर १९८२ रोजी झाली. येत्या शुक्रवारी महापालिकेला ४२ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेच्या स्थापनादिनी येत्या शुक्रवारी सकाळी १० वाजता पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ काॅर्पोरेट इनोवेशन आणि लिडरशिप (एससीआयएल) यांच्या विद्यमाने आयोजित ‘टॅलेंट फ्यूजन २k२४’ या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उद्दिष्ट विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या रोजगार कौशल्यांचा विकास करणे होते. विद्यार्थ्यांमधील क्षमता आणि व्यावसायिक कौशल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन होते. या वर्षीच्या पहिल्या फेरीत संपूर्ण विद्यापीठातून १९०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ३ फेऱ्यांमधून अंतिम “एलेवेटर पीच” साठी १० स्पर्धकांची निवड करण्यात आली आणि त्यातून ३ विजेते घोषित करण्यात आले. ज्यामध्ये मधुर पाटील, प्रसाद बोकारे आणि अभिषेक सहा यांनी अणुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचे…
