- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. ०९) भ्रष्टाचारविरोधी जागरुकता अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांच्या वतीने डेप्युटी सुप्रिडेट (सीबीआय,एसीबी,पुणे ) गोपाल नाईक, पोलीस निरीक्षक श्रेया तरटे, तसेच पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, खजिनदार संजय ववले, प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर, संचालक संजय सातव,नवनाथ वायाळ,विनोद मित्तल, प्रमोद राणे,भारत नरवडे,अतुल इनामदार, सचिन आदक तसेच स्विकृत संचालक माणिक पडवळ, संजय भोसले,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (१ BHK) प्रवर्गातील ४७ सदनिका व LIG (२ BHK) प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS (१ RK) प्रवर्गातील ३४७ सदनिका व LIG (१ BHK) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ शुक्रवारी (दि.११) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते करण्यात आला. इच्छुक नागरिकांना अर्ज करण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया ११ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु करण्यात आलेली असून सोडतीसाठी Online अर्ज करण्यास १२ ऑक्टोबर २०२४ ते १२ नोव्हेबर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विजयादशमी निमित्ताने आज शनिवार माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर याठिकाणी पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील सर्वात भव्य दिव्य असा रावण दहन कार्यक्रम संपन्न होणार आहे. यंदाचा विजयादशमी कार्यक्रम पिंपळे सौदागरच नव्हे तर संपूर्ण शहरासाठी आकर्षक ठरणार आहे . यावेळी या कार्यक्रमात तरुणाईला वेढ लावलेल्या गुलाबी साडी गाणं फेम प्राजक्ता घाग , बॉईज-३ फेम अभिनेत्री विदुला चौघुले,बॉईज-२ फेम अभिनेत्री पल्लवी पाटील ,अभिनेत्री मोहिनी अवसरे आणि मुळशी पॅटर्न फेम प्रसिद्ध अभिनेते रमेश परदेशी (पिट्ट्या भाई ) हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. तसेच याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी भाजी मंडई परिसरात गेली ३५ वर्षे सावित्रीबाई फुले भाजी व्यवसाय मार्गदर्शक संघ व त्यांचे सदस्य भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.सर्व भाजी विक्रेते हे परवानाधारक असून त्यांनी महानगरपालिका व स्थानिक राजकीय नेत्यांना वेळोवेळी निवारा मिळण्याबाबत विनंती करत होते.आमदार अण्णा बनसोडे यांना ही बाब लक्षात येताच भाजी मंडई मधील ३०० परवाना धारक भाजी विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात पत्रा शेड गाळे बांधून दिले.त्यामुळे एवढ्या मोठ्या स्वरूपात काम झाल्याने ,पिंपरी भाजी मंडई मधील प्रत्येक गाळ्यावरील आमदार अण्णा बनसोडे यांचा फोटो पाहून व शहरात लागलेल्या बॅनर मुळे आमदार अण्णा बनसोडे यांच्या राजकीय विरोधकांना पोटदुखी होणार नाही हे नवलच.त्यातील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवसेनेचे आकुर्डी विभाग प्रमुख फारूख शेख यांची मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती तीन वर्षासाठी असणार आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. फारूख शेख गेल्या 15 वर्षांपासून शिवसेना विभागप्रमुख म्हणून आकुर्डी भागात कार्यरत आहेत. नगरसेवक प्रमोद कुटे युवा मंचच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षे सामाजिक कार्यात सहभागी असतात. सर्व समावेशक व सर्व समाजाशी सलोख्याचे संबंध आहेत. सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असतात. गुणवंत विद्यार्थी सत्कार,ईद मिलन,गणेशोत्सव,ईद ए मिलाद, नवरात्रोत्सव, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी सारखे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवितात. त्यांच्या कामाची दखल घेऊन खासदार बारणे…
– परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – निगडी, यमुनानगर, ओटास्कीम परिसरात विकास कामांचा धडाका सुरू आहे. अंतर्गत रस्त्यावर डांबरीकरणासह विविध विकास कामे केल्यानंतर आता ब्लॉक, पत्राशेड बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने सदर कामे मार्गी लावण्यात येत आहेत. निगडी गावठाण, यमुनानगर, ओटास्कीम हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. या भागात मोठी लोकसंख्या आहे. या भागातील अंतर्गत रस्ते सुस्थितीत केले आहेत. त्यानंतर परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ क्रीडा समितीचे माजी सभापती, माजी नगरसेवक प्रा.उत्तम केंदळे, माजी नगरसेविका कमल घोलप, सामाजिक कार्यकर्ते बापू घोलप, दीपक मोढवे-पाटील, कुंदन लांडगे, स्वप्नील वाघमारे, दीपक नायर,…
‘एमआयटी एटीडी’त भव्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कुठलीही कला समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचे त्या आहेत, तसे दर्शन घडवत असते. त्यामुळे, छायाचित्र आणि चित्रकलेच्या माध्यमातून कलाकार समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असतो. अगदी तसेच आज विद्याद्यार्थ्यांची छायचित्रे पाहूण सदर ठिकाणांचा प्रत्यक्ष फेरफटका मारून आल्यासारखे वाटले, असे मत ज्येष्ठ भारतीय पारंपारिक कला विद्वान डाॅ.सुधाकर चव्हाण यांनी मांडले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फाईन अँड अप्लाइड आर्टस् अभ्यासक्रमाअंतर्गत इंडियन ट्रेडिशनल स्टडीज(आयटीएस) या विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या चित्रकला व छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. ज्योती ढाकणे-कराड, प्र.कुलगुरू…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रम, रक्तदान शिबीर, खेळ पैठणीचा यांसारख्या विविध कार्यक्रमांची मेजवानी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी ठेवण्यात आली होती. अधिकारी कर्मचारी यांच्यासह आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांनी देखील या कार्यक्रमांचा आनंद घेतला. तत्पुर्वी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात सकाळी १० वाजता पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रांतिवीर मित्र मंडळातर्फे आयोजित नवमी नवरात्र उत्सवनिमित्त आज शनिवारी भव्य रावणदहन, कपल दांडिया स्पर्धा यांचे आयोजन केले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यावेळी उपस्थित असणार आहेत. क्रांतिवीर मित्र मंडळातर्फे गेल्या 30 वर्षांपासून गणेश उत्सव व नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्यानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गरबा, दांडिया होतात. यंदाही महिलांसाठी दांडियासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने भेट दिली आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे हे देखील भेट देण्यात येणार आहेत. कपल डान्स, कपल दांडिया होणार आहेत. या नवरात्र उत्सवात विशेष करून महिलांची संख्या लक्षणीय असते भागातील प्रत्येक परिवारास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सौंदर्यप्रसाधन आणि सौंदर्योपचार व्यवसायाला जेव्हा कलात्मक दृष्टिकोनाची जोड लाभते, तेव्हा एका ब्युटीपार्लर पासून सुरू केलेला प्रवास स्वतःच्या क्लिओपात्रा ब्युटी स्टुडिओ अँड इन्स्टिट्यूट पर्यंत कसा जाऊन पोहोचतो. याचा आदर्श वस्तूपाठ आहेत, डॉ. क्षमा महेश धुमाळ. या इन्स्टिट्यूट मधून अनेक महिला उद्योजक घडवण्याचे मोलाचे कार्य त्या करत आहेत. क्षमा यांचा जन्म जुन्नर या त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे वडील सुभाष शिंदे हे इन्कम टॅक्स ऑफिसर आणि आई सौ. सुनीता या मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका तसेच सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टी म्हणून कार्यरत होत्या. मुलांनी शिक्षण क्षेत्रात प्रगती करावी यासाठी ते प्रयत्नशील होते. पूर्णिमा, मीनल आणि सुशांत या मुलांनी शिक्षण…
